
proper method of use of chemical fertilizer use for crop
शेतामध्ये शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु बऱ्याचदा शेतकरी बंधू रासायनिक खते वापरताना ती किती प्रमाणात वापरावी व केव्हा वापरावे? याचा थोडासाही विचार करीत नाहीत. असे केल्याने बर्याच प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
कधीकधी खात टाकण्याचे प्रमाण जास्त झाले तरत्याचे पिकांना नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे या खताचा वापर करताना तो कसा करावा? त्याचे प्रमाण किती असावे? याबद्दल या लेखातून माहिती घेणार आहोत.
डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी-
1- डीएपी हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे क्रमांकाचेखत आहे.
2- डीएपी हे खत पिकांच्या पेरणीच्या अगोदर किंवा पेरणी झाल्यानंतर लावली जातात. या खताच्या वापराने पिकांचीमुळांचा विकास होतो. कारण यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.
3- जर डीएपी चा वापर केला नाही तर पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही व त्यांच्या आकारमानात देखीलप्रमाणबद्धता येत नाही. ही क्रिया
नैसर्गिक रित्या होण्याला बराच वेळ लागतो.
4- या खतांमध्ये 46% फॉस्फरस आणि 18% नायट्रोजन असते.
5- अलीकडे सरकारने डीएपी खताच्या अनुदानात 137 टक्के वाढ जाहीर केली आहे.
डीएपी वापरण्याची पद्धत
आपण डीएपी चा वापर प्रति हेक्टर वनस्पतींच्या संख्या इतकाकरू शकतो.उदाहरणार्थ एका हेक्टरसाठी 100 किलो डीएपी वापरता येते.
एनपीके
1- कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे की एनपीके खत डीएपी पेक्षा चांगले आहे कारण ते जमिनीतील आम्लता आणत नाही.
2- त्यांची वाढ संतुलित होण्यासाठीपोषक द्रव्यांची नितांत आवश्यकता असते. ज्यामध्ये नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर त्यांचा समावेश आहे.
3-नायट्रोजन खतामध्ये अमोनियम नायट्रेट आणि अमोनिअम सल्फेट यांचादेखील समावेश होतो.
4-पोट्याशियम खतांमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि चिल सल्फेट यांचा समावेश होतो.
5- फोस्पेटिक खतांमध्ये सुपर फास्फेट, ट्रिपल फॉस्फेट यांचा समावेश होतो.
6-4:2:1 हे एन पी के गुणोत्तर जमिनीच्य आरोग्यामध्ये सुधारणा करते आणि पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा फायदा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढते.
एनपीके वापरण्याची पद्धत
एक टन धान्य तयार करण्यासाठी झाडांना प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो नायट्रोजनवापरणे आवश्यक आहे.याचा अर्थ असा होतो की एक टन धान्य तयार करण्यासाठी दुप्पट किंवा 30 ते 40 किलो नत्र प्रति हेक्टर आवश्यक आहे.
युरिया
1- पिकांच्या वाढीस चालना देण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये नायट्रोजन असल्याने तिथेही ताजीतवानी राहतात व लवकर वाढतात.
2- युरिया हा शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
3- सर्व प्रकारच्या पिकांसाठी आणि जमिनीतील माती साठी युरिया हे सर्वोत्तम खत आहे.
हे नक्की वाचा-स्वतःच्या शेतातल्या मातीचे करा स्वतः परीक्षण,अवघ्या 90 सेकंदात मिळेल अहवाल
युरियाचा वापर कसा करावा?
जर तुम्हाला युरिया शेतामध्ये वापरायचा असेल तर तो तुमच्या शेता नुसारच त्याचा वापर करू शकतात.( किलो/ हेक्टर मध्ये खताची मात्रा= किलो/ हेक्टर पोषकतत्व ÷ खतातील पोषक घटक ×100)त्याच वेळी एका अंदाजानुसार दोनशे पाऊंड युरिया प्रति एकर वापरला जातो.
निम लेपित युरिया
1- नीम कोटेड यूरिया: नायट्रिक फिकेशन गुणधर्मासाठी निम तेलाने युरियाची फवारणी केली जाते.
2-युरिया पासून नायट्रोजन काढण्याची प्रक्रिया कडुलिंबाच्या पेस्ट द्वारे शोधली जाते आणि नायट्रोजनच्या वापराची कार्यक्षमता वाढते.
3-नीम कॉटेड युरिया धान,मका, सोयाबीन, ऊस इत्यादी पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवते.
Share your comments