फळझाडांच्या/भाजीपाला पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लास्टिक फिल्म टाकल्यावर पाण्याचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळता येतो. तसेच त्यामुळे तणांची वाढ होत नाही.१.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (https://mahadbtmahait.gov.in) या ऑनलाईन
संकेतस्थळावर नोंदणी करावी.२.अर्थसहाय्यचे स्वरूप - अ . सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी मापदंड
पिकांमध्ये मॅग्नेशियम करतंय तरी काय? आणि पिकांत नसल्याने काय होते?
रुपये ३२०००/- असून या खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये १६०००/- प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. The subsidy is payable up to a maximum area limit of 2 hectares.
ब . डोंगराळ क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी मापदंड रुपये ३६८००/- असून या खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये १८४००/- प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. ३. कोण सहभाग घेऊ शकतात - अ. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य देय आहे.
४. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे अ . ७/१२ब. ८ अ क.आधार कार्डाची छायांकित प्रत ड.आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रतअधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Share your comments