1. कृषीपीडिया

वाचा हळद पिकामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? अणि त्यावरील योग्य उपाय

सध्या ऊन आणि पाऊस असे वातावरण सारखे बदलत असल्यामुळे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वाचा हळद पिकामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? अणि त्यावरील योग्य उपाय

वाचा हळद पिकामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? अणि त्यावरील योग्य उपाय

सध्या ऊन आणि पाऊस असे वातावरण सारखे बदलत असल्यामुळे हळद पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.कंदकूज (गड्डे कुजव्या):- हा बुरशीजन्य रोग असून, त्याला रायझोम रॉट असेही म्हणतात.

भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन या रोगांस पोषक असते.Heavy black, hard and poorly drained soil is favorable for these diseases.ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो

राज्यातून पावसाची एक्झिट कधी? आता दिवाळी पण पाण्यात जाणार का? हवामान खात्याने सांगितली तारीख

.लक्षणे:- कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर लक्षणे त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीत कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते. 

नियंत्रण:- प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.रोगाची तीव्रता जास्त असल्यास, हळदीच्या बुंध्याभोवती कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी आळवणी करावी.आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा.आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा.गरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी.कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम किंवा

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे चिकट पदार्थ (स्टिकर) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी मिसळून फवारावे.पावसाळ्यात शेतामध्ये पाणी साचू नये, यासाठी चर घ्यावा. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे.पानांवरील ठिपके (करपा/ लिफ स्पॉट)करपा हा बुरशीजन्य रोग असून, कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो. वातावरणात सकाळी धुके व दव पडत असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात

प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.लक्षणे:- अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्‍यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. वाळून गळून पडते.नियंत्रण:- मॅंकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी करावी. जास्त दिवस धुके राहिल्यास, पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून १५ दिवसांच्या अंतराने करावी.

 

स्रोत - IPM school 

English Summary: Read Which diseases are affected in turmeric crop? And the right solution to it Published on: 19 October 2022, 02:43 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters