1. कृषीपीडिया

Dragon fruit cultivation! अशा पद्धतीने करा ड्रॅगन फ्रुट ची लागवड

ड्रॅगन फ्रुट निवडुंग प्रकारातील वनस्पती असून आहे. एक विदेशी फळ पीक असून याचे लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकाहे आहे.जगातील बऱ्याच देशांमध्ये याची लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट भारतात येऊन पोहोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र,कर्नाटक, तामिळनाडू,केरळ आणि गुजरात राज्यामध्ये काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करत आहेत. या लेखात आपण ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
dragon fruit crop

dragon fruit crop

 ड्रॅगन फ्रुट निवडुंग प्रकारातील वनस्पती असून आहे. एक विदेशी फळ पीक असून याचे लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ  हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकाहे आहे.जगातील बऱ्याच देशांमध्ये याची लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट भारतात येऊन पोहोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र,कर्नाटक, तामिळनाडू,केरळ आणि गुजरात राज्यामध्ये काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करत आहेत. या लेखात आपण ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.

ड्रॅगन फ्रुट ची लागवड

  • ड्रॅगन फ्रुला लागणारे हवामान:

आपल्या येथील हवामान उष्ण कटिबंधीय असल्यामुळे या फळपिकासाठी योग्य आहे. वीस ते तीस सेंटीग्रेड तापमान, जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आणि शंभर ते दीडशे सेंटिमीटर पाऊस  या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहे.  दिवसा जर सर्वात कमी आणि अधिक तापमान हे पिकाच्या वाढीसाठी हानिकारक आहे. जास्त पावसामुळे या फळपिकाची फुल आणि फळगळ होते.

  • जमीन:

तसे पाहता हे पीक विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होणारी जमीन अधिक योग्य असते.वालुकामय चिकन माती सोबत अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमीनया पिकास अधिक पूरक आहे. जमिनीचा सामू हा साडेपाच ते साडेसात असला पाहिजे.

  • ड्रॅगन फ्रुटचे अभिवृद्धी:

याची अभिवृद्धी ही कटिंग आणि बियांपासून केली जाते. बियांपासून अभिवृद्धी केल्यास झाडांमध्ये वेगळेपणा दिसून येतो. त्यामुळे ही पद्धत प्रचलित नाही. ड्रॅगन फ्रुट च्या अभिवृद्धीसाठी व्यवसाय कृपया कटिंग्स ही पद्धत वापरली जाते.

  • ड्रॅगन फ्रुट लागवड पद्धत:

जमिनीची दोन-तीन वेळा खोल नांगरणी अशी करावी की जमीन भुसभुशीत होईल.दोन झाडातील अंतर तीन बाय तीन मीटर असावी. 40 ते 45 सेंटिमीटर उंचीचे  आणि तीन मीटर रुंदीचे गादीवाफे तयार करावेत.  साधारणतः प्रति हेक्‍टरी 1200 ते 1300 सिमेंटचेपोलउभारावेत.पोलहा बारा सेंटीमीटर रुंद आणि दोन मीटर उंच असाव्यात. पोल जमिनीत गाडते वेळेस साधारणतः 1.4-1.5 मीटर उंची ही जमिनीचा वर असली पाहिजे. चांगल्या उत्पन्नासाठी दोन ते तीन वर्षे जुनी,आरोग्यदायी आणि 45 ते 50 सेंटिमीटर उंच असलेल्या रोपे निवडावीत.पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे जून जुलै महिन्यात लागवड करावी.लागवड ही सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस करावी. प्रति पोलचाररोपेया प्रमाणे लागवड करावी.

  • पाण्याचेनियोजन:

या काळात पिकाला बाकी फळपिकाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. काही महिन्यापर्यंत हे पाण्याचा ताण सहन करू शकते. पण फळधारणेच्या अवस्थेत एका आठवड्यात दोन वेळेस पाणी द्यावे.परंतू उन्हाळ्यात 1-2 लिटर पाणी दररोजप्रति झाड द्यावे.

  • खत व्यवस्थापन:

अधिक उत्पन्नासाठी या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात. सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. पण नंतरच्या काळात स्फुरद आणि पालाश यांची मात्रा अधिक प्रमाणात द्यावी लागतात.

  • छाटणी करणे-

लागवडीपासून दोन वर्षानंतर हलक्या प्रमाणात  छाटणी करावी.रोगट व वाकड्यातिकड्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी.तीन वर्षानंतर झाडाला छत्रीसारखा आकार द्यावा.छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावा.

  • रोगवकिडव्यवस्थापन:

या पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. पिठ्या ढेकूण हा काही प्रमाणात आढळतो. त्यासाठी नुवान दीडमिली प्रति लिटर पाणी  याप्रमाणे फवारणी करावी. याला काही प्रमाणात पक्षापासून नुकसान होऊ शकते.त्याचे यापासून रक्षण करावे.

 

  • काढणीतंत्र:

लागवड केल्यानंतर 18 ते 24 महिन्यानंतर फळ येण्यास सुरुवात होते फोन आल्यानंतर तीस ते पन्नास दिवसात फळ परिपक्व होते. फळाचा रंग हा अपरिपक्व अवस्थेत हिरवा असतो. नंतर तो परिपक्व अवस्थेत बदलत जाऊन लाल किंवा गुलाबी होतो. फळे लागण्याच्या कालावधी हा तीन ते चार महिने चालतो.या कालावधीमध्ये फळाची छाटणे तीन ते चार वेळेस केली जाते.

  • ड्रॅगन फ्रुट पासून मिळणारे उत्पन्न:

एका फळाचे वजन साधारणतः 300 ते 800 ग्रॅम असतो आणि एका झाडाला वर्षात साधारणतः 40 ते 100 फळे येतात. एका वर्षाला एका झाडापासून  ( एक पोल चार झाड ) 15 ते 25 किलो इतके उत्पन्न मिळते.

English Summary: process of dragon fruit cultivation and management Published on: 10 October 2021, 01:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters