1. कृषीपीडिया

आच्छादन वेगाने अनैसर्गिक मार्गाने कुजवणे योग्य की अयोग्य?

आमचे कृषी शास्त्रज्ञ म्हणतात . "आच्छादन वेगाने कुजविण्यासाठी आच्छादनावर एवढा युरिया / फॉस्फेट / ट्रायकोडर्मा टाका . ''

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आच्छादन वेगाने अनैसर्गिक मार्गाने कुजवणे योग्य की अयोग्य?

आच्छादन वेगाने अनैसर्गिक मार्गाने कुजवणे योग्य की अयोग्य?

आमचे कृषी शास्त्रज्ञ म्हणतात ."आच्छादन वेगाने कुजविण्यासाठी आच्छादनावर एवढा युरिया / फॉस्फेट / ट्रायकोडर्मा टाका . ''

त्यांच्या मते आच्छादन वेगाने कुजविले , तर त्यातून वेगाने कोणत्याही पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करू व पीक वेगाने वाढेल.परंतू ही त्यांची कृतीपुर्णपणे चुकीची व अशास्त्रीय आहे.आच्छादन वेगाने कुजलेतर मोकळी झालेली सगळीच अन्नद्रव्ये पीक उचलेल का ? की त्याला पाहीजे तेवढे उचलते ? पोटात जास्तीत जास्त बासूंदी कोंबली तर ती सर्व शरिराला मिळते का ? कीnअजीर्ण होऊन हगवण लागते ? तसंच.जरी तुम्ही वेगाने आच्छादन कुजविले त्यातून मोकळी होणारी अन्नद्रव्ये , ऊर्जा व सेंद्रीय कर्ब हे तत्व उभं पिक त्याला गरज असेल तेवढयाच प्रमाणात घेते 

व जमिनीतील जीवजंतू त्यांना हवा तेवढाच सेंद्रीय कर्ब नत्र व ऊर्जा घेतात. बाकीची अन्नद्रव्ये मात्र निसर्ग जमिनीत ठेवत नाही.

त्याची ताबडतोब विल्हेवाट लावतो . जमिनीत सेंद्रीय कर्ब पचविण्याची एक विशिष्ट पाचन शक्ती असते. तिचे पेक्षा जास्त मोकळा झालेला सेंद्रीय कर्ब व शिल्लक राहीलेला प्रचंड कर्ब लगेच हवेतील प्राणवायूशी संलग्न होऊन कर्बाम्ल वायूचे रूपात वातावरणात निघून जातो . तसेच- नैेट्रेटसचे त्वरित विघटन होऊन त्यातील शिल्लकच्या सर्वच्या सर्व नत्र वातावरणात निघून जातो व ऊर्जा सुध्दा वातावरणात निघून जाते . शेवटी जमिनीवर शिल्लक राहतात सुक्ष्म अन्नद्रव्ये , ती गरजेपेक्षा जास्त जमा झाल्यामुळे बासूंदीप्रमाणे जमिनीला अजीर्ण करतात , जमिनीत विष निर्माण करतात. 

जमिनीतील जीवाणूं/पिकांच्या मुळयांना हानी पोहचवितात . अतिरेकी बनून संहार सत्र सुरु ठेवतात .

जमिनीची एक विशिष्ठ पाचनशक्ती असते . व ती त्या जमिनीवर उभ्या पिकाला त्या पाचनशक्तीच्या मर्यादेत जर अन्नद्रव्ये व सुक्ष्म जीवाणूं असले तरच संतुलितपणे अन्न उपलब्ध करते . तिला संग्रह मान्य नाही . निसर्गाचा तसा तिला आदेश आहे. निसर्गाचा नियम आहे, जेवढे गरजेचे तेवढेच जमिनीत निर्माण करणे व उपलब्ध करणे गरजेचे नाही ते नष्ट करणे.

याउलट -निसर्ग आच्छादन हवेवर जगणाऱ्या जीवाणूंमार्फत गरजेएवढेच हळूवारपणे कुजवून पिकास लागेल तेवढीच अन्नद्रव्ये जीवाणूंमार्फत उपलब्ध करुन देतो. 

तरी वरील सर्व बांबीचा सर्वकष विचार करून अनैसर्गिक मार्गाने आच्छादन वेगाने नकुजवता आच्छादन कुजविण्याचे काम आपण निसर्गाकडे सोपवून निश्चिंत होऊन भरघोस उत्पन्नात वाढ करून नैस. शेतीतली आपली वाटचाल सक्षम करावी .

आद.पाळेकर गुरुजी यांचे शिबिरातील नोट्स वरून.

         

गजानन खडके

9422657574

प्रसारक शेतकरी

गजानन खडके,9422657574

English Summary: Residue fastly decompose correct or incorrect Published on: 08 January 2022, 06:46 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters