भारत सरकारच्या किटकनाशक बंदी कायद्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी हे जैविक कीटकनाशक स्वता: तयार करावे.1 लिटर तयार करण्यासाठी खर्च फक्त 6 रुपये आहे व 16 लिटर पंपासाठी फक्त 200 मिली घेणे आहे . एका पंपासाठी खर्च 2 रुपये याची माहिती खालील प्रमाणे
कीटकनाशक बनविन्यासाठी लागणारे साहित्य200 लिटर टाकीकडूनिंब व निंबोळ्या पाला – 5 किलोरुई पाला – 2 किलोधोतरा पाला – 2 किलोएरंडपाला – 2 किलोबिलायत पाला – 2 किलोगुळवेल पाला – 2 किलोनिरगुडी पाला – 2 किलोघाणेरी पाला – 2 किलोकणेरी पाला – 2 किलोकरंजी पाला – 2 किलोबाभूळ पाला. – 2 किलोएरंड पाला – 2 किलोबेशरम पाला – 2 किलोसीताफळाचा पाला -2 किलोपपईचा पाला – 2 किलो
यापैकी कडूनिंब गारवेल रुई करंजी सीताफळाला पाला महत्त्वाचा Among these, Kadunimb Garvel Rui Karanji Sitaphalala Pala is importantबाकीचे सर्व उपलब्ध असतील त्यानुसार घेणे सर्व मिळून 10 वनस्पती होणे गरजेचे आहे हे सर्व 200 लिटर टाकीमध्ये पाणी घेऊन त्यात वरील सर्व वनस्पती बारीक करून घेणे साधारण वीस दिवस घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळणे 30 दिवसानंतर उग्र वास आल्यानंतर 16 लिटर पाण्याला
200 मिली फवारणी साठी वापरकता येईल.कीटकनाशक मावा, तुडतुडे, थ्रिप्स, अळी यांच्यावर प्रभावी काम करते याची फवारणी शक्यतो दर आठ दिवसाला करावी.प्रमाण:- 16 लिटर पंपासाठी 200 मिलीह्याच बरोबर काही जीवाणू तसेच बुरशी प्रमाणित प्रयोगशाळेतून आणावे लागतात.उदा. वर्टीसिल्लेयाम लुकानी, बीवेरिया
,माईक्रोराईझा, मेटाराईझम . यांची विक्री दर वेगळे उपलब्ध आहेत.(प्रयोग शाळेवर अवलंबून आहे)अशा प्रकारच्या निविष्ठा वापरल्यास खर्चात बचत होते व उत्पादनात 20% वाढ होते.हा माझा अनुभव आहे मित्रो हो निसर्गाने आपल्याला भरपूर दिलंय त्याचा वापर करणे हे आपल्याच हाती आहेमला एक सागा रासायनीक शेती आपल्या खिशाच्या बाहेरचा विषय होऊन बसला आहे भाऊ
म्हणून म्हणतो जैविक शेती करा, विष मुक्त शेती करा, नैसर्गिक शेती करा कारण कि हाच विषय खिशाला व आरोग्याला साभाळतो.त्यासाठी स्वतः बनविन शिका कोणत्याही रासायनीक किंवा जैविक किवा सेंद्रिय कम्पनि कडून स्वतःची व आपल्या शेतकरी मित्राची लूट होऊ देऊ नका सर्व शेतकरी बांधवापर्यंंत माहिती पोचवा हि विंनती
शरद केशवराव बोंडे
जैविक शेतकरी
९४०४०७५६२८
Share your comments