जिवाणू हा शेतीतील आत्मा आहे. अलिकडे उचांकी उत्पादन घेण्याचे फ्याड प्रत्येक शेतकऱ्यास लागले आहे. हो ते योग्य देखील आहे. त्यासाठी तो संकरित बियाण्याकडे वळत आहे, हेही गरजेचे आहे कारण संकरित वाणा मध्ये अतिरिक्त, उत्पादन देण्याची क्षमता असते.महत्वाची बाब म्हणजे या सर्व पिकातील संकरित वाणांची अन्न द्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता व गरज ही सुद्धा देशी वाणा पेक्षा जास्त असते. या कारणास्तव कित्येकदा बऱ्याच अन्न द्रव्यांची कमी कमतरता या पिकांमध्ये व मातीमध्ये दिसून येते.यावर उपचार म्हणून आपण माती परीक्षण अवालानुसार रासायनिक खतांचा वारेमाप वापर चालू केला. अतिरिक्त खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला, सामू वाढला . जमिनी क्षारपड झाल्या.
नंतर परत आम्ही माती परीक्षण केले तेंव्हा असे लक्षात आले की आपल्या जमिनीतील मातीत पिकाला लागणारे सर्व अन्नद्रव्ये मुबलक स्वरूपात असूनही उत्पादन कमी का झाले?सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या मातीतील सेंद्रिय कर्बाची पातळी अत्यंत खालावली गेली व त्यामुळे सर्व अन्न द्रव्ये घटकांचे स्थिरीकरण व क्षारिय करण झाले त्याचा विपरीत परिणाम होऊन जमिनीचा पी एच वाढत गेला, तो इतका वाढला की मातीतील अन्नद्रव्य पिकास उचलणे अशक्य झाले. थोडक्यात काय तर ताटात आहे पण पोटात नाही अशी अवस्था आपल्या पिकाची झाली आहे.या सर्वावर फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या मातीतील सेंद्रीय कर्ब वाढवणे.
यासाठी आपण जेवढे उत्पादन मातीतून काढतो त्याच्या एक चतुर्थांश भाग आपण आपल्या मातीत सेंद्रिय कर्ब टाकला पाहिजे, म्हणजे जर आपल्याला एकरी १००टण उसाचे उत्पादन अपेक्षित असेल तर किमान २५ टण चांगले कुजलेले शेणखत टाकने गरजेचं आहे.सेंद्रीय कर्बाचे फायदे - मातीत कार्य क्षम जीवाणूंना अनुकूल वातावरण निर्माण होते, जिवाणूंचे खाद्य पदार्थ म्हणजे हा कर्ब असतो, तसेच कर्बा मुळे मातीत ऑक्सीजन उपलब्ध होऊन तोही जीवाणूंना उपलब्ध होतो. मातीच्या दोन कनांमधे अंतर वाढते, त्यामुळे मातीची पाणी धारण क्षमता वाढते.
मातीत हवेतील प्राण वायू, नत्र भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो, शिवाय जमीन वाफसा स्थितित राहिल्याने पाण्यातील हायड्रोजन पिकास उपलब्ध होतो जो पिकास आवश्यक असतो. जमीन वाफसा स्थितीत राहिल्याने पिकाची पांढरी मुळी वाढते त्यामुळे अन्न द्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते, मुळीचे कार्य क्षेत्र रुट झोन वाढते.जिवाणू कार्य क्षम होऊन सर्व रासायनिक घटकांचे उपलब्ध स्वरूपात रूपांतर होते.अश्या प्रकारे सेंद्रीय कर्बाचे मातीतील महत्त्वाचे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. मातीचे आरोग्य चांगले तर येणारे उत्पादन चांगले व दर्जेदार मिळेल हे निश्चित.
शिंदे सर
9822308252
Share your comments