पिकांमधील खोडकिडी एक नुकसानदायक कीड आहे. खोडकिडीचा प्रादुर्भावने पिकांचे बरेच नुकसान होते.या किडीचा आपण जीवनक्रम पाहिला या किडीचे पतंग दिवसा पाण्याच्या मागे, खोडावर, पाचटावर लपून बसतात.1 रात्री नर-मादीचे मीलन होते व नंतर मादी अंडी घालतात
अंडी घालण्याचे प्रमाण पण खूप म्हणजे पुंजक्याने असते. उसाच्या पानाच्या मागे किंवा देठाच्या बाजूला अंडी घालते. एक माती पाच ते सहा दिवस अंडी घालत असते.एका मातीचे अंडी घालण्याचे प्रमाण कमीत कमी पाचशे ते हजार अंडी आहेत. अगोदर ही अंडी डोळ्यांनी दिसत नाही एवढे सूक्ष्म असतात.पाच दिवसानंतर दिसू लागतात. त्यानंतर याची अळीअवस्था चालू असते.हीच ऊसाचा मातृ कोंबआणि फुटव्या मधला मातृकोंबखात असते. अंदाजे पंधरा दिवसांमध्ये या अळ्याप्रोढ अवस्थेमध्ये येतात. त्यानंतर ही अळी उसाच्या खोडालालहान छिद्र पाडून आत प्रवेश करते व स्वतःच्या विष्टनेतेक्षिद्र बंद करते.वेळीस उपाय नाही केला तर आतील सर्व कोंब महिन्याभरात खाऊन 50 ते 80 टक्के नुकसान करते.
खोडकिडीचा प्रादुर्भाव
खोडकिडीचा प्रादुर्भाव हा हलकी जमीन, कमी पाणी,जास्त तापमानपिकांची दाट लागणअसेल अशा ठिकाणी दिसून येतो.
खोडकीडबंदोबस्तासाठी उपाय
कांदा,लसुन, पालक यासारख्या आंतरपिकांच्या लागवडीने प्रादुर्भाव कमी करता येतो. परंतु मका आंतरपीक असेल तर खोड कीड वाढू शकते. प्रति एकर दहा फेरोमन सापळे लावल्यास नर अडकून पडतो व पुढचे प्रजनन टाळतायेते.
जैविक व सेंद्रिय उपाय
खोड किडीवर बिव्हेरिया बॅसियाना व मेटारायझियम चा स्प्रे पतंग व अंडे अवस्थेत असतांना घ्यावा त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळते. अळीनाशक बाजरीच्या पिठापासून बनवलेले वापरावे.हिरवी मिरची दोन किलो, लसूण दोन किलो,तंबाखू दोन किलो 20 लिटर गोमूत्रात टाकून उकळून घ्यावे. द्रावण अर्धे होईपर्यंत उकळून द्यावे आणि मग वापरावे. प्रति पंप 75 ते 100 मिली हे द्रावण टाकावे. ( संदर्भ –कृषीवर्ल्ड)
Share your comments