गेल्यावर्षी जुलै महिन्यात केळीचे पीक घेतल्या नंतर कोणतीही पूर्व मशागत, नांगरट न करता केळीच्या आहे त्या सरी मध्येच 6/1.5या अंतरावर 15ऑगस्टला रोप लावण किलो. केळीचे सर्व अवशेष खुंट,पाने जागेवर कुजवले.त्यामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले.त्याचा परिणाम ऊसाच्या वाढीवर दिसून आला.त्यामुळे सुरुवातीच्या काळात खतांचे डोसेस कमी करावे लागले. रेग्यूलर सगळे डोसेस दिले असते तर केळीचे बेवड असल्यामुळे पोक्का बोइंगची येण्याची भीती होती.रोप लावण केल्यानंतर 15/20दिवसांनी रोपे सेट झाल्यानंतर एकरीं 2dap,1युरीया , 1अमोनियम सल्फेट,1पोटॅश असे रासायनिक खतांची मात्रा देतो.परंतु या प्लॉटला खते देत असताना 1ला डोस 30दिवसांनी दिला, व तो देत असताना 50टक्के रासायनिक खतांची मात्रा कमी करून दिले.त्यामध्ये एकरीं 1 बॅगdap, 22.5किलो युरीया, 25किलो अमोनियम सल्फेट,25किलो पोटॅश व खोडकिडीच्या नियंत्रणा साठी फरटेरा 4किलो दिला.
केळीचा बेवड,ऊसापासून 1वर्षभर विश्रांती, ऊसाला पोषक असा पीक फेरपालट, व जागेवर केळीचे अवशेष कुजवल्याने जमिनीत भरपूर ताकत आली होती.3.5महिन्याच्या कालावधीत खताचा एकच डोस दऊन सुद्धा भरपूर प्रमाणात फुटवा झाला होता. त्यामुळे ऊसाची विरळणी करणे गरजेचे होते. ज्यावेळी ज्यादा फुटवा होतो त्या वेळी मी ऊसाची बालभरणी करणे टाळतो.कारण बालभरणी करून संख्या अचूक नियंत्रित करता येत नाही. तसेच बाळभरणी केल्यानंतर ऊसाची विरळणी करता येत नाही. मातीची भर लागल्या मुळे ऊस तळातून न मोडता वरून मोडतो व मोडलेला कोंब परत फुटून येतो. त्यामुळे ज्या ज्या वेळी फुटवे जादा येतात त्यावेळी मी बाळभरणी न करता 105ते 120दिवसानी फुटव्यांना कांडी तयार झाल्यावर विरळणी करतो.याच्या पेक्षा लवकर विरळणी करायला गेलो तर ऊस व्यवस्थित मोडता येत नाहीत.
6/1.5या अंतरा वरती रोप लावण केलेली होती. ऊसाच्या एका बेटा मध्ये 9ऊसाची गरज होती, परंतु प्रत्यक्षात एका बेटामध्ये 16ते 18 संख्या होती. एका बेटा मध्ये 16ऊस जरी धरले तरी एकरीं 77000 हजाराच्या आसपास ऊस होते. त्यामुळे विरळणी करण्याचा निर्णय घेतला. व 6/1.5या अंतरावरती एका स्क्वेअर फुटाला 1ऊस या हिशेबाने एका बेटा मध्ये चांगले सशक्त 9ऊस ठेवले. व अन्न खाऊन मरून जाणारे एक एकर मधून 33000 अतिरिक्त ऊस काढुन टाकले.ऊसाची विरळणी करून घेतल्या नंतर 15 दिवसांनी (रोप लावण केल्यापासून4महिन्याने) पॉवर टिलर च्या सहाय्याने एकाच वेळीच रिवर्स रेझर घालून मोठी बांधणी केली. या चार महिन्यात केळीची सर्व अवशेष कुजून गेले होते. यावेळी रासायनिक खतांचा दुसरा डोस एकरीं 2पोती 12/32/16, 22.5किलो युरीया,25किलो अमोनियम सल्फेट व 1बॅग पोटॅश व 4किलो फरटेरा दिले.
केळीचा बेवड मध्ये ऊसाचे पीक घेत असताना सुरुवातीच्या 4/5 महिन्या पर्यंत रासायनिक खतांचा विशेषतः नत्राचा वापर अतिशय कमी केला .कारण नत्रयुक्त खतांचा जादा वापर केल्यामुळे पोक्काबंग या रोगाचा प्रसार केळीचे बेवड घेतलेल्या ऊस पिका मध्ये जादा प्रमाणात दिसून येतो.त्यामुळे केळी काढून ऊस करायचे असेल तर सुरुवातीच्या 5/6महिन्या पर्यंत अतिशय कमी प्रमाणात रासायनिक खते टाकली पाहिजेत.जास्त जर जोर लावला तर पोक्काबोइंगचा मोठ्या प्रमाणात अटॅक येतो.ऊसाची मोठी बांधणी होई पर्यंत खतांचे दोनच डोस टाकले.तसा पहिला डोस 50टक्के कमी करूनच टाकला होता.म्हणजे ऊसाच्या मोठ्या बांधणी पर्यंत मी फक्त 1.5डोस टाकले. केळीचा बेवड असल्यामुळे कमी खते टाकून सुद्धा रेग्युलर रासायनिक खते
टाकून जसा ऊस येतो त्याच्यापेक्षा हा प्लॉट सरस होता.को 86032चा बियाणे प्लॉट असल्यामुळे कृषी खात्याच्या शिफारशी नुसार याला रासायनीक खते देणे आवश्यक होते. त्यासाठी नत्र हे 9हप्त्या मध्ये तर स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रवे 2हप्त्या मध्ये देण्याची शिफारस आहे.त्यानुसार एका एकरला नत्र :-267, स्फुरद:-90,पालाश:-90अशी शिफारस आहे. बेणे मळ्याला नत्र युक्त खते जास्त द्यावी लागतात, परंतु पोक्का बोइंग च्या भीतीने सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये अतिशय कमी खते दिली.त्यामुळे पोक्काबोइंगचा प्रादुर्भाव अजिबात जाणवला नाही.मोठी बांधणी होईपर्यंत 2वेळा रासायनिक खते दिले होते.त्यमधून नत्र,=42.7किलो,स्फुरद=78किलो पालाश=61किलो दिले होते.त्यानंतर शिफारशीनुसार राहिलेली सर्व खते 6ते 9महिन्याच्या दरम्यान दिली.
शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999,
मोबा79 7261 1847
Share your comments