मागील महिन्यापासून बाजारात कांद्याचे दर चढेच होते; परंतु आता मार्चच्या सुरुवातीपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर कमी झाले असून आगामी कालावधीत हे दर आणखी गडगडणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बाजारात १५० गाडय़ा आवक होत असून प्रतिकिलोला १०-१९ रुपये बाजारभाव आहेत.
पावसाळी कांद्याच्या हंगामात पावसाने खो घातला होता, त्यामुळे पावसाळी कांद्याच्या पावसाळी कांद्याच्या पिकावर पाणी फेरले होते,
मार्चमध्ये उन्हाळी नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात होते, त्या वेळी कांद्याच्या दरात घसरण होत असते. मात्र या वेळी कांदा लागवड अधिक झाल्याचे बोलले जात असून, आता उत्पादन वाढत आहे. मात्र साठवणूकदार ही कृत्रिम दराची घसरण करीत असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. एपीएमसी बाजारात आधी १०० गाडी आवक होती ती आता १५० गाडय़ा दाखल होत आहेत. बाजारात आवक वाढली आहे आणि मागणी कमी आहे.
त्यामुळे दर उतरले आहेत. आधी बाजारात २०-३३ रुपयांवर असलेले कांदे आता १०-१२ रुपयांनी घसरण होऊन आता १०-१९ रुपयांवर आले आहेत. पुढेही दर आणखीन कमी होणार आहेत . मात्र ही कृत्रिम घसरण आहे, जेणेकरून शेतकरी त्यांचे कांदा उत्पादन लगेच विक्रीला काढेल आणि साठवणूकदार कमी भावाने कांदे खरेदी करून साठवणूक करतील आणि नंतर कांद्याची टंचाई भासेल आणि दर वधारतील तेव्हा हे साठवणुकीचे कांदे विक्रीला काढले जातात,
असे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी संयम ठेवून कांदे विक्रीला काढावे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
मार्चमध्ये उन्हाळी नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात होते, त्या वेळी कांद्याच्या दरात घसरण होत असते. मात्र या वेळी कांदा लागवड अधिक झाल्याचे बोलले जात असून, आता उत्पादन वाढत आहे.
Share your comments