प्रत्येक घरात भेडसावणारा सामान्य पण महत्वाचा मुद्दा म्हणजे घरातील वर्षभरासाठी लागणारं धान्य हे कीड मुक्त ठेवणं होय. यासाठी प्राचीन काळापासून ते आताच्या आधुनिक काळात नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत.उन्हात वाळविणे - धान्य उन्हात वाळविणे हा पूर्वापार चालत आलेला व आजही तेवढाच महत्वाचा पर्याय आहे. आता आता पर्यंत धान्य खरेदी हि वर्षातून एकदाच म्हणजे मार्च ते मे च्या सुरुवातीपर्यंत
व्हायची. मात्र आता वर्षभर दुकानात धान्य मिळत असल्याने तसेच
शेतकरी आणि राजकीय षडयंत्र -सत्ताधारी-विरोधक एकाच माळेचे मणी
आताशा हि खरेदी महिन्यापरत किंवा लागेल तशी केली जाते.शेतात तोडणी करतांना दाण्यातील पाण्याचे प्रमाण हे १२ ते १५ टक्क्यापर्यंत असते. त्यामुळे थेट शेतकऱ्याकडून काढणीनंतर लगेचच धान्य खरेदी
करत असाल तर नक्कीच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल. याउलट बाजारातून/ दुकानदाराकडून धान्य खरेदी केल्यास तुलनेने दाण्यातील पाण्याचे प्रमाण कमी असले तरीही ते धान्य पोत्यात भरून एकावर एक असे थप्पी मारून साठवले गेले असल्याने आद्रतेमुळे त्याला कीड लागण्याची शक्यता फार जास्त असते त्यामुळे धान्य कुठूनही घेतले असले तरी ते तीन चार दिवस कडक उन्हात वाळवलेच पाहिजे.
आजही धान्य उन्हात वाळवणे हे इतर पर्यायांपेक्षा जास्त फायद्याचे व विश्वसनीय समजले जाते.धान्यात वायूंचा (fumigant) वापर - आजकाल मेडिकल मध्यें धान्यात ठेवण्यासाठीचे इंजेक्शन मिळतात. ती धान्याच्या कोठीत वरचा भाग हलकासा फोडून रोवली जातात व कोठी हवाबंद झाकणाने बंद केली जाते. इंजेक्शन मधील रासायनिक द्रव्याचे वायू मध्ये रूपांतर होऊन तो वायू पूर्ण कोठीत दरवळत असतो. यामुळे कीड असेल तर ती गुदमरून मरते.
धान्यात कापूराच्या वड्या ठेवणे.काही ठिकाणी धान्यात हळद घातली जाते.कधी संपूर्ण लाल मिरच्या किंवा तिखट व मीठ घालून धान्य साठवतात.काही जण फक्त साधं मीठ वापरतात.कुणी आगपेटीच्या काड्या वापरतात तरकुणी कडुनिंबाचे तेल धान्यात घालतात.लसणाच्या पाकळ्या किंवा ओल्या अद्रकचे कंद कधीतरी वापरले जातात.कधी तुळशीच्या बिया देखील वापरल्या जातात.बरेचदा लवंग सुद्धा वापरली जाते.
विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
Share your comments