1. कृषीपीडिया

कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक व नकारात्मक परिणाम

KJ Staff
KJ Staff

शेती करणं बोलणं सोपं वाटतं, पण शेतीतील एक उत्पन्न घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पेरणीनंतर लागवड, त्यानंतर पिकांची देखभाल म्हणजेच कीड व्यवस्थापन, मग कापणी त्यानंतर आपल्याला पीक मिळत असते. पण अधिक चांगले आणि अधिक उत्पन्न हवे असेल तर आपल्याला कीड व्यवस्थपानावर लक्ष्य देणं आवश्यक असते. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी आवश्यक असते. परंतु या फवारणीचे काही सकारात्मक काही नकारात्मक परिणाम असतात. त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत..

कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक

 • पिकावर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० टक्के झाडांवर खोडकिडी बोंड अळ्या आणि पाने गुंडाळणाऱ्या व खाणाऱ्या अळ्या यांचा उपद्रव पाच टक्के व त्यापुढे असल्यास रासायनिक कीटकनाशक फवारावे अन्यथा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

 • शेतकऱ्यांनी शेतीसाठी कीटकनाशक आवरून सुमारे ८ रुपये खर्च केल्यास त्याला जवळपास ४० रुपये इतका फायदा होतो.

 • मावा व तुडतुडे या किडी वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस राहत असल्यामुळे  कीटकनाशकांची फवारणी पानाचे मागील बाजूस करावी. त्याचप्रमाणे भात व ज्वारी या पिकांवर तुडतुडे व मीजमाशी रोखण्यासाठी अनुक्रमे बुंध्याकडील भागांवर व कणीसावर फवारणी करावी.

 •  रस शोषणाऱ्या किडीसाठी आंतरप्रवाही तर वनस्पतींचे भाग खाणाऱ्या कीटकांसाठी स्पर्शजन्य कीटकनाशके वापरावीत.

 • पेरणीपासून ते उगवणी पर्यंत पिकावर विविध प्रकारच्या कीड व रोगांचे आक्रमण होत असते, या किडींची वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत घट येऊ शकते ही घट टाळण्यासाठी पिकांवरील किडींचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : सावधान : सोयाबीन आणि कपाशी पिकांवर वाढतोय किडींचा प्रकोप! शेतकरी हवालदिल

 • चुकीच्या फवारणी पद्धतीमुळे अपेक्षित नियंत्रित  मिळत नाही, शिफारशीत कीटकनाशके किडींवर प्रभावी असतात व योग्य फवारणी तंत्रज्ञान वापरून किडींचे अपेक्षित नियंत्रण हमखास मिळविता येते.

 • नियमित सर्वेक्षणाद्वारे किडींची व त्यांचे परभक्षक कीटकांची संख्या मोजून घ्यावी. कीड व परभक्षक किटकांचे सर्वसाधारण गुणोत्तर १:२ असल्यास पिकांमध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी, त्यापूर्वी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा भाग म्हणून पर्यावरणास सुरक्षित अशी कीटकनाशके निवडावीत.

 • फवारणी करताना नोझल हे पिकांच्या घेरानुसार व पानांच्या आकारानुसार निवडावीत. त्यामधून सर्व साधारण मध्यम आकाराचे १०० ते ३०० थेंब पडतात. मध्यम आकाराचा फवारा हा फवारणीसाठी योग्य आहे, परंतु यापेक्षा लहान आकाराच्या फवाऱ्याने फवारल्यास नंतर पिकावर योग्य त्या ठिकाणी पडण्यापूर्वी ते हवेने इतरत्र पसरण्याची शक्यता असते.

 • योग्य फवारणी पंपाची निवड - पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात दोन ओळींमधील जमीन झाकलेली नसते अशा परिस्थितीत साध्या  हात पंपाने (नँपसँक) फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण जमिनीवर पडून वाया जात नाही. पीक मोठे झाल्यावर त्यानंतर पावर पंपाचा उपयोग करू शकता.

 • फवारणीपूर्वी सर्व फवारणी यंत्राची दुरुस्ती आवश्यक असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, योग्य नोझल आहे का नाही हे तपासून घ्यावेत नोझल सदोष किंवा घासले असल्यास ते नवीन बसवावे . अशाप्रकारे आपण काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला योग्य असे फवारणीची सकारात्मक फवारणीची परिणाम आढळून येतील.

कीटकनाशक फवारणीची नकारात्मक परिणाम :

 • कीटकनाशकांच्या सतत वापरामुळे बरेच कीटक व किडी मरतात पण अशा कीटकांवर उपजिवीका करणारे मित्रकिटक, प्राणी, पक्षी यांची यामुळे उपासमार होते व परिणाम त्यांच्या काही प्रजाती नष्ट होत आहेत, असे आढळून आले आहे.

 • कीटकनाशके फवारनाऱ्या व्यक्तीचा त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्यामुळे ती त्वचेद्वारे किंवा शासनाद्वारे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.  शेतकरी विषबांधेची खूप सारी प्रकरणेसुद्धा समोर आली आहेत. याची खबरदारी म्हणून रबरी अस्तराचे कपडे, विशिष्ट प्रकारचे संरक्षण चष्मे, धूळ व वायू प्रतिबंधक मुखवटे, इत्यादी संरक्षण उपकरणे वापरावेत.

 • रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतकऱ्यांना तात्काळ परिणाम मिळत आहे, परंतु नैसर्गिक चक्रालाही यामुळे बाधा निर्माण होत आहे.

 • शेतात फवारण्यात आलेली किंवा वापरण्यात आलेली कीटकनाशके जवळपास लक्ष असलेल्या किंटका पर्यंत कधी पोहोचत नाही, ती हवा, जमीन,पाणी आणि इत्यादी मध्ये मिसळून जातात.

 • कीटकनाशके फवारणीमुळे फायदे तर होतात पण त्यामध्ये निसर्ग आणि मानवी जीवनाला खूप मोठे नुकसान अप्रत्यक्षरीत्या होतांना आपल्याला दिसून येते.

 

 • जमिनीखाली असलेले पाणी दूषित होते आणि तेच पाणी कुठेतरी नदी द्वारे मानवाच्या किंवा प्राण्यांच्या वापरामध्ये येते. त्यामुळे विषबाधा व विविध आजार मानवामध्ये व प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे.

 • कीटकनाशके व तणनाशके फवारणी साठी वेगवेगळे फवारणी पंप वापरावीत.

 • कीटकनाशकशकच्या रिकाम्या डब्यांची व वेस्टनाची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यामुळे मृदा व जल प्रदूषण होऊ शकते किंवा प्राण्यांना व गुरांना विषबाधा होऊ शकते.

 • अनावश्‍यक फवारण्या व त्यावरील खर्चाची बचत वनस्पती आणि प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

 

लेखक

 • प्रतिक्षा भगत
 • प्रतिक्षा दासारवार
 • हितेश गेडाम

( ग्रामीण कृषि कार्यानुभव विद्यार्थी )

 • प्रा. अजय सोळंकी

 कृषी महाविद्यालय, कोंघारा. जि. यवतमाळ.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters