1. कृषीपीडिया

संजीवके देतात फळबागांना नवसंजीवनी, जाणून घेऊ संजीवकांच्या वापराचे महत्त्व

सजीव वनस्पतीमध्ये अथवा शेतातील पिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवकांचा पीक संजीवक असे म्हणतात. या लेखात आपण संजीवकांचे प्रकार व महत्त्व जाणून घेऊ.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
संजीवके देतात फळबागांना नवसंजीवनी, जाणून घेऊ संजीवकांच्या वापराचे महत्त्व

संजीवके देतात फळबागांना नवसंजीवनी, जाणून घेऊ संजीवकांच्या वापराचे महत्त्व

सजीव वनस्पतीमध्ये अथवा शेतातील पिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवकांचा पीक संजीवक असे म्हणतात. या लेखात आपण संजीवकांचे प्रकार व महत्त्व जाणून घेऊ.

सजीव वनस्पतीमध्ये जी रासायनिक द्रव्य अल्पप्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतीच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना वनस्पती संजीवके असे म्हणतात.

संजीवकांचे प्रकार

 संजीवकांचे वाढ प्रेरक आणि वाढ निरोधक असे मुख्य दोन प्रकार आहेत. संजीवकांचा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भाग घेण्याच्या प्रवृत्तीला अनुसरून संजीवकांची निरनिराळ्या गटामध्ये वर्गवारी केली जाते.

ऑक्सिन- ज्या रासायनिक द्रव्यांमध्ये वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याची क्षमता असते अशा द्रव्यांना ऑक्सिनम्हणतात.फळ झाडात वाढ नियंत्रित करण्यासाठी, फुल व फळांची गळ थांबवण्यासाठी नवीन मूळ येणे,सुप्तावस्था मोडणे, बहर नियंत्रित करणे व इतर कारणासाठी संजीवकांचा उपयोग होतो. हा संजीवकांचा महत्त्वाचा गट आहे. यासाठी बाजारात प्लानोफिक्स,सिरडीक्स, इत्यादी ओलर उपलब्ध आहेत. 

या गटामध्ये इंडोल ऍसिटिक ऍसिड,बुटेरिक ऍसिड,नेपथ्यालिक ऍसिटिक ऍसिड,2-4 डाय क्लोरोफॅन ऑफ ऍसिटिक ऍसिड (2-4-0)4 क्लोरोफॅनॉक्सऍसिटिक ऍसिड,ट्रायक्लोरोफेनोक्सिऍसिटिक ऍसिड(2-4-5) इत्यादी प्रकारच्या ऑक्सिनचा असा समावेश होतो. या संजीवकाचा उपयोग करून फुलांची व फळांची गळ थांबवणे, फुलांचे नियमन करणे व वनस्पतीच्या वाढीस मदत करून उत्पादन वाढवणे शक्‍य होते.

जिबरलीन्स- या रासायनिक द्रव्यांमध्ये वनस्पती पेशी लांबट व पेशी विभाजन करण्याची क्षमता असते. या दोन्ही क्रियांना चालना देण्याची क्षमता या गटात आहे. अशा द्रव्यांना जिब्रेलिन्स असे म्हणतात. या गटात अनेक प्रकारची जिबरेलिन उपलब्ध असली तरी जिब्रेलिक एसिड -3 या गटातील महत्त्वाचे संजीवक आहे. द्राक्षामध्ये या संजीवकाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. जिबरेलिनचे प्रमुख कार्य झाडाची वाढ करण्याचे असले तरी फुलांचे नियमन करणे, बियांचे प्रमाण कमी करणे तसेच फळांचा आकार वाढवणे इत्यादी साठी त्याचा उपयोग करता येतो. बाजारात हे संजीवक जी ए प्रोजीब या नावाने उपलब्ध आहे.

सायटोकायनिक्स- या रासायनिक द्रव्य मध्ये वनस्पती चे पेशी विभाजन करण्याची क्षमता असते. अशा द्रव्यांना सायटोकायनिन असे म्हणतात. या गटामध्ये कायनिज, कायनेटिनआणि बी.ए. यांचा समावेश होतो. यांचे मुख्य कार्य पेशींचे विभाजन करणे हे असले तरी प्रजनन वाढीस मदत करतात.

वाढ निरोधक- या रासायनिक द्रव्यांमध्ये फळांचे आकारमान मर्यादीत राखून उत्पादनक्षमता वाढवणे, वनस्पतीच्या अंतर्गत होणाऱ्या शरीरक्रिया थांबवण्याची अथवा कमी करण्याची क्षमता असते. अशा द्रव्याला वाढ निरोधक असे म्हणतात.

ही संजीवके वाढ निरोधक असून ॲबसेसिकएसिड आणि मालिक हाईडझाईड यांचा त्यामध्ये समावेश होतो.कोंब येण्यास विलंब करणे,पानांमधून पाण्याचे उत्सर्जन कमी करणे, फुलांचे नियमन करणे इत्यादीसाठी वाढ विरोधकांचा उपयोग होतो. एम.एच. 40 या नावाने वाढ निरोधक संजीवक उपलब्ध आहे.

इथिलीन- हे फळे पिकवण्यासाठी मदत करणारे संजीवक असून याचा उपयोग वनस्पतीमधील अनेक शरीर क्रियांमध्ये होतो. फळांची परिपक्वता वाढवणे,फळे एकसारखी पिकण्यास मदत करणे, फळांचा रंग सारखा व चांगला येणे, इत्यादी कारणांसाठी येथील इथिलिन चा उपयोग होतो. हे संजीवक बाजारात इथेफॉन,इथेल या नावाने उपलब्ध आहे. फळझाडांमध्ये बहार धरताना पानगळ होण्यासाठी सुद्धा संजीवकाचा वापर करतात.

English Summary: Sanjeevake gives rejuvenation to orchards, let's know the importance of use of Sanjeevke Published on: 05 February 2022, 03:08 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters