नमस्कार मंडळी विषय थोडा कीळसवाणा आहे पण महत्वाचा आहे.सोनं खत म्हणजे काय? सोनं खत हे नाव आपल्या परीचयाचे असेल साध्या भाषेत सांगायचे झाले तर मानविय विष्टा किंवा मानविय मल मुत्र !
आपल्या साठी हा विषय किळसवाणा असु शकते पण शेती साठी अमृत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मानविय विष्टा याला कोणत्या गुण तत्वा मुळे सोनंखत म्हणतात माती मधे सोनं खत हे नत्र स्पुरद पालाश या तत्वावर काम करत असतो.आता पुन्हा प्रश्न पडला असेल की हे देण्याची पद्धत कोणती.आपल्या ग्रामीण भागात संडास असायचे वर्हाडी भाषेत त्याला पेव म्हणतात त्या संडास मधली कुजलेले घाण म्हणजे सुवर्ण खत त्या मधे कोळशाची भुकटी जर सोडली तर आपल्या जमिनीचा पोत हा ५ते ६ वर्षा पर्यत उतरतं नाही
याचं कारणामुळे याला हे नाव आहे. निसर्गाचा नियम आहे आपल्या मातीमधुन सोडलेली खत परत परत मातीमधे सामावल्या गेले पाहिजेत. आपल्या विष्टेत आणि मूत्रातीलमध्ये अमृतासारखे गुणधर्म असतात, ते मातीत गेले तर ते अमृत बनते आणि पाण्यात पडले तर ते रोगाचे रूप धारण करते हा विषय आपल्या साठी नवीन नाही.कदाचित म्हणूनच मानवासह सर्व सजीवांना विष्ठा आणि मूत्र कंपोस्ट करण्यासाठी भर दीला पाहिजे करण्यासाठी. आज आपन या च्या उलट काम करत आहे. शेतीमध्ये मलमूत्र आणि मूत्र वापरण्यासाठी गुणवर्धक परिणाम दिले आहे.
मूत्र गोळा करून खत बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. भारताच्या लोकसंख्येच्या मलमूत्रातून दरवर्षी लाखो टन नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळू शकते. ज्यामुळे मातीची लुप्त होणारी सुपिकता पुन्हा तयार केली जाऊ शकते.
Share your comments