आपन कधी विचार केला काय की पहील्या पडणार्या पावसाच्या सरी पडल्या की संपूर्ण वातावरण सुगंधमय होऊन जातो कुठून येतो हा गंध आपणास माहीत आहे का?तर
पावसांत काही जादू नाही ना ? मातीचा गंध पावसाचे थेंब पडल्यानंतर का तयार होतो? काय तथ्य असेल या सर्व प्रश्नाच्या उत्तराचे या लेखाच्या माध्यमातून उलगडा करूया!आपन कधी मातीची परीभाषा जाणली का ?सुश्म निरक्षन केले तर लक्षात येईल आपल्याला जरी माती वरून कोरडी दिसत असले पण माती आतून ती ओलावा असतो.याच ओलाव्यामुळे जमिनिच्या आत करोडो जीवाणू वास करत असतात पण काही ठराविक जिवाणुंमध्ये ‘असिनोमायसेटिस’ नावाचा जीवाणू असतो.तो जिव जीवाणू जमिनीत पोकळी करून राहतो.
जेव्हा पाऊस नसतो आणि जमीन वाळलेली किंवा कोरडी असते तेव्हा हा जीवाणू मातीचे कवच स्वतःभोवती तयार करून राहतो. पहिला पाऊस पडला ना पडला की ते मातीचे कवच हवेत उधळतात आता या गोष्टीला निसर्गाची लिलाच मानावे लागले.जीवाणू जेव्हा पहिल्या पावसाच्या थेंबांच्या संपर्कात येतात. तेव्हा त्यांची अभिक्रिया होते. उन्हाळ्याच्या तापलेल्या माती मधे पाऊस पडला की त्या पाण्याचं बाष्प हे एरसोलसारखं काम करत असते हे च एरसोल मानवी नाकापर्यंत पोहोचले कि. त्यातूनच भिजलेल्या मातीचा गंध आपल्याला सुखावुन जातो.आता एरसोल म्हणजे काय?हा प्रश्न पडला असेलजीवाणू जेव्हा पहिल्या पावसाच्या थेंबांच्या संपर्कात येतात. तेव्हा त्यांची अभिक्रिया होते.त्यानंतर जीवाणू पुन्हा जमिनीवर पडतात. तेच जीवाणू पन्हा हवेच्या बुळबुळ्यांमध्ये रुपांतरित होतात. हे बुळबुळे हवेत पसरतात. नंतर ते फुटतात. त्याचे बारीक कण होतात.
त्या कणांना एरसोल म्हणतात. हा असिनोमायसेटिस हा जीवाणू जमिनीत सगळीकडे आढळतो. सहाजिकच आहे की पहील्या पावसातच मातीचा सुगंध येतो.हा जीवाणू ओलसर भागात वाढतो. तर पहिल्या पावसात मातीचा सुंगध येणास असिनोमायसेटिस नावाचा जीवाणू चे कार्य आहे.थोडक्यात पावसाच्या सरी ज्यावेळी आकाशातून खाली बरसतात याच वेळी वातावरणातील अनेक रसायने त्या सरीमध्ये मिसळतात. त्याचा परिणाम असा होतो की, पावसाचं पाणी आम्लधर्मी होतं. तेच पावसाचं पाणी मातीवर पडतं, त्या मुळेअभिक्रिया घडून येते. त्यातून आपलाला एक वेगळा सुगंध येतो.या एक शिवाय पावसामुळे प्रकारचा वेगळा सुगंध तयार होतो. हा वास वनस्पती व झाडे जे तेल उत्सर्जित करतात त्यापासून निर्माण होतो.
हे वनस्पतींनी उत्सर्जित केलेले तेल खडकावर पडले कि त्या तेलाची सेंद्रिय व इतर रसायनांशी म्हणजे गॅसोलिनशी अभिक्रिया होते आणि वायू उत्सर्जित होतो.
हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. पण या मधे काही गोष्टी अजुन ही बाकी आहे ती म्हणजे माती आपल्यासाठी पाण्या एवढीच महत्त्वाची असते. पाणी आपली तहान भागवते तर माती आपली भूक शांत करते. तर शुद्ध हवा आपल्याला जगवते. पण फुकट मिळणा-या या तिन्ही गोष्टींची शुद्धता राखण्याऐवजी त्यांच्या विनाशाचाच आपण आजवर विचार केला, त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढय़ांना भोगावे लागणार आहेत हे शाश्वत सत्य आहे.
Save the soil all together
विचार बदला जिवन बदलेल
मिलिंद जि गोदे
9423361185
Share your comments