1. कृषीपीडिया

गाळप झालेल्या ऊसाचे ६१६ कोटी रूपये अदा

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारातील कारखान्याकडून आजअखेर २८ लाख मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गाळप झालेल्या ऊसाचे ६१६ कोटी रूपये अदा

गाळप झालेल्या ऊसाचे ६१६ कोटी रूपये अदा

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारातील 

कारखान्याकडून आजअखेर २८ लाख मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप

 यावर्षी लातूर जिल्हयात चांगला पाऊस झाल्याने ऊसाचे पिक जोमदार आले असून एकरी उत्पादन वाढले आहे, असे असले तरी कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे उदिष्ट ठेवून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परीवारातील आठही कारखाने दिडपट ते दुप्पट कार्यक्षमतेने सुरू आहेत. या सर्व कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता २२ हजार ७५० असतांना दररोज ३२ हजार ते ३५ हजार मे. टन ऊसाचे गाळप होत आहे. त्यामुळे या गळीत हंगामात आजवर परीवारातील कारखान्यात २८ लाख ६५ हजार ४८८ मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या ऊसापोटी ६१६ कोटी रूपये अदा करण्यात आलेले आहेत. कार्यक्षेत्रातील सभासदाच्या ऊसाचे प्राधान्याने गाळप होत आहे. एकाही साखर कारखान्याची ऊसतोडणी यंत्रणा कार्यक्षेत्राबाहेर ऊसतोडणी करीत नाही, असे आवाहन सर्व कारखाना संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परीवारातील आठही कारखाना व्यवस्थापनाने प्रारंभी पासूनच आपआपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास प्राधान्य दिले आहे. या धोरणामुळे चालू हंगामात कारखान्याची कोणतीही यंत्रणा कार्यक्षेत्रा बाहेरील ऊसाचे गाळप करीत नाही.

सर्व यंत्रणा कार्यक्षेत्रात असून लवकरात लवकर ऊसाचे गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या चालू हंगामात आज अखेर मांजरा कारखाना (ऊस गळीत ४ लाख २३ हजार २६२ मे.टन), विलास कारखाना युनीट १ (ऊस गळीत ३ लाख ५१ हजार १३० मे.टन), विलास कारखाना युनीट २ (ऊस गळीत २ लाख ९७ हजार ९२० मे.टन), जागृती कारखाना (ऊस गळीत ३ लाख ८२ हजार ३१० मे.टन), मारूती महाराज साखर कारखाना (ऊस गळीत १ लाख १ हजार ६५० मे.टन), टवेन्टिंवन शुगर युनीट १ (ऊस गळीत ६ लाख ५ हजार १७६ मे. टन), टवेन्टिंवन शुगर युनीट २ (ऊस गळीत ४ लाख २ हजार २६८ मे. टन), रेणा सहकारी साखर कारखाना (ऊस गळीत ३ लाख १ हजार ७८० मे.टन) ऊसाचे गाळप केले आहे.    

 कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२१-२२ ची सुरूवात गतीने झाली आहे. गळीत हंगामात सभासद आणि कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे. 

कारखाना गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार तथा लातूर जिल्हा बॅकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख व विलास कारखाना चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. या हंगामात गाळप झालेल्या सभासद व शेतकऱ्यांच्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवाराच्या धोरणा प्रमाणे गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता २ हजार २०० रूपये अदा करण्यात येत आहे. हंगामात परीवारातील सर्वच कारखान्याकडून प्रतिदिन क्षमते पेक्षा अधिक ऊसाचे गाळप केले जात आहे. आज अखेर परीवारातील साखर कारखान्याकडून २८ लाख ६५ हजार ४८८ मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे.

 लातूर जिल्हयासह राज्यभरात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. ऊसाचे क्षेत्र अधिक असून ऊसाचे सरासरी उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊसाचे क्षेत्र पाहता परीवारातील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी जय्यत तयारी केली. 

पण गाळप हंगाम सुरू असतांना अवेळी पडलेल्या पावसामुळे सुरूवातीला गळीत हंगामात थोडा व्यत्यय आला होता. पावसाचा प्रभाव कमी होताच गाळप हंगाम वेगाने सुरू झाला आहे. या हंगामात सुरूवातीपासून कार्यक्षेत्रातील जास्तीत ऊसाचे गाळप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परीवारातील कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे लवकरात लवकर गाळप होईल यादृष्टीने नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे सभासद व ऊस्उत्पादक शेतकरी यांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जागृती चेअरमन सौ.गौरवी अतुलबाबा भोसले (देशमुख), रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी कारखाना चेअरमन गणपतराव बाजूळगे, मांजरा कारखानाचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, टवेन्टिवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, विलास कारखाना व्हा.चेअरमन रविंद्र काळे, जागृती शुगरचे व्हा.चेअरमन लक्ष्मणराव मोरे, रेणाचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, मारूती महाराज व्हा.चेअरमन श्याम भोसले व सर्व सन्मानिय संचालक मंडळाने केले आहे.

English Summary: Rs 616 crore paid for crushed sugarcane Published on: 13 February 2022, 04:00 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters