1. कृषीपीडिया

रशिया, युक्रेन युध्द भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर

युक्रेन आणि रशियातील युध्दामुळे जागतिक शेतीमाल बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रशिया, युक्रेन युध्द भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर

रशिया, युक्रेन युध्द भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर

युक्रेन आणि रशियातील युध्दामुळे जागतिक शेतीमाल बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. भारताच्या दृष्टीने विचार करता गहू आणि मक्याला मागणी वाढू शकते. सूर्यफूल तेलाची उपलब्धता कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

 सोयाबीनमधील दरवाढीला बळ मिळाले आहे. अमेरिकेसह युरोपने रशियावर निर्बंध कडक केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची चिन्हे आहेत.

युक्रेन जागतिक पातळीवर सुर्यफूल तेल उत्पादनात अग्रेसर आहे.

तर रशियातही सूर्यफूल उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जगातील सर्वाधिक गहू उत्पादन रशियात होते. रशिया गहू निर्यातीत आघाडीवर आहे. तसेच युक्रेनही गहू निर्यातीत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. त्याच बरोबर मका निर्यात युक्रेन जागात चौथ्या क्रमांकावर आहे. रशियाही मका निर्यातीत मागे नाही.

रशिया आणि युक्रेन मिळून जगातील ६० टक्के सूर्यफूल तेलाचे उत्पादन करतात. निर्यातीतही त्यांचा ८० टक्के वाटा आहे. ज

सूर्यफूल तेलाचे उत्पादन करतात. निर्यातीतही त्यांचा ८० टक्के वाटा आहे. जगातील २९ टक्के गहू या दोन देशांत मिळून पिकवला जातो. तसेच हे देश एकत्रितपणे जगातील १९ टक्के मक्याचा पुरवठा करतात.

सध्या रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे युरोपात १९४५ नंतर सर्वांत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल, मका , गहू, बार्ली आणि राईच्या दरात वाढ वरीचे दर 360 डॉलर प्रतिटनापर्यंत होते. 

त्या तुलनेत भारतीय मक्याचे दर आशियायी देशांसाठी तीस-चाळीस डॉलरने महाग आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत मका निर्यात शक्य आहे. मागील दोन महिन्यांत साधारण दहा लाख टन मका भारताने निर्यात केला. 

रशिया गहू निर्यातीत आघाडीवर आहे. तसेच युक्रेनही गहू निर्यातीत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. त्याच बरोबर मका निर्यात युक्रेन जागात चौथ्या क्रमांकावर आहे. रशियाही मका निर्यातीत मागे नाही.

English Summary: Russia, Ukraine war on the diet of Indian farmers Published on: 28 February 2022, 08:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters