1. कृषीपीडिया

भारतातील सेंद्रिय शेतीला पाठिंबा देण्यासाठी, हल्ली शिफारस.

सेंद्रिय शेतीच्या काही कार्य भारताच्या अन्नसुरक्षेतेसंबंधी कार्यपद्धतीवरील हा लेख व्यक्त केले आहे. भारतातील आधुनिक सेंद्रिय शेती : भारतात अनादी काळापासून शेती उद्योग हा संपूर्णतया सेंद्रिय तंत्रावर अवलंबून होता

KJ Maharashtra
KJ Maharashtra
भारतातील सेंद्रिय शेतीला पाठिंबा देण्यासाठी, हल्ली शिफारस.

भारतातील सेंद्रिय शेतीला पाठिंबा देण्यासाठी, हल्ली शिफारस.

होता आणि विविध प्रकारची खते व कीटकनाशक औषधे ही वनस्पती व पशुउत्पादनांपासून तयार केली जात असत. सेंद्रिय शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता आणि श्रीमंतीचे समीकरण, व्यक्तीच्या मालकीच्या गोधनाशी केले जात असे. गाय केवळ दूधच नव्हे, तर शेतीकामास आवश्यक्य असणारे बैल आणि खतासाठी शेण पुरविते. म्हणून तिला महत्त्वाचे स्थान दिले गेले. त्याशिवाय, प्राचीन काळापासून पारंपरिक शेतीपद्धतींमध्ये खत तयार करण्याच्या इतर पद्धतीसुद्धा समाविष्ट होत्या; जसे शेळ्यांना रात्री शेतात बसवणे आणि हिरवे खत देणे आणि गैरखाद्यपेंड्या लावणे. या प्रबंधात मी या कार्यपद्धतींवर चर्चा केलेली नाही.

1905 ते 1924 च्या दरम्यान ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ सर अल्बर्ट हॉवर्ड व त्यांच्या पत्नी गोब्रिएल ज्या स्वतःही एक वनस्पती विज्ञान शास्त्रज्ञ होत्या. हे दोघेही कृषी सल्लागार म्हणून कार्यरत होते. सर हॉवर्ड हे इंदूरच्या शासकीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख होते. येथे असताना या दांपत्याने पारंपरिक भारतीय कृषी प्रघातांवर गाढा अभ्यास करून, याविषयी लिहिताना असे नमूद केले की, हे प्रघात रुढीगत कृषीविज्ञानापेक्षा वरचढ आहेत.

सर हॉवर्ड यांनी 1940 मध्ये ’gricultural testament ’ हे पुस्तक लिहिले. त्यात विशेषत:, या दांपत्याने केलेले या कार्यपद्धतींवरील संशोधन व पुढील विकास, यावरील माहिती आढळते. त्या काळाच्या अनेक शास्त्रज्ञांवर व शेतकर्‍यांवर या पुस्तकाचा प्रभाव पडला. सर्वसाधारणतःब्रिटिश व इतर युरोपीय व्यक्ती विविध कृषीसूक्ते व वृक्षायुर्वेदातील वर्णन केलेल्या उत्कृष्ट प्रघातांशी अपरिचित होते.

1950 व 1960 च्या दशकांमध्ये, भारतात मोठ्या प्रमाणावर अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण झाले. सतत वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबत येणार्‍या नैसर्गिक आपत्ती, ही त्यामागील प्रमुख कारणे होती. यापरिणामी, भारत सरकारला बळजबरीने परदेशांतून अन्नधान्याची आयात करावी लागली. अन्नाची सुरक्षितता वाढविणाच्या हेतूने, धान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी, सरकारला मूलगामी पावले उचलावी लागली. या कालावधीत सर हॉवर्ड यांचे कार्य दुर्लक्षिले गेले.

1960 च्या दशकाच्या मध्यात, भारतात ’हरितक्रांतीने’ अग्रस्थान पटकावले. अनेक हेक्टर जादा जमीन लागवडीखाली आणली गेली. हायब्रीड बिया व गहू व भाताच्या नव्या जातींची सुरवात करून देण्यात आली. सेंद्रिय व नैसर्गिक खतांची जागा अर्थपूर्णतेने रासायनिक खतांनी घेतली आणि पारंपरिक कीटकनाशक औषधे आली. राष्ट्रीय केमिकल फर्टीलाझर्स लिमिटेड यासारख्या मोठमोठ्या रासायनिक कारखान्यांची स्थापना करण्यात आली.

’1970 दशकाच्या मध्यात लक्षावधी निर्धन भारतीय भुकेमुळे जीव गमावतील’, असे भाकीत हरितक्रांतीच्या प्रारंभाआधी करण्यात आले होते. तरीसुद्धा, काही वर्षांतच, हरितक्रांतीने आपला प्रभाव पाडण्यास सुरवात केली. दरवर्षी भारताच्या धान्य उत्पादनात लक्षणीय वाढ होत गेली आणि जो देश स्वत:च्या अन्नपुरवठ्यासाठी आयातीवर निर्भर होता, त्याने प्रत्येक वर्षी या आयातीत कपात करण्यास सुरवात केली. 1990च्या दशकात भारताकडे आधिक्याने धान्यपुरवठा राहिला आणि पुन्हा एकदा, या देशाने जगभरात धान्याची निर्यात करण्यास सुरवात केली.

जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे रासायनिक शेतीवरील अति- परावलंबनाचे प्रतिकूल परिणाम हळूहळू निदर्शनास येऊ लागले. असे दिसण्यात आले की जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत गेली; या कारणास्तव प्रत्येक हंगामात खताच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. पिकांवरील काही कीटकांची, रासायनिक कीटकनाशक औषधांप्रतीची प्रतिकारशक्ती वाढत गेल्यामुळे, शेतकर्‍यांना अधिक अधिक कडक व महागडी पर्यायी कीटकनाशक औषधे वापरावी लागली आणि याचा गंभीर परिणाम म्हणजे पर्यावरणातील प्रदूषण वाढत गेले. शेतीच्या वाढत्या खचार्र्मुळे त्रस्त झालेले शेतकरी उच्च व्याजदर असलेल्या कर्जाच्या सापळ्यात अडकत गेले. 

स्वदेशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय अन्नाच्या मागणीत वाढ होत चालल्यामुळे भारतातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. खऋ-ऊ इंटरनॅशनल फंड फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट या संघटनेनुसार, भारत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर, सेंद्रिय अन्नपुरवठा करणारा एक दर्जेदार देश ठरला आहे. संपूर्ण आशियातील एकूण सेंद्रिय क्षेत्रफळ सुमारे 2.9 दशलक्ष हेक्टर आहे. यात जगातील 9% सेंद्रिय कृषी कार्यरत असलेली जमीन समाविष्ट आहे. 230,000 उत्पादकांची नोंद करण्यात आली आहे. चीन (1.6 दशलक्ष हेक्टर) आणि भारत (1 दशलक्ष हेक्टर), हे दोन देश अग्रस्थानी आहेत

हरितक्रांतीदरम्यान नवीन सिंथेटीक व असेंद्रिय शेतीपद्धतींवरील भरवसा वाढत चालला होता. सेंद्रिय शेतीच्या आधुनिक पुनर्रजीवनाच्या इतिहास हा ब़र्‍याच प्रमाणात ’हरितक्रांतीचा’ परिपाक होता. मध्य युरोप व भारत हे देश साधारणतः एकाचवेळी पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळले.

पुढील परिच्छेदांमध्ये सेंद्रिय शेतीच्या काही कार्यपद्धतींवर चर्चा करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची सध्याच्या काळात शिफारस करण्यात आली आहे. 

नैसर्गिक शेतीची पद्धत किंवा ’do nothing farming’

मासानोबू फुकोओका (1913-2008) हे एक जपानी शेतकरी आणि तत्त्वज्ञानी होते. (तृण न काढता, जमीन न नांगरता केलेली पिकांची लागवड) या कार्यपद्धतीचे पुरस्कर्ते होते. अनेक स्थानिक संस्कृतींमध्ये शेतीची ही पद्धत पारंपरिक आहे. पुढे ही कार्यपद्धती ’नैसर्गिक शेती’ या नावाने नावलौकिकास आली. मासानोबू फुकोओका यांनी लिहिलेले पुस्तक सर्वप्रथम 1978 मध्ये प्रकाशित झाले.

 मानव व निसर्गातील दुवा, वास्तवतेला संपुष्टात आणत नाही. भारतातील काही पर्यावरणतज्ज्ञ, राजकारणी व्यक्ती व जनसंपर्क साधनांनी फुकोओकांच्या पद्धतीत बरीच रुची दाखवली, परंतु या त्यांच्या नैसर्गिक शेतीच्या पद्धतीच्या व्यवहार्यतेची खात्री बहुतांश भारतीय शेतकर्‍यांना पटलेली नाही.

 

मानवी उत्क्रांती, शिकारी-गोळा करणारा या अवस्थेत असताना, ’वे पेींहळपस’ ही नैसर्गिक शेतीची पद्धत अस्तित्वात होती. अन्नसुरक्षिततेच्या लाभाची हमी बाळगण्याच्या हेतूने मानवजात पुढे नांगरणीकडे वळली. माझ्या मते, ’do nothing’ ही नैसर्गिक शेतीची पद्धत उपयोगात आणणे, म्हणजे कालचक्रात मागे जाणे; जे अशक्य आहे.

बायोडायनॅमिक कृषी

बायोडायनॅमिक अ‍ॅग्रीकल्चर हा कृषीचा एक पर्यायी प्रकार असून, तो सेंद्रिय शेतीशी मिळतजुळता आहे. परंतु त्यात विविध गूढ संकल्पना समाविष्ट आहेत. या संकल्पना रुडॉल्फस्टाइनर (1861-1925) यांच्या विचारातून घेतल्या गेल्या आहेत. रुडॉल्फस्टाइनर हे एक ऑस्ट्रियन तत्त्वज्ञानी, समाजसुधारक, वास्तुविद्याविशारद आणि ’esotericist’ होते. बायोडायनॅमिक कृषी 1924 साली विकसित झाली आणि युरोपातील सेंद्रिय शेतीत,ती पहिल्या क्रमांकावर होती. मातीची सुपीकता, झाडांची वाढ आणि गुराढोरांचे संगोपन, या तिन्ही गोष्टी पर्यावरणीय परस्परसंबंधी कामे आहेत, असेही पद्धत मानते आणि त्याशिवाय अध्यात्मिक व गृह्यदृष्टिकोनावर जोर देते.

 

बायोडायनॅमिक्स इतर सेंद्रिय दृष्टिकोनांशी मिळतेजुळते आहे. ते खत व कंपोस्टच्या वापरावर जोर देते आणि माती व झाडांवर रासायनिक उत्पादनांचा वापर टाळते. बायोडायनॅमिक दृष्टिकोनातील पद्धती अद्वितीय आहेत. यात पशू, पिके व माती या तीनही घटकांना एकच प्रणाली मानून, त्यांच्यावर उपचार केले जातात. सुरवातीपासूनच स्थानिक उत्पादने व वितरणप्रणालीवर जोर दिला जातो आणि पारंपरिक व नवीन स्थानिक प्रजाती व प्रकार यांच्या वापरालाही महत्त्व दिले जाते. काही पद्धतींमध्ये पेरणी व लावणी, प्राचीन व मध्ययुगीन भारतात प्रचलित असणार्‍या शास्त्रावर आधारित पंचांगानुसार केली जाते. कंपोस्ट व शेतफवारणीसाठी बायोडायनॅमिक कृषीत विविध वनौषधी + खनिजे यांच्या मिश्रणाचा वापर केला जातो. हे तयार करण्याच्या पद्धती कधीकधी विवाद्य ठरू शकतात- जसे, कुटलेले खनिज स्फटिक गायीच्या शिंगात भरून ते जमिनीत पुरणे. यामुळे मातीतील वैश्रीक शक्तीचा लाभ मिळेल असे मानले जाते.

 

बायोडायनॅमिक उत्पादनांसाठी प्रमाणित संस्था आहेत (certified agencies) यातीलबहुतांशी, demeter international या आंतरराष्ट्रीय बायोडायनॅमिक प्रमाण गटाच्या सदस्य आहेत. या गटाचे प्रमुख कर्यालय डार्मस्टन्ड, जर्मनी येथे आहे. भारत हा केवळ पाहून सदस्य असून (guest member),आपले कार्यालय बेंगळुरू येथे आहे.

भारतात या चळवळीची सुरवात 1990च्या दशकात पूर्वाधार्त झाली,पीटर प्रोक्टेर हे न्यूझीलंड चे शेतकरी आहेत.1965 पासून ते बायोडायनॅमिक कृषीविषयक कार्यात कार्य करत आहेत.1993मध्ये इंदूरच्या श्री. टी. जी. के. मेनन यांनी त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. भारतीय शेतकर्‍यांना बायोडायनॅमिक कृषीत प्रशिक्षित करणे, हा त्यामागील हेतू होता. तेव्हापासून, ते रेशियल पोमेरॉय यांच्यासह वर्षातून दोनदा ईथे येतात आणि खेडेगावात किंवा मोठ्या प्रमाणात शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी परिसंवाद, कृषिसत्रे व अभ्यासक्रम आयोजितक रतात. गेल्या 5 वर्षात, भारतात सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये बायोडायनॅमिक कृषीविषयी आवड निर्माण झाली आहे. या प्रकारची शेती करणारे 500हून अधिक लहान-मोठे शेतकरी संपूर्ण देशभरात आहेत. उत्तर व दक्षिण भारतात तीन ठिकाणी इऊ शेतीत पुढाकार घेतला जात आहे आणि 3000 लहान शेतांवर बायोडायनॅमिक शेतीला बढती देण्यात येत आहे. कोरामंगल बंगळूर येथे स्थित असलेली ढहश इळे ऊूपराळल the bio dynamic -asociation,india (bd-i) ही संस्था, बायोडायनॅमिक शेतीचे प्रशिक्षण देण्यास, आंतरराष्ट्रीय बायोडायनॅमिक चळवळीशी दुवा जोडण्यास, परस्परक्रियेमार्फत बायोडायनॅमिक शेतीसंबंधित वाणिज्य व व्यापारविषयक उपक्रमांना बढती व पाठिंबा देण्यास बांधील आहे.

ह्यूमस (बुरशी) तयार करण्याच्या प्रक्रियेस उत्तेजन देण्यासाठी इऊ-खत र्फेदोन प्रमुख सूत्रीकरणांची शिफारस करण्यात आली आहे.

500 : (गायीच्या शिंगाचे खत) शरद ऋतूत गायीच्या शिंगात गाईचे शेणखत भरून, ते जमिनीत पुरणे (पृष्ठभागापासून 40-60 सेंमी खाली) व त्याचे ह्यूमस (बुरशी) मिश्रण तयार करणे. हिवाळ्यात याला कुजण्यास ठेवावे व पुढच्या वसंत ऋतूत वापरण्यास काढावे.

 

501 : खनिज स्फटिकाला कुटून त्याचा भूगा करावा व वसंत ऋतूत तो गायीचा शिंगात भरून, ते जमिनीत पुरावे. शरद ऋतूत ते बाहेर काढावे. याचे 500 च्या सूत्रीकरणात मिश्रण करता येईल, परंतु सर्वसाधारणतः हे स्वतंत्रपणे तयार केले जाते. (1 टेबलस्पून स्फटिक चुर्‍यासाठी 250 लिटर पाणी). ओल्या ऋतूत या मिश्रणाची अत्यंत कमी दाबाने पिकावर फवारणी करावी. यामुळे बुरशीजन्य रोगांना आळा बसेल. पाने जळून येत यासाठी ही फवारणी मळभ असताना किंवा सकाळी लवकर (ऊन यायच्या आत) करावी. बायोडायनॅमिक शेतीसाठी तयार करताना, लावण्याच्या मिश्रणाचादार (म्हणजे 500+501) : प्रतिहेकटर : 300 ग्रॅम शिंगाचे खत आणि प्रतिहेक्टर : 5 ग्रॅम शिंगांचे (हॉर्न) सिलिका. हे घटक प्रतिहेक्टरसाठी 20-25 लिटर पाण्यात एक तासभर ढवळून ठेवावे आणि यासाठी नेमून दिलेली पद्धत वापरावी.

 

बायोडायनॅमिक कृषी अमलात आणल्यावर जे हितकारक परिणाम प्राप्त होतात, त्यांना प्रमाणित बायोडायनॅमिक कृषीविषयक तंत्रे व मिळत्याजुळत्या सेंद्रिय व संकलित शेतीपद्धतींमध्ये शास्रशुद्धरीत्या अजूनही स्थापित करता आलेले नाही. तुलनात्मक चाचण्या घेताना, बायोडायनॅमिक शेतीवरील संशोधनात गुंतागुंत निर्माण झाली आहे. कारण विशिष्ट बायोडायनॅमिक पैलू अलग करताना अडचणी येतात. यामुळे कोणताही विशिष्ट परिणाम जोरदारपणे सिद्ध करणारा एकही पदार्थ दृष्टीस पडत नाही. फारच क मी शेतकरी बायोडायनॅमिक शेती करतात आणि बहुधा तिला भारतात फारसे भवितव्य नाही, असे वाटते.

व्हर्मीकल्चर ः गांडूळखत

 

मेरी आर्लेन अ‍ॅपलहॉफ (1936-2005) या एक अमेरिकन जीवशास्त्रवेत्ता, ’व्हर्मीकंपोस्ट’ आणि पर्यावरणवादी होत्या. आधुनिक काळातील गांडूळखत किंवा व्हर्मीकल्चरची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. मेरी यूएसएमध्ये मिशिगन येथे जीवशास्त्राच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. साधारणतः 1972-73च्या सुमारास हिवाळ्यात त्यांना कंपोस्ट तयार करायचे होते. त्या समशीतोष्ण हवामानात राहत असल्यामुळे हे तितके सोपे नव्हते. एकदिवस जवळच्या एका चार दुकानातून त्यांनी गांडूळे आणली आणि घरातच एक कंपोस्टिंग सिस्टिम तयार केली. ही अशा प्रकारची पहिली प्रक्रिया होती आणि त्यांना यात यश लाभले.

 

व्हर्मीकंपोस्ट किंवा गांडूळखत या कंपोस्ट प्रक्रियेत विविध जातींच्या गांडुळांचा उपयोग केला जातो. कुजणार्‍या भाज्या, अन्नकचरा, बेंडिंग सामग्री आणि व्हर्मीकास्ट यांचे विषम मिश्रण (heterogenous mixture) तयार करण्याचे काम ही गांडुळे करतात. या प्रक्रियेस व्हर्मीकंपोस्टिंग असे म्हणतात. व्हर्मीकास्टला कृमी निर्णायक (वर्मकास्टिंग), कीटकबुरशी (वर्मह्यूमस) किंवा कृमीखत (वर्ममॅनुअर) असेही म्हणतात. गांडुळे सेंद्रिय पदार्थांचे अपघटन घडवून आणतात आणि अखेरीस हे उत्पादन तयार होते. व्हर्मीकंपोस्टमध्ये पाणी विद्र्व पोषक तत्तवे (water souiable nutrients) असतात आणि त्यामुळे हे सेंद्रियखत पोषकतत्त्वांनी पूरक असते. असा दावा केला जातो की, गांडूळखतात एकूण नायट्रोजनचे प्रमाण अधिकतम असते. नायट्रोजन व फॉस्फरसवाढी व प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्याशिवाय गाळ व मातीतील जड धातू मोठ्या प्रमाणात बाहेर काढले जातात.

भारतात व्हर्मीकंपोस्टिंगमध्ये गांडळाच्या असामान्य जाती वापरल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन विशिष्ट जाती अधिक परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. या असामान्य जातींची नावे आहेत :एळीपळर ऐशींळवर, इतर ठिकाणांहून गांडळांची आयात करावी लागत असे; आता त्याची जरूर पडत नाही. lampito mauritii या स्थानिक जातीसुद्धा तितक्याच परिणामकारक असल्याचे दिसण्यात आले आहे.

व्हर्मीकंपोस्टचे सकारात्मक परिणाम सूक्ष्मजंतूंच्या हालचालीं मुळे होतात. या हालचाली बहुतेकदा झाडांच्या वाढीवरील नियामक यंत्रे (plant growth regulators) आणि व्हर्मीकंपोस्टमध्ये उपस्थित असणारे ह्यूमिकऍसिडवफॉलिकऍसिड या आम्लपदार्थांच्या वाढत्या स्तरांशी संबंधित असतात. वरचेवर चांगली वाढ होत असल्याचे परिणाम दिसण्यात आले. ईष्ट्मउगवण (optimum germination) वाढ, फुलांचा बहर आणि उत्पादनातील वाढ हे सर्व विशिष्ट सूत्रीकरणात आढळून आले. यात व्हर्मीकंपोस्टमध्ये उपस्थित असलेले पोषक तत्तवे होती.

 

गांडुळे मातीची सुपीकता सुधारतात व तिची पुनर्बांधणी करतात. त्या शिवाय ती पीक उत्पादनाला हेतुगर्भ उत्तेजन देतात. गांडळांची विष्ठासुद्धा पोषक सेंद्रिय खत असते जे बुरशीने समृद्ध असते, त्यात मातीतील हितकारक सूष्म जिवाणू व सूक्ष्म पोषक घटक, नायट्रोजन व फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू odmuy actinomycetes आणि u auxins,gibberellinsd cytokininshodmb हेवाढसंप्रेरक (growth hotmones) असतात. गांडूळे व त्यांचे व्हर्मीकास्ट आणि त्यांच्या शरीरातील द्रव र्हे(vermin wash) तिन्ही पिकांच्या वाढीस बढती देतात व त्यांचे संरक्षण करतात.

 

व्हर्मीकंपोस्टचा अतिप्रमाणात वापर केल्यास, सकारात्मक प्रतिसादाला कारणीभूत असलेल्या काही विशिष्ट नैसर्गिक कार्यांमध्ये अडथळे येऊ शकतात. आणखी एक नकारात्मक लक्षण म्हणजे, dendrobaena venta आणि perionyx excavatus याजातींच्या शळिसशळल गांडळाच्या मदती नेव्हर्मीकंपोस्ट केले तर मातीत व कंपोस्टमध्ये घाणीच्या प्राथमिक अवस्थांमध्ये escherichia coli या जवाणूंच्या वृद्धीला मदत होऊ शकेल. रोगकारकतेची दीर्घकालीन चिकाटी अप्रभावित असल्याचे दिसते. लहान प्रमाणात केलेल्या टिकाऊ सेंद्रिय शेतीत असे दिसण्यात येईल. व्हर्मीकल्चरमध्ये जे अव्यक्त सामर्थ्य आहे, ते मोठ्या प्रमाणावरील शेतीत अधिक लाभदायी ठरेल. या आरोग्यासंबंधित बाबींवर अधिक अभ्यास करणे ईष्ट ठरेल. (grow 2017)

 

natueco culture

 

दाभोलकरांनी (2001) ’natueco’ ही संज्ञा दोन शब्द जोडून तयार केली - natural (नैसर्गिक) आणि ecological (पर्यावरणीय). आपल्या शेती व अन्नासंबंधित सर्व गरजा छर्रीींशले समग्रतेने भागवते असे मानले जाते. ते शेतीसंबंधित गंभीर बाबीत बारकाईने लक्ष देते; जसे : 

 

1) निसर्गासोबत तालबद्धतेत राहते.

2) शेतीचे बाह्य कच्या मालावरील अवलंबन कमी करते.

3) शेताच्या जवळपास उपलब्ध असलेल्या सर्व साधनांच्या मर्यादेत शास्त्रोक्त पद्धतीने काम करून, त्याचवेळी त्यापासून उच्चतम लाभही मिळवते.

1) अमृतमातीच्या लहान ढिगांवर रोपे वाढवली जातात. पर्रीींशले प्रक्रियेतून मातीची सुपीकता वाढवताना अर्धवट कुजलेल्या पालापाचोळ्याचे र्(mulch) माती झाकली जाते. त्यामुळे नांगरणी करावी लागत नाही.

अमृतमाती हा प्रमुख घटक आहे; हे एक प्रकारचे कंपोस्ट असून, त्याचे ढीग रचले जातात, व ते नेहमी ओले ठेवले जातात.

 पिकांची पेरणी आणि कापणी गरजेवर आधारित असते.

अमृतजल तयार करण्यासाठी 10 लिटर पाणी, 1 लिटर गोमूत्र, 1 किलो गाईचे ताजे शेण, आणि 50 ग्राम गूळ एका भांड्यात एकत्र मिसळले जाते. हे मिश्रण तीन दिवस आंबवले जाते आणि दिवसातून दोन ते तीन ते ढवळावे लागते. चौथ्या दिवशी त्याचे घट्ट मिश्रण तयार होते. या मिश्रणाचा एक भाग, दहा भाग पाण्यात मिसळून पातळ केला जातो. हिरव्या व शुष्क वनस्पती बायोमासपासून अमृतमाती तयार केली जाते. दोन्हींना वाळवून व्यवस्थित चिरडले जाते. वाळवलेला बायोयास एका भांड्यात, अमृत जळत बुडवला जातो. आणि 24 तास त्याला तसेच ठेवण्यात येते. सचदे (2011) यांनी दाभोलकरांची पर्रीींशले ही पद्धत लोकप्रिय केली. ते समजावून सांगतात की,स्वयंपूर्णतेची हमी बाळगण्यासाठी, सूक्ष्मदर्शक हवामान (micro climate) निर्माण करता येते. ही पद्धती निसर्गातील परिसंस्थेची तत्त्वे आपल्या शेतप्रणालीत अनुसरते जातात. स्थानिक साधनांमध्ये रुजलेल्या शास्त्रोक्त चौकशी व प्रयोगांच्या गंभीर अनुप्रयोगांमार्फत कापनी करते.

उपवने व फळबागांची निगा राखणार्‍या माळ्यांसाठी, natueco शेती हे एक उत्तम साधन आहे. मोठ्या प्रमाणावरील शेतीसाठी ही पद्धत योग्य नाही. ही कार्यपद्धती कदाचित अन्नसुरक्षिततेच्या बाबतीत योगदान देत असेल. तथापि हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, ही पद्धत कुणपजलाकडून एक महत्त्वाचा घटक घेते-तो म्हणजे आंबवलेले अमृतजल. अशा रीतीने अमृतजल हा या पद्धतीतील एक घटक कुणपजलाचाच एक प्रकार आहे.

 

या पद्धतीमध्ये चार प्रमुख घटक आहेत : बीजामृत (बीजांवर उपचार), जीवामृत (microbial culture) आच्छादन (mulching-कुजलेल्या पाल्याचे आवरण) आणि वाफस (मातीचे वायुविजन /soil aeration). पालेकर सांगतात की, जीवामृत हे पुढे चर्चेत आलेल्या वृक्षायुवेर्द यातील कुणपजलासारखे आंबवलेल्या सूक्ष्म जिवांचे कल्चर आहे. ते पोषकतत्त्वे पुरविते आणि मातीत असलेल्या गांडुळांसहित इतर सर्व सूक्ष्म जिवाणूंच्या हालचालींना बढती देण्यासाठी उत्प्रेरकाचे काम करते.

ही आंबवण्याची प्रक्रिया 48 तास चालू असते. त्यादरम्यान गायीच्या शेणातील व गोमुत्रातील एरोबिक व एनरोबीक जिवाणू जसजसे सेंद्रिय पदार्थांचे अपघटन करू लागतात, तसतशीत् यांची झपाट्याने वाढ होऊ लागते. (कडधान्याच्या पिठासारखी) लागवडीखाली न आलेल्या जमिनीवरील मूठभर मातीसुद्धा त्यात स्थानिक मायक्रोफ्लोरा म्हणून घातली जाते. रोपांवर जे बुरशीजन्य किंवा जिवाणू रोग लागतात, त्यांचाही जीवामृत प्रतिकार करते. पालेकर सल्ला देतात की, जीवामृताची गरज, पहिल्या तीन वर्षांत अवस्थांतर करतानाच भासते; त्यानंतर ही प्रणाली स्वयंपूर्ण बनते. जिवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर पाणी एकाला कडीपिंपात भारतात आणि त्यात पुढील साहित्य मिसळतात : 10 किलो ताजे स्थानिक गाईचे शेण, 5 ते 10 लिटर जुने गो मूत्र, 2 किलो उसाचा गूळ, 2 किलो कडधान्याचे पीठ व मूठभर लागवडीखाली न आलेली माती. हे मिश्रण 48 तास सावलीत आंबवले जाते. 200 लिटर जीवामृताचे मिश्रण एक एकर जमिनीस पुरते असे आढळून आले आहे. महिन्यातून दोनदा पाण्याच्या सिंचनामार्फत किंवा 10% पानांवरील फवारणीतून जीवामृत पिकांवर लावले जाते.

 

  1. बीजामृताचा उपयोग बीजसंस्कार किंवा मुळे बुडविण्यासाठी केला जातो. मॉन्सून नंतर सर्वसाधारणतः माती व बियांतून जे रोगकारक जंतू मातीत पसरतात. त्यापासून नवशिक्या मुळांचे संरक्षण करण्यात बीजामृत परिणामकारक आहे. त्यातील साहित्य जीवामृतासारखेचआहे : स्थानिक गाईचे शेण व गोमूत्र, चुना आणि माती. कुठल्याही प्रकारच्या बियांवर पेरणीपूर्वी बीजामृत हातांनी चोळून मग त्यांना उत्तम प्रकारे वाळवले जाते. कडधान्यांच्या बिया पटकन बुडवून लगेच वाळवाव्या लागतात.
  2. आच्छादन (संस्कृतात आच्छादन म्हणजे झाकणे) म्हणजे कुजलेल्या पालापाचोळ्याचे झाकणे- mulching. पालेकर (2005,2006) सांगतात की,

मल्चिंगचे तीन प्रकार आहेत :

. म्हणजे वाफ ओलावा (vapour moisture) सर्वसाधारणतः अशी समजूत असते की, झाडांच्या मुळांना खूप पाणी लागते. या कल्पनेस पालेकर आव्हान देतात या रीतीने, ते सिंचनावरील अवलंबनावर प्रश्न उठवतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, मुळांना वाफेची गरज असते. ज्यावेळी मातीमध्ये हवेतील व पाण्यातील रेणू (air and water molecules) हे दोनीही उपस्थित असतात, तेव्हा त्या अवस्थेस वाफस असे म्हणतात. सिंचन भरदुपारी माध्यन्हाच्या वेळी करावे आणि ते एक सोडून एका चरात करावे, या विचारास पालेकर उत्तेजन देतात.

अंगारा (पवित्र राख) : यात वटवृक्षाच्या (एक पवित्र वृक्ष) तळाखालची 15 किलो माती मिसळून केलेल्या या मिश्रणाचा मातीतील सजीव जिवाणूंची संख्या वाढविण्यास उपयोग होतो. देशपांडे सांगतात की, अशा प्रकारची माती जैवेकदृष्ट्या समृद्ध असते, कारण त्यात पक्ष्यांंची विष्टा, झडलेली पाने आणि विचित्र ठिकाणी विकसित होणारी मुळे समाविष्ट असतात आणि या सर्वांत पुनर्उत्पादनासाठी आवश्यक्य हार्मोनस व एन्झाईम्स उपस्थित असतात.

2) अमृत पाणी तयार करणे : अमृत पाणी या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे ’अमरत्व’. यासाठी लागणारे साहित्य आहे : स्थानिक जातीच्या गाईचे पाव किलो तूप, दीड किलो मध, देशी गाईचे 10 किलो ताजे शेण आणि 200 लिटर पाणी. सर्वप्रथम गायीच्या शेणात, तूप नीट मिसळावे. नंतर त्यात मध मिसळावा. यात 200 लिटर पाणी मिसळावे. पाणी मिसळत असताना मिश्रण सतत ढवळावे. यातून जे मिश्रण तयार होते त्याला अमृत पाणी असे म्हणतात. हे मिश्रण कौटिल्याने (ख्रिस्तपूर्व 300) सूचित केले होते. एका एकरासाठी 200 लिटर अमृतपान आवशक्य असते. ऊस, हळद, आले इत्यादींना प्रथम अमृत पाण्यात बुडवून मग पेरावे. रोपांची लावणी करण्यापूर्वी त्यांची मुळे अमृत पाण्यात बुडवावीत. उसाला किंवा इतर पिकांना कालव्याचे किंवा विहिरीचे पाणी देताना, पाण्याच्या मुख्य कालव्यात अमृत पाणी मिसळून ते सतत ढवळत राहावे. मॉन्सूनमधल्या किंवा पावसाच्या पाण्यावर वाढणार्‍या पिकांच्या बियांवर संस्कार करावे लागतात. पेरणी झाल्यानंतर माती ओली असताना, ती अमृत पाण्याने चिंब भिजवावी. ती भिजवताना थेट रोपांवर पाणी घालू नये, ते रांगांमध्ये घालावे. मिरची, तंबाखू किंवा फळझाडांच्या रोपांसाठी त्यांच्या सभोवताली ओली करण्यासाठी पाणी लागते, त्याऐवजी अमृतपान वापरावे, अशी शिफारस केली आहे. अमृतपाणी अतिप्रमाणात वापरले गेले तरी ते हितकारकच असते; नवशिक्या रोपांना त्यामुळे कुठलीही ईजा होणार नाही.

अग्निहोत्राच्या लाभदायक प्रभावामागे काही वाजवी करणे आहेत. आज आपल्याकडे जे ज्ञान आहे, त्यातून उघड होते की, अग्निहोत्राच्या भागात जी सामग्री वापरली जाते, तिच्या धुरातून वातावरणात जैवरासायनिक पदार्थ (biochemicals) सोडले जातात आणि या पदार्थात वातावरणातील हानिकारक जैवप्रदूषकांचा (bio pollutants) नायनाट क रण्याची क्षमता आहे. 

परांजप्यांचे अनुयायी सांगतात की, होमाची उपचारपद्धती अनुसरून बियांवर संस्कार केले, तर त्यांची कीटक व रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते आणि यामुळे सुरवातीपासूनच त्यांना प्रोत्साहन मिळते. अंगणात किंवा लहान शेतांमध्ये लागवड करण्यासाठी :- 1) बियांना कपात किंवा बरण्यात ठेवावे आणि प्रत्येकावर बियांच्या नावाचे लेबल लावावे. 2) बियांवर गोमूत्र लावून त्या 2 तास भिजवाव्यात. गोमूत्र लावण्याचे प्रमाण बियांच्या आकारावर व प्रकारावर राहील. मोठ्या आकाराच्या बियांना गोमूत्र लावून 2 तास ठेवावे आणि लहान आकाराच्या बियांना एक तास ठेवावे. 3) बियांना बाहेर काढल्यावर अर्धवट वाळवण्यापूव, गायीच्या ओलसर शेणात व अग्निहोत्राच्या राखेत बुडवावे. त्यानंतर हे मिश्रण चिरडावे आणि पेरावे.

पंचगव्य

पौराणिक काळापासून हिंदू लोक ताज्या पंचगव्याचे उपयोग व सूत्रीकरण, याविषयी ऐकत आले आहेत.(ख्रिस्तपूर्व 200 ते इस 750).घराची शुद्धी, मृत्यूनंतरची शुद्धी, इत्यांदीसाठी याचा उपयोग केला जातो. उसाचा गूळ व नारळाचे पाणी यासारख्या सहाय्यकांचा उपयोग करून, तयार केलेल्या, आंबवलेल्या उत्पादनाचा उपयोग पीकशेतीत अलीकडेच होऊ लागला आहे.

डॉ. के. नटराज (अध्यक्ष, rural community -action center- rc-c,कोडूमुदी, तमिळनाडू) डॉक्टर असून ते स्वामी जीवानंदांचे शिष्य आहेत. फुकोओका व कार्सन यांनी लिहिलेली पुस्तके वाचल्यानंतर, पंचगंव्याचा उपयोग करावा, असे त्यांना वाटू लागले. सेंद्रिय शेतीविषयक सिद्धांत व संकल्पना विविध नावांखाली विकसित व लोकप्रिय झालेआहेत. उदा. सेंद्रिय शेती, हरितकल्चर, नैसर्गिक शेती आणि ऊेपेींहळपस षरीाळपस इत्यादी. जाणकार जनता आता विषारी पदार्थांपासून मुक्त असलेल्या अन्न उत्पादनांची मागणी करू लागली होती. बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे सेंद्रिय चळवळीला अधिक चालना मिळाली. या सर्वकारणानं, नटराजन यांनी शेतीत पंचगव्य वापरण्यास सुरवात केली.

पंचगव्याची शिफारस सर्वसाधारणतः सर्व पिकांसाठी केली जाते. 3% स्तरावर फवारणीत (100 लिटर पाण्यात 3 लिटर पंगव्य), सिंचनाच्य पाण्यात (एका हेक्टरसाठी 50 लिटर), बिया वलागवडीची सामग्री बुडविण्यासाठी किंवा बियांचा साठा करण्यापूर्वी पंचगव्याचा उपयोग करता येतो.

झाडांची मुले सेंद्रिय खतांपेक्षा रासायनिक खते अधिक जलद गतीने शोषून घेतात, अशी सर्वसाधारण मान्यता आहे. मऊ आणि अर्धवट वाळलेली सेंद्रिय खते शेतात पसरल्यास असे होते. कुणपजलाच उपयोग इतर सेंद्रिय खतांहून वेगळा होतो. कुणपजल द्रव पदार्थ असल्यामुळे ते अल्पावधीतच मुळांपर्यंत जाऊन पोचते. दुसरे म्हणजे, कुणपजलातील घटक आंबवलेले असल्यामुळे त्यातील जड- वस्तूंचे (प्रथिने,चरबी इत्यादी) आधीच अपघटन झालेले असते आणि त्या सुलभ कमी आण्विक वजनाच्या उत्पादनात परिवर्तित झालेल्या असतात. त्यामुळे कुणपजल पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या सेंद्रिय वस्तूपेक्षा अधिक जलद गतीने झाडांपर्यंत पोचते. प्राचीन भारतीय ऋषी व शेतकर्‍यांनी कठोर परिश्रम घेतले व मुख्यतः बारमाही रोपांसाठी परिणामकारक सेंद्रिय खते तयार करून त्यांचा वापर केला. सौम्य कुणपजलाची फवारणी हा एक आधुनिक उपक्रम आहे.

सर्व प्रकारच्या कीटकांवर आणि खासकरून लुपर सुरवंटावर (सुरवंटांच्या 3 मुख्य जाती आहेत :- hyposidra talaca, h. infixaria आणि buzura suppressaria) नियंत्रण ठेवण्यासाठी पानांवर इंदसफारीची फवारणी करावी. polygonum aviculare हे एक प्रकारचे तण असून, त्याच्या देठावर सुजलेले knobby joints असतात. हे तण, उत्तर पूर्वेतील राज्यांत चहाच्या मळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. या तणसुद्धा गोमुत्राचा वापर करून आंबवले जाते. यातून तयार झालेले द्राव red spider mites या कीटकांचा नाश करण्यासाठी फवारले जाते. चहावरील डासांवर (tea mosquitoes) ताबा ठेवण्यासाठी परमार यांनी vitex negundo किंवा clerodendrum infortunatum चे आंबवलेले द्राव तयार केले. पश्चिम बंगाल, उत्तर- पूर्वेकडील राज्ये व नेपाळ या स्थानी ही रोपे रस्त्याच्या कडेने वाढताना दिसतात. हे मिश्रण helopeltis theivora या कीटकावर नियंत्रण ठेवण्यात फार परिणामकारक आहे.

 

कंपोस्ट टी 

ब्रेहोट 1933 दावा करतात की, कंपोस्ट टी तयार करण्याची कार्यपद्धती प्राचीन रोमन,ग्रीक व इजिप्शियन काळापासून चालत आलेली आहे. काटोख्रिस्तपूर्व 234-149 आणि प्लायानी इ स 23-79 यांची नावे दस्तावेजकार म्हणून नमूद केली जातात. या ’इतिहासाची’ सत्यात सिद्ध करणारा कोणताही तपशीलकृषी वाड्मयात उपलब्ध नाही.

1990 च्या दशकाच्या उत्तराधार्त कंपोस्ट टीला उत्तेजन मिळाले. हे विशेष संज्ञा व हे खास तंत्र सुप्रसिद्ध मुद्रा शास्त्रज्ञ डॉ. एलन इंघम यांनी विकसित केले. पाश्चिमात्य देशातील शेतकर्‍यांमध्ये कंपोस्ट टीचा वापर लोकप्रिय झाला आहे. कंपोस्ट टी हा एक द्रवरूपी अर्क असून तो तयार (आंबवलेला) कंपोस्टमधील पोषक तत्त्वे व सूक्ष्मजीवांनी युक्त असतो. माती सुधारण्यासाठी किंवा पानांवर फवारणी करण्यासाठी याचा वापर करतात. वायुवीजनाद्वारे पोषक तत्त्वे व सूक्ष्मजिवांचे अपक्षालन करून कंपोस्ट टी तयार करता येते. बरेचदा भिजत ठेवण्याच्या प्रक्रियेत त्यात इतर पोषक तत्वे मिसळली जातात. असे झाले कि हितकारक पोषक तत्त्वे व सूक्ष्मजीवांची पुनरुत्पत्ती होण्यास मदत होते. सूक्ष्म जीवांचे पोषण करण्यासाठी त्यात काकवी घातली जाते. 

ज्या सेंद्रिय खताला रोग प्रतिबंधक लसीने युक्त करून सूक्ष्मजिवाणूंच्या लसीने आंबविले गेले, त्यात लॅकटोबॅसिलस अकटोनोमायसेटस, फोटो सिंथेटिक बॅक्टेरिया आणि यीस्ट यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याशिवाय अमिनो आम्ल व सेंद्रिय आम्ल या माध्यमिक संयुगांची तीव्रता उच्च प्रमाणात दिसून आली. अमोनियमच्या स्वरूपात 0.1 % मिनरल नायट्रोजन, 0.1 % उपलब्ध फॉस्फरस आणि 10 चा उ : छ गुणित्तार दिसून आले. 

परिणामी सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेणे हे खचितच एक असे तंत्रज्ञान आहे ज्याच्या लक्षणीय योग्यतेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातील अव्यक्त सामर्थ्य एका शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी अत्यंत आशाजनक असल्यामुळे त्याला दुर्लक्षून चालणार नाही. सजीवसृष्टी शुद्ध असावी, असा वाद घालणारे पुढे वाद घालतात कि, मातीमध्ये एच् मिसळले तर मातीच्या नैसर्गिक घटकांमध्ये बदल होईल. स्तहनिक सूक्ष्मजंतू व पोषक तत्वे स्थानभ्रष्ट होतील व त्यामुळे वनस्पतीच्या स्थानिक जातींवर विपरित व हानिकारक परिणाम होतील हे खरे असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच यासाठी मातीच्या बांधणीवर अधिक संशोधन आवश्यक आहे व ते स्थानिक स्तरावर झाले पाहिजे. मित्रांनो हा लेख आपन वाचा आणि विचार करा कि आपल्या शेती बद्दल शास्त्रज्ञांनी अभ्यास केला व मार्गदर्शन केले.

 मिलिंद जि गोदे

English Summary: Recently recommended to support organic farming in India Published on: 05 December 2021, 09:33 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters