1. कृषीपीडिया

वाचा सोयाबिनवरील तंबाखुची पाने खाणारी अळीचे व्यवस्थापन

सोयाबिनवरील तंबाखूची पाने खाणारी अळी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वाचा सोयाबिनवरील तंबाखुची पाने खाणारी अळीचे व्यवस्थापन

वाचा सोयाबिनवरील तंबाखुची पाने खाणारी अळीचे व्यवस्थापन

सोयाबिनवरील तंबाखूची पाने खाणारी अळी बहुभक्षीय किड असुन या किडींचा मादी पतंग सोयाबिन पीकावर पानाच्या खालच्या बाजुने ८० ते १०० अंडयाच्या पुंजक्यात अंडी घालतो. अंडयातून ३ ते ४ दिवसात अळया बाहेर पडतात व अळया सामुहीकपणे पानातील हरीतद्रव्य म्हणजे हिरवा पदार्थ खातात व त्यामुळे पाने जाळीदार दिसतात आणी या किडीचा प्रादुर्भाव दूर अंतरावरून सहज

ओळखता येतो. किडग्रस्त जाळीदार पानाच्या मागे पुष्कळ लहान अळया एकाच पानावर दिसतात.Many small larvae appear on a single leaf behind an infested webbed leaf. तृतीय अवस्थेपासून अळया अलग अलग होवून सोयाविनचे पाने खातात व तिव्र प्रादुर्भावात झाडाला पाने शिल्लक राहत नाही व फक्त पानाच्या शिराच दिसतात. क्वचित प्रसंगी तिव्र प्रादुर्भावात या किडीची अळी कोवळी शेडे, फुले व शेंगा सुध्दा खाते व पिकाचे अतोनात नुकसान होते. ही अत्यत खादाड व

बहुभक्षीय किड असून सोयाबिन व्यतीरिक्त कापुस, डाळवग्रीय पीके, सूर्यफुल, मका, एरंडी, उडीद, टोमॅटो, मिरची या सारख्या पीकात सुध्दा तीचा प्रादुर्भाव आढळून येतो.चांगला पाउस झाल्यास या किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होवुन तीची संख्या वाढते.सुरूवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोयाबिनवरील तयाच्या पाने खाणा-या अळीची आर्थीक नुकसानीची पातळी लक्षात घेवुन

म्हणजे पीक फुलावर येण्यापुर्वी ३ ते ४ लहान अळया प्रती मिटर ओळीत किंवा त्यापेक्षा जास्त अळया प्रति मिटर ओळीत आढळल्यास खालीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची गरजेनुसार योग्य निदान करून निर्देशित प्रमाणात फवारणी करावी.इन्डोक्सीकार्ब १५.८ एस.सी. ६.६ मिली अधिक १० लिटर पाणी किंवा स्पायनेटोरम ११. ७ एस.सी. ९ मिली अधीक १० लिटर पाणी किंवा फल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्यु.जी. ५ ते ६ ग्रॅम अधीक १० लिटर पाणी किंवा

फल्युबेंन्डामाईड ३९.३५ टक्के एस.सी. ३ मीली अधीक १० लिटर पाणी वर निर्देशित प्रमाणात घेवुन कोणत्याही एका किटकनाशकाची इतर एकात्मीक किड व्यवस्थापनाच्या घटकाचा वापर करून गरजेनुसार व योग्य निदान करून फवारणी करावी. टिप: १. रासायनिक किडनाशके परण्यापूर्वी अद्यावत

लेबलक्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे आर्थीक नुकसानीची पातळी लक्षात घेवुन योग्य शिफारशित प्रमाणात योग्य वेळीच फवारणी करावी.२.अनेक रसायणे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व फवारणी करतांना सुरक्षित किडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा.

मुदतबाहय झालेली किडनाशके व एक्सपायरी झालेली किडनाशके यांची फवारणी टाळावी. ४. प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेवुन किडीचे योग्य निदान करून व आर्थीक नुकसानीची पातळी लक्षात घेवुन लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे किडनाशकांचा वापर करणे केव्हाही हितावह व योग्य असते.

 

राजेश डवरे किटकशास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, करडा (वाशीम)

English Summary: Read Management of tobacco leaf-worm on soybean Published on: 08 August 2022, 09:06 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters