1. कृषीपीडिया

ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा

सातारा जिल्ह्यातील सुनील मिळशेटे यांची आदर्श नियोजनातील शेती सातारा जिल्ह्यातील काही भाग डोंगरी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा

ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा

सातारा जिल्ह्यातील सुनील मिळशेटे यांची आदर्श नियोजनातील शेती सातारा जिल्ह्यातील काही भाग डोंगरी आहे. या भागात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. विहीर असूनही पाण्याअभावी हंगामी शेती करावी लागते. त्यामुळे अनेकजण उदरनिर्वाहासाठी मुंबईचा रस्ता धरतात. मात्र, मरळी येथील सुनील शंकर मिळशेटे यांनी पॉलिमल्चिंग व ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून यंदाच्या दुष्काळात आपल्या शेतीत सकारात्मक चित्र निर्माण केले आहे. 

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी वांगी, सोयाबीन, शाळू व भात पिकवला आहे.By properly planning the available water, they have grown brinjal, soybeans, shallots and rice.

हे ही वाचा - असे करा नागअळी चे व्यवस्थापन वाचेल मोठी मेहनत

विहीर असूनही पाणी नसल्यामुळे 2011 मध्ये त्यांनी बोअरवेल घेतले, त्याला दीड इंच पाणी लागले; मात्र ते एकसारखे येत नसल्यामुळे पाण्याची शेततळ्यात साठवणूक करून ते ठिबकद्वारे व सायफनद्वारे शेताला दिले. खरिपात सोयाबीनचे बीजोत्पादन त्यांनी घेतले आहे. चार गुंठ्यांत बेडवर घेतलेल्या कांद्याचे एक टनापर्यंतचे उत्पादन मिळाले होते, त्याची हातविक्री केली. रब्बी हंगामात एक एकरात

शाळू घेतला. यात 13 क्विंटल उत्पादन मिळाले. शाळूची व्यापाऱ्यांना विक्री न करता ती थेट ग्राहकांना विकली, त्याला प्रति क्विंटल दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर मिळाला. केळीची फेब्रुवारीत 2012 मध्ये लागवड केली आहे. यंदा वादळामुळे नुकसान झाले असले तरी आतापर्यंत काही उत्पन्न हाती आले आहे. केळीस सायफन पद्धतीने पाणी दिले जाते. पूरक भाजीपाला म्हणून अळू असून त्याची आठवड्याला विक्री केली जाते.मल्चिंगवर व ठिबकवर वांग्याची लागवड मिळशेटे यांच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष कायम असल्याने

त्यांनी पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने व चांगले उत्पादन मिळावे यासाठी पॉलिमल्चिंग पेपरचा वापर करण्याचे ठरवले, त्याला ठिबक सिंचनाची जोड दिली. गावात पॉलिमल्चिंगचा हा पहिलाच प्रयोग होता. सुमारे 12 गुंठे क्षेत्र त्यासाठी निवडले. लागवडीचे नियोजन करताना सुरवातीला दोन ट्रेलर शेणखत वापरले. त्यानंतर रासायनिक खत, गांडूळ खत व सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीत मिसळून बेड तयार केले. त्यानंतर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले. त्यानंतर रोपांची लागवड केली. आवश्‍यकतेनुसार 19-19-19, 12-61-0, 0-52-34 व सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचनाद्वारे दिली. 

पाणी व्यवस्थापन वांग्याची रोपे दोन महिन्यांची असेपर्यंत ठिबकद्वारे प्रति दिवस एक तास पाणी दिले, त्यानंतर प्रति दिवस दोन तास पाणी दिले जाते. उन्हाची तीव्रता वाढल्यावर पंपाद्वारे पाण्याच्या फवारण्या दिल्या. बोअरवेलमधून पाणी उपसा केल्यावर एकसारखे पाणी येत नाही, त्यामुळे 20 बाय 20 बाय 10 फूट क्षेत्रफळाचे छोटे शेततळे तयार केले आहे, त्यात पाण्याची साठवणूक केली जाते. अन्य पिकांना सायफन पद्धतीने पाणी दिले जाते.पीक संरक्षण - फुलकळी सुरू झाल्यावर वांग्यावर शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्या वेळी

रासायनिक फवारणी घेऊन किडीचे नियंत्रण केले. पांढरी माशी नियंत्रणासाठीही फवारणी घेतली, सापळ्यांद्वारेही किडीचा प्रादुर्भाव रोखला. मिळशेटे यांच्या शेती नियोजनाची वैशिष्ट्येझाडांवर फळांचा भार येऊ नये, फळे जमिनीस टेकू नयेत यासाठी तार- काठीचा वापर करून रोपे बांधली.वांगी निरोगी राहण्यासाठी गोमूत्राचा वापरखते ठिबक सिंचनाद्वारे दिली जातात.गावात प्रथमच ठिबक सिंचन व पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला.पाणी साठवणुकीसाठी छोटेखानी शेततळे गांडूळ खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांवरही भर

मिळशेटे यांच्याकडून शिकण्यासारखेवांगी तसेच अन्य भाजीपाला बाजारपेठेचा अंदाज घेऊन विक्रीचे नियोजन आठवडा बाजारात विक्री केली जात असल्याने आडत, हमाली यांसारख्या खर्चात बचतदुग्ध व्यवसायाद्वारे पूरक उत्पन्नदरवर्षी सोयाबीन बीजोत्पादन. एकरी सुमारे सात ते दहा क्विंटल उत्पादन घेतले जाते, त्याला किलोला 60 ते 70 रुपये दर मिळाला आहे. यंदाही बीजोत्पादनाचे नियोजन.पीक संरक्षणात घरच्याघरी स्टिकी ट्रॅप (चिकट सापळे) तयार केले जातात. पिवळ्या कागदावर ग्रीस लावून तो शेतात लावला जातो.

 

संपर्क -सुनील मिळशेटे - 9765790955

संकलन - विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)

English Summary: Read the rewarding success story of eggplant farming and rich income on drip Published on: 21 September 2022, 02:31 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters