या दिवसात सध्या सोयाबीन आणि कापसाला चांगला बाजरभाव मिळत आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. आता रब्बीतला पहिला हरभरा देखील थेट बाजारात पोहचला. खुल्या बाजारातले दर पाहून हरभरा उत्पादक शेतकरी निराश असल्याचे दिसते.
ज्या हरभऱ्याचा पहिला पेरा झाला होता तो हरभरा आता शेतकऱ्यांनी थेट बाजारात आणला आहे.
सध्या हरभऱ्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये
सरासरी मिळत आहे.
हरभऱ्याचे हमीभाव केंद्र-
जसे तुरीचे हमीभाव केंद्र आहेत तसेच हरभऱ्याचे देखील हमीभाव केंद्र आहे. सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नंतर तुम्ही हरभऱ्याची विक्री हमीभाव केंद्रावर करू शकता.
हरभऱ्यासाठी केंद्र सरकारने 5 हजार 300 रुपये दर ठरविला आहे. शेतकरी वर्गाला हे माहीत असणे गरजेचे आहे की खुल्या बाजारांपेक्षा हमीभाव केंद्रावर चांगला दर मिळतो.
सध्या हरभऱ्याच्या पहिला पेरा आताशी हरभरा बाजारात येतोय ही सुरुवात आहे त्यामुळे आणखी दर वाढणार आहेत.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. आता रब्बीतला पहिला हरभरा देखील थेट बाजारात पोहचला. खुल्या बाजारातले दर पाहून हरभरा उत्पादक शेतकरी निराश असल्याचे दिसते.
हरभऱ्यासाठी केंद्र सरकारने 5 हजार 300 रुपये दर ठरविला आहे.
Share your comments