राज्यातील शेतकरी बांधव कापसाच्या शेतीतून चांगली कमाई देखील करत आहेत. मित्रांनो खरे पाहता मजूर टंचाई तसेच दिवसेंदिवस वाढत असणारा उत्पादन खर्च पाहता गेल्या काही वर्षात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट बघायला मिळाली होती.मात्र गत वर्षी कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी निर्माण झाल्याने तसेच देशांतर्गत बाजारात कधी नव्हे ती ऐतिहासिक तेजी पाहायला
मिळाल्यामुळे कापसाला चांगला बाजारभाव मिळाला.Due to this, the cotton got a good market price. यामुळे जाणकार लोकांनी या वर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचा दावा केला होता
हे ही वाचा - भाजीपाल्यावरील किडींच्या प्रादुर्भावाकडे आताच लक्ष द्या
आणि झालं देखील तसच कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र या वर्षी उल्लेखनीय वाढले आहे.दरम्यान कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठ एक अतिशय आनंदाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार या वर्षी कापसाला
सोन्यासारखा बाजार भाव मिळणार आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने कापसाला यावर्षीदेखील सुगीचे दिवस येणार आहेत.देशांतर्गत कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचा जाणकार लोकांकडून दावा केला गेला
आहे शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. अमेरिकेत पडलेला दुष्काळ आणि पाकिस्तान सारख्या प्रमुख कापूस उत्पादक देशात निर्माण झालेली पुरसदृश्य परिस्थिती पाहता कापसाच्या उत्पादनात यावर्षी घट होणार आहे.आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, भारतात गत वर्षापेक्षा यावर्षी कापसाचा
लागवडीखालील क्षेत्र तब्बल नऊ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र असे असले तरी सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस या मुख्य पिकाला मोठा फटका बसला असून कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जागतिक बाजारात महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने कापसाच्या बाजार भावात देखील तेजी येणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.
Share your comments