भारतामध्ये रब्बी हंगामामध्ये गहू ज्वारी, बाजरी, मक्का इत्यादी प्रकारचे पिके घेतली जातात. त्यात गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. गव्हाच्या उत्पादनामध्ये भारताचा अव्वल क्रमांक लागतो. गव्हाचे भरघोस उत्पन्न येण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे कधीही फायद्याचे असते. ते तंत्रज्ञान कोणते ते आता पाहू.
हवामान व जमीन
साधारणतः गव्हाच्या पिकाला रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान विशेष करून चांगले मानवते. जर गव्हाच्या पिकाला कमीत कमी शंभर दिवस थंडीचे मिळाले तर गहू पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी त्याचा उपयोग होतो. पीक जेव्हा वाढीच्या अवस्थेत असते तेव्हा जर तापमानात अचानक वाढ झाली तर पीक लवकर फुलावर येऊन उत्पन्नात घट होण्याचा संभव अधिक असतो. गावासाठी साधारणतः काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. तसेच भारतामध्ये पीक हलक्या आणि मध्यम जमिनीत सुद्धा चांगल्या प्रमाणे येते.अशा हलक्या आणि मध्यम जमिनीत जर आपण खते, रासायनिक खतांचा आणि पाण्याच्या पाळ्या सुद्धा अधिक दिल्या तर गव्हाचे पीक चांगली होऊ शकते. गव्हाच्या शेतीसाठी कोरडवाहू जमीन असेल तर ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीची निवड करणे आवश्यक असते.
हे पण वाचा: गव्हाच्या 'या' वाणांमधून वाढणार शेतकऱ्यांचे उत्पन्न ; महाराष्ट्रासाठी कोणते वाण आहे उपयुक्त
गहू पिकासाठी पूर्वमशागत
आपण पाहिले की, गव्हाच्या पिकासाठी मध्यम आणि हलक्या जमिनीची सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत असणे जरुरीचे असते कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे, पाण्याची व्यवस्थित शोषण होते. खरिपाचे पीक निघाल्यावर लोखंडी नांगराने खोलवर नांगरट करावी. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. जमिनीची दोन वेळा चांगल्या प्रकारे कुळवणी करावी.
गव्हाची पेरणी कशी कराल
गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यात तरी अडीच क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर केलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. बागायती गहू वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास, जमीन ओलित करून घ्यावी. नंतर वापस आला तेव्हा जमीन कुळ वावी. साधारणतः पेरणीसाठी प्रति हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि बियाणे दोन चाड्याच्या पाभरीने २२.५ सेंटीमीटर अंतराने पेरावे. पाभरीने पेरणी करावी त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.
पेरणी करताना कसे कराल खत व्यवस्थापन
पेरणी करताना प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद म्हणजेच ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४० किलो पालाश म्हणजेच ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी १३० किलो युरिया प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी. पेरणीसाठी तपोवन( एन आय ये डब्ल्यू- ९१७), गोदावरी( एन आय ए डब्ल्यू- २९५), त्र्यंबक( एन आय ए डब्ल्यू- २९५) इत्यादी वान बागायती क्षेत्रासाठी करण्यासाठी वापरावे. कोरडवाहू गहू पेरणीसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रात ओलावा टिकून राहण्यासाठी प्रत्येक चांगला पाऊस पडल्यानंतर कुळवाची पाळी द्यावी. त्यामुळे त्यांचादेखील बंदोबस्त करण्यास मदत होते. पेरणीची योग्य वेळ साधनेही भरघोस उत्पन्न न देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गमक आहे.
कोरडवाहू पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते. पेरणीच्या वेळेस सर्व साधारणपणे १० ते २० अंश सेल्सिअस तापमान असते व या तापमानात गहू बेण्याची उगवण चांगली होते.गहू पिकाचा लागणाऱ्या थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो.तो परिणामी फुटव्यांची व ओंबीतील दाण्यांची संख्या कमी मिळते व उत्पन्नात घट होते.पेरणीसाठी बियाण्यांचे प्रमाण हे पेरणीच्या वेळेप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात असते. कोरडवाहू वेळेवर पेरणी करता प्रत्येक एकरी साधारणतः ३० किलो बियाणे लागते किंवा वापरावे. बागायती वेळेवर पेरणी करता प्रति एकरी ४० ते ५० किलो बियाणे वापरावे. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी प्रति हेक्टरी रोपांची संख्या २२.५ ते २५ लाख असणे आवश्यक आहे.
गहू बियाण्यास बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी थायरम हे औषध कमीत-कमी तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे. जीव आणि संवर्धन लावून पेरणी केल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होते. जिवाणू संवर्धन हे बीज प्रक्रिया केल्यानंतर लावावे व बियाण्याची घट्ट चिकटले पाहिजे याची काळजी घ्यावी. त्यासाठी दोन तास अगोदर बियाणे सावलीत वाळवावेत व नंतर पेरणी करावी.
खताचे व्यवस्थापन
माती परीक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा आपण ठरवतो. त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणे गरजेचे असते. गहू पिकास रासायनिक खतांचा पहिला मात्रा पेरणीच्या वेळेस दोन चाड्याची टिफन वापरून बियाणे सोबत द्यावी. बागायती वेळेवर करण्यासाठी १०० ते १२० किलो नत्र ५० ते ६० किलो स्फुरद, ५० ते ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबत द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा पेरणीनंतर २१ दिवसांनी ओलित करताना द्यावी. कोरडवाहू जमिनीत गहू पेरणी करताना नत्र व स्फुरदची पूर्ण मात्रा म्हणजे ४० किलो नत्र २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणी सोबत घ्यावे. पेरणी उथळ म्हणजे पाच ते सहा सेंटीमीटर खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. म्हणजेच अंतर मशागत करणे सोयीचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दाबून टाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गावासाठी २५ ते चार मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
तण व्यवस्थापन कसे कराल
बागायत वेळेवर आणि उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी. गहू पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या साह्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकांची नासाडी जास्त होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे अशा परिस्थितीत नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच भारतीय मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो.
गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन
बघायची गव्हासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाणी व्यवस्थापन करावे. भारी जमिनी करता १८ दिवसांच्या अंतराने सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. हलक्या जमिनीत १० ते १२ दिवसांच्या अंतराने आठ ते दहा पाळ्या द्याव्यात परंतु पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देणे फायद्याचे ठरते.जर एकच पाणी देण्यात येऊन पाणी उपलब्ध असेल तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी दिले इतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.अशा पद्धतीने आपण वरील प्रकरणी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून जर गव्हाचे पीक घेतलं तर उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ होऊ शकते.
Share your comments