कापूस पिकावरील आकस्मित मर चे व्यवस्थापन करणे बाबत. 15 ते 20 दिवस पिकास पाण्याचा ताण पडणे किंवा सतत पाऊस आल्यानंतर एकदम बरेच दिवसांची उघड असणे किंवा सतत पावसामध्ये पाण्याचा योग्य निचरा न होणे म्हणजे झाडाच्या मुळांना योग्य प्रमानात प्राणवायू पुरवठा न होणे
झाडांना मुळांद्वारे लागणाऱ्या अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यात खंड पडणे किंवा तो न मिळणे इत्यादी कारणेReasons include interruption or lack of supply of nutrients to plants through the roots आकस्मित मर होण्यास कारणीभूत असतात.यासाठी आपण पहिल्यांदा शेतात साठलेल्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करावा व यानंतर शेतात वाफसा स्थिती आल्यानंतर ताबडतोब डवरणी
वखरणी करून जमीन मोकळी करावी .तातडीचे उपाय म्हणून खालील उपाययोजना करावी.1) कार्बनडेन्झिम+ मॅन्कोझेब 50 ग्रॅम(साफ)2) ह्युमिक ऍसिड(मोनोसिल) 50 मिली3) 13/00/45( पोटॅशियम नायट्रेट) 50 ग्रॅम
15 लिटर पाण्यात घेऊन मर रोगग्रस्त झालेल्या झाडाजवळ 50/60 मि'ली ड्रेंचिंग करावे कापूस झाडा शेजारी अंगठ्याने किंवा पायाने दाबून सैल झालेली जमीन घट्ट करावी असे केले असता मर रोगग्रस्त मलूल झालेली झाडे दोन ते तीन दिवसात पूर्णपणे चांगली होतात याप्रकारे मर रोगाचे व्यवस्थापन केल्यास आपले होणारे संभाव्य नुकसान टळते.
प्रा.दिलीप शिंदे सर
भगवती सीड्स, चोपडा
9822308252
Share your comments