सर्वात महत्वाचे तन नाशक हे दुधारी शस्त्र आहे यात चुकीला माफी नाही यासाठी तणनाशक काळजी पुर्वक शेतकरी बांधवांनी शेतात समक्ष हजर राहुन वापर केला पाहीजेयात चुकले तर चुकीला माफी नाही हे लक्षात असु दया.आता आपन तणनाशकाचे प्रकार पाहुया1 निवडक तणनाशक (सिलेक्टीव )हि तणनाशके ठरलेल्या पिकाचे नुकसान न करता फक्त तणे नष्ट करतात उदा .इमीडा थाईपर. परशुट ( सोयबीनसाठी ) गोल .( कांदासाठी ) अल्ट्राझीन ( मका बाजरी ज्वारी उस या पींकानसाठी )बिगर निवडक ( नॉन सिलेक्टीव )हि तणनाशके पीक व तण दोनही वर परीनामकरुन
नष्ट करतात ( जे हिरवे असेल ते तणनाशक नष्ट करतात त्यामुळे यांचा वापर फार सावधानतेने करावाउदा . ग्लायसेल (राउड अप )टेराकोट डायकलोराईट (ग्रामोकसोन)परत निवडक तणनाशकमध्ये २ प्रकार आहेतउगवणी पुर्व (प्री इमरजन्स )उगवणीनंतर ( पोस्टइमर्जन्स तणनाशक वापरतांना द्यावयाची काळजी१ )तणनाशक वापरतांना शक्यतो स्प्रे.पंप . वेगळा वापरा२ ) तणनाशक फवारणी करतांना गढूळ पाणी वापरू नये यामुळे त्याचे योग्य परीनाम येत नाही३ )तणनाशकाचा वापर तज्ञांच्या सल्ला घेउन पुर्ण माहीती घेउनच वापर करावा चुकीला माफी नाही४ )तणनाशक वापरतांना फ्लड जेटमोझल व पीकात हुडचा वापर करावा.
कापुस तणनाशक नियोजनकापुस लागवड झाल्यानंतर जमीनीत असता ७२ तासाच्या आता ३ दिवसा अगोदर चौथ्या दिवसी नाहीखालील प्रमाने तणनाशक वापरावेपंपाला साधारण ३० मी ली (एकरी ३०० मी ली ) हिटवीड व त्याबरोबर टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर पंपाला ४० मी ली वापरावे (पण आता हे उगवनी पुर्वतंत्र शक्य नाही कारण जवळ जवळ कापुस लागवड होऊन उगवन झाली आहे )कापुस पीक६ते ८ पानांचे वरती गेल्यावर व तण.२ते ३ पानांचे असतांनाहिट वीड३०मी ली व ४०मी ली टरगा सुपर किंवा व्हीप सुपर१५ लीटर पाण्यात टाकुन फवारणी करावी (एकरी !३००मीली .औषध फवारले गेले पाहीजे )कापुस मोठा झाल्यावर फक्त तणावर कापुस पिकावर पडून न देता हुडचा वापर करूनफवारणी करु शकत असाल तर गया गायफोसेट (राउंड अप ) पुर्ण काळजी घेउन वापरू शकतातकापसात तुरीचे पाटे/वखर/चाचे असल्यामते सोडावे लागतील म्हणजे त्यावर तणनाशक पडले नाही पाहीजे
सोयाबीन-सोयाबीन १२ते १५ दिवसानंतर जमीनीत ओल असतांना1इमझाथाईपर ( परशुट ) ची फवारणी करावी2 सोयाबीन १२ते २५ दिवसाचे दरम्यान जमीनीत ओल असतांना.साकेद हे तणनाशक८०मी ली प्रतीपंप ( १५ लीटर ) वापरावे3 सोयाबीन पीक१२ते २५ दिवसांचे दरम्यान फक्त ४ ग्रॅम प्रतीपंप ओडीसी वापरावेमका- पेरणीनंतर १५ते २० दिवसांनी टिंजर३0मी ली प्रती एकर व ५०० ग्रॉम ( अर्धा किलो ) अल्ट्राझीन प्रती एकर वापरावेपेरणीनंतर १५ते २० दिवसांनी लाऊडीस११५ ग्रॅम व ५०० ग्रॅम ( अर्धा कीलो ) अल्ट्राझीन प्रती एकर वापरावेतणनाशक वापरतांना काळजी द्यावी ते दिलेल्या प्रमामातच वापरावे अन्यथा चुकिला माफी नाही फार मोठे नुकसान होते.
श्री प्रा दिलीप शिंदे सर
9822308252
Share your comments