1. कृषीपीडिया

Prickly Pear : निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा

निवडुंग हा वनस्पतीचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतीची वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. त्यामुळे कोरड्या किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची क्षमता वाढते.

निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा

निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा

निवडुंग हा वनस्पतीचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतीची वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. त्यामुळे कोरड्या किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची क्षमता वाढते. निवंडूगाच्या अनेक प्रकारातील फड्या निवडुंग हा एक प्रकार यालाच हिंदीमध्ये नागफणी व इंग्रजीमध्ये प्रिकली पीअर (Prickly pear) असे म्हणतात.

या मासंल वनस्पतीची पर्णकांडे (पानाचे कार्य करणारी चापड खोडे) सपाट व अंडाकृति-आयात असून त्यांवर २५ काट्यांचे पुंजके आढळतात. फड्या निवडुंग काट्याने भरलेला असला तरी त्याचे आरोग्यवर्धक भरपूर लाभ आहेत. फड्या निवडुंग हे कार्यात्मक अन्न म्हणून वापरले जाते. तसेच औषधी व अन्न असा दुहेरी उपयोग या फड्या निवडुंगाचा करता येतो.

फड्या निवडुंगांमधील पोषक घटक

फड्या निवडुंगमध्ये सक्रिय पोषक घटके व बहुकार्यात्मक गुणधर्मे आढळतात. जीवनसत्व ब, क आणि लोह, कॅल्शियम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम व तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात. फड्या निवडुंगमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात .यामुळेच याला "हिरवे सोने" आणि "काटयांमागचा खजिना" असे संबोधले जाते. फड्या निवडुंगाची लागवड ही विशिष्ट वापरावर आणि उद्देशावर अवलंबून असते म्हणजे भाजीपाला, फळे किंवा चारा यासाठी लागवड केली जाते.

काटेरी जातींसह काटेविरहित निवडुंगाची लागवड फायद्याची ठरते. जुलै -सप्टेंबर आणि फेब्रुवारी-एप्रिलमध्ये शेतात फड्या निवडुंगाची लागवड करता येते. परंतु ग्रीन हाऊसमध्ये ते वर्षभर लागवड करता येऊ शकते. जास्तीत जास्त रोपे ही जुलै – सप्टेंबर दरम्यान वाढीस येतात.

फड्या निवडुंगाच्या लागवडीनंतर लगेचच भरपूर पाणी देण्याची आवश्यकता नसते. साधारण २-३ दिवसांनी हलके पाणी देता येते. असे दर १०-१५ दिवसांनी वर्षभर पाणी देता येते. पावसाळ्यात सिंचनाची आवशक्यता नसते. पावसाच्या पाण्यावरसुद्धा चांगल्या वाढीचा व दर्जाचा फड्या निवडुंग वाढतो.

फड्या निवडुंगाचे फळ हे हंगामी असते. त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते नाशवंत असते. त्यामुळे ते ऋतूबाहेरील काळात उपलब्ध व्हावे याकरिता प्रक्रिया करणे आवश्यक आहे. फड्या निवडूंगाचे आरोग्यदायी महत्त्व जाणता सध्या मानवी आहारात जास्तीत जास्त उपयोग होण्याकरिता नवीन काटेविरहित फड्या निवडुंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याकरिता विविध तंत्रज्ञानाचा वापर करून विविध मूल्यवर्धित उत्पादने व पद्धती विकसीत झाल्या आहेत.

चांगला आर्थिक नफा

विविध प्रकारच्या प्रक्रिया केलेले उत्पादने जसे की जॅम, जेली ,कँडी ,रस ,नेक्टर, सिरप,सुकवलेले फळे, मद्य, लोणचे, कोशिंबिर आणि भाज्या अशी विविध उत्पादने बनवून त्यातुन चांगलया आर्थिक उत्पादनाच्या संधी उपलब्ध होतात. तसेच अन्नपदार्थ जास्त दिवस टिकवून गरजेनुसार त्याचा आहारात समावेशसुद्धा करता येतो.

महत्त्वाच्या बातम्या :
कांदा दराचा प्रश्न मिटणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ठरवली रणनिती
Skymet : वेधशाळेचा अंदाज आला रे; महाराष्ट्रात असा असणार मान्सून...

फड्या निवडुंगाची भाजी

फड्या निवडुंगाची भाजी करण्यास सोपी व आरोग्यदायी आहे. त्यामुळे आज आपण फड्या निवडुंगाची भाजी कशी करतात हे बघूया.
भाजीसाठी लागणारे साहित्य : फड्या निवडुंगाची काटेविरहित काप, कांदा, लसूण,जिरे-मोहरी, सौफ, लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर व फोडणी करीता तेल.

कृती
प्रथम फड्या निवडुंगाचे मध्यम ते मोठे आकारचे पान घ्यावे. त्यावरील काटे सुरीच्या साह्याने काळजीपूर्वक काढून घ्यावीत. काटे काढल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करावेत. काप स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत, धुतल्यामुळे काप चिकट होतात त्याकरिता ते सुती कापडावर ठेवावेत. आता कढईत तेल घ्यावे त्यात जिरे-मोहरी, चिरलेला कांदा, लसूण, सौफ घालून फोडणी घालावी.

त्यानंतर त्यात फड्या निवडुंगाची बारीक काप घालावेत. व्यवस्थित काप परतुन घ्यावेत. चवीनुसार लाल तिखट, आमचूर पावडर व मीठ घालावे. व्यवस्थित सर्व एकजीव करावे. कापातून पाणी सुटते त्याच पाण्यात काप शिजवून घायवेत अशाप्रकारे झटपट फड्या निवडुंगाची पौष्टिक भाजी खाण्यास तयार आहे.

लेखक : श्रीमती.सोनाली सिद्धार्थ सावंत
सहाय्यक प्राध्यापिका,
तंत्रज्ञान अधिविभाग (अन्न तंत्रज्ञान विभाग),
शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर ७०२०१२१२९३.

English Summary: Prickly Pear: Cultivate Nivdunga; And make millions Published on: 12 April 2022, 06:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters