तूर पिकामध्ये बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो.त्यमध्ये शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी किंवा घाटे अळी ही नुकसानकारक कीड आहे.त्याचबरोबर पिसारा पतंग,शेंगमाशी,पाने व फुलांची जाळी करणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव पोथ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. कोणत्याही पिकामध्ये येणाऱ्या किडींचे सुरुवातीपासून एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:- वातावरणातील विविध घटकांचा समन्वय साधत एकमेकास पूरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच
हरभरा पेरताय? यावर्षी मर तर लागणारच जाणून घ्या या समस्येवर हमखास उपाय!
एकात्मिक कीड व्यवस्थापन होय.Integrated pest management is the use of all technologies that complement each other. किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी मशागतीय, यांत्रिक, जैविक व किमान पातळीवर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो.पारंपरिक/मशागतीय पद्धती:- पीक पेरणीच्या अगोदर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी
चांगली नांगरणी करणे गरजेचे आहे. यावेळी नांगरणी केल्यानंतर किडीचे कोष,त्याचबरोबर काही किडींची अळ्या असल्यास त्या उघडे पडतात त्यामुळे पक्षी त्यांना खाऊन टाकतात किंवा उन्हामुळे नष्ट होऊन जातात.शेतामध्ये जुन्या पिकाचे अवशेष असल्यास ते शेताच्या बाहेर नष्ट करणे गरजेचे आहे.यांत्रिक पद्धती:- पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.
शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्य तणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी वेळोवेळी काढून नष्ट करावीत.तूर पीक कळी अवस्थेत आल्यापासून एकरी पाच ते दहा कामगंध सापळे पिकाच्या वर एक फुटी उंचीवर लावावेत. त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावाची पातळी कळू शकेल.जैविक पद्धती: - पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क (5 टक्के) किंवा अझाडिरॅक्टिन (300 पीपीएम) 5 मि.लि.
प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही विषाणूजन्य कीटकनाशक 0.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी सायंकाळी करावी. हे विषाणू अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरात विषाणूची वाढ होते. परिणामी, अळ्या 5-7 दिवसांत मरतात.
रासायनिक पद्धत:- अन्य नियंत्रण पद्धतींचा अवलंब केल्यानंतरही किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक वाढल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
Share your comments