सध्या पावसाने विश्रांती घेतली असून शेतकऱ्यांना (farmers) मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान टाळायचे असेल तर तुम्हाला या गोष्टीं माहीत असणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे पावसाळ्यात गुलाबाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो, त्यामुळे कित्येक शेतकरी गुलाबाची शेती करतात. मात्र पावसाळ्यात गुलाब पिकाची काळजी न घेतल्यास त्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
हे ही वाचा
50 Thousand: शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्या आणि 50 हजार रुपये जिंका; जाणून घ्या पिकस्पर्धा योजनेबद्दल
पावसाळ्याच्या दिवसात गुलाबाच्या झाडाला बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्यामुळे गुलाबाची देठ, पाने आणि मुळे कुजतात, त्यामुळे पावसाळ्यात गुलाबाच्या झाडाला वेळोवेळी कडुनिंबाच्या तेलासारखे बुरशीनाशक (Fungicides) वापरावे लागते. आणि कडुलिंबाचे तेल वापरावे.
हे ही वाचा
Rain Condition: मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पाऊस खरीप पिकांसाठी फायद्याचा ठरेल का? जाणून घ्या
जर तुम्ही पावसापूर्वी गुलाबाच्या (rose) रोपाची छाटणी करू शकला नाही, तर रोपाचे नुकसान होऊ शकते. म्हणून गुलाबासाठी, वेळोवेळी मृत टोके आणि कोणत्याही कुजलेल्या किंवा कोरड्या फांद्या ४५-अंशाच्या कोनात कापून घ्या.
यामुळे त्याच्या तिरपे कापलेल्या भागावर पाणी साचत नाही आणि झाडे संसर्गाला बळी पडत नाहीत. तुम्ही या पद्धतीचा वापर करून गुलाब शेतीचे पावसामुळे होणारे नुकसान टाळून चांगले उत्पादन घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
Tur Rates: शेतकऱ्यांचे अच्छे दिन; तुरीच्या दरात मोठी वाढ, पहा आजचे बाजारभाव
Crops Diseases: फळबाग आणि भाजीपाला पिकांवर रोग; काय कराल उपाय? जाणून घ्या...
Animal Husbandry: पशुपालकांनो सावधान! जनावरांना होतेय विषबाधा; 'या' वनस्पतीपासून ठेवा लांब, जाणून घ्या
Share your comments