1. कृषीपीडिया

गव्हाच्या 'या' वाणांमधून वाढणार शेतकऱ्यांचे उत्पन्न ; महाराष्ट्रासाठी कोणते वाण आहे उपयुक्त

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


नव- नवीन पिकांच्या वाणांमुळे  शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात शास्त्रत्रांचा , संशोधक मोठी भूमिका निभावत आहेत. नव- नवीन पिकांचे वाण विकसित करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात हातभार लावत आहेत.  दरम्यान काही दिवसानंतर गव्हाची पेरणी केली जाईल. गव्हाचे उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  ही बातमी वाचल्यानंतर आपल्या उत्पन्नात भरभराट होईल. कारण संशोधकांनी गव्हाच्या दोन वाण विकसीत केल्या आहेत.

या वाणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अधिक असून उत्पन्नासाठी फार उपयुक्त आहेत. Indian Wheat and Barley Research Institute भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने हे वाण विकसित केले आहे.  दरम्यान या संस्थेचे संचालक डॉ. जीपी सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले कीशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे वाण विकसित करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो.   ऑगस्ट महिन्यातील २४ आणि २५ तारखेला  ग्लोबल  व्हीट इंप्रुव्हमेंट समिटमध्ये नव्या वाणांना मंजुरी मिळाली.  हे वाण अधिक उत्पन्न देणारे आहेत.   देशातील विविध भागानुसार  हे वाण विकसित करण्यात आले आहेत. 

 


दरम्यान यात गव्हाचे ११ आणि एक बार्लीचे वाण आहे.  या  वाणांमधून अधिक उत्पन्न होणार असून याच्या मध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते.  यामुळे पिकांना दुसरे रोग लागण्याचा धोका कमी असतो.  या ११ वाणांमधील दोन वाण असे आहेत की
, त्यांचे उत्पादन अधिक होते.  प्रति हेक्टर ७५ क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन या तीन  वाणांमधून मिळाले  आहे.  यातील ९ वाण हे भारतीय गहू आणि बार्ली संस्था, करनाळने  विकसित केले आहे.  तर चौधरी चरण सिंह कृषी विश्वविद्यालय हिसारने एक वाण विकसित केले आहे.

डॉ. जीपी सिंह यांनी बार्लीच्या वाणांविषयी माध्यमांना माहिती दिली. आधी देशात पिकणाऱ्या बार्लीपासून बिअर उत्पादित केल्या जात नव्हती.  परंतु नव्या वाणातून बिअर उत्पादित केले जाते, यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो. दरम्यान भारतात २९.८ मिलियन हेक्टर क्षेत्रावर गव्हाची शेती केली जाते.

कोणत्या राज्यासाठी कोणते वाण आहे उपयोगी

हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यात गव्हाचे उत्पादन अधिक घेतले जाते.  उत्तर पश्चिम मैदानी क्षेत्रासाठी (NEPZ) हे वाण विकसित केले आहे.  हे वाण पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पश्चिमी उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीरमधील जम्मू आणि कठुआ जिल्हाहिमाचल प्रदेशाच्या ऊना जिल्हा आणि उत्तराखंडसाठी उपयुक्त असून या भागातील वातावरण या वाणासाठी लाभकारक आहे.  यातील पहिले वाण हे 3298 (HD 3298), हे सिंचित जमिनीसाठी आणि उशिराने याची पेरणी केली जाते.  डीडब्ल्यू 187( DBW 187), डीडब्ल्यू 3030 ( DBW 303) आणि डब्ल्यूएच 1270 (WH 1270) या तीन वाणांची पेरणी लवकर केली जाते.

 


उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, आणि पश्चिम बंगालसाठी एचडी 3293 (HD3293) हे वाण विकसित करण्यात आले आहे.   हे वाण सिंचित आणि वेळेवर पेरावे लागते. छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, कोटा आणि राजस्थानच्या उद्यपूर परिसरासाठी, उत्तर प्रदेशाच्या झांशी भागासाठी सीजी1029 (CG 1029) आणि एचआय 1634 (HI 1634) हे वाण विकसित करण्यात आले आहे. वेळेवर या वाणाची पेरणी करावी लागते.  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, आणि तमिळनाडूसाठी डीडीडब्ल्यू 48 (DDW 48), एचआय  1633 (HI 1633) , एनआईडीडब्ल्यू 1149 ( NIDW 1149) हे वाण विकसित करण्यात आले आहे.  वाण डीडीडब्ल्यू 48 (DDW 48) सिंचित जमीन आणि वेळेवर पेरावे लागते. एचआई 1633 (HI 1633)  हे वाण उशिराने पेरावे लागते. तर एनआईडीडब्ल्यू 1149 ( NIDW 1149) हे वाणाचा पेरा हा वेळेवर करावा लागतो.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters