1. कृषीपीडिया

Planting Trees: अंगणात तुळशीसोबत लावा ही 3 झाडे; होतील अनेक फायदे

तुळशीचे रोप अंगणात लावण्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच तुळशीच्या झाडाला वास्तूनुसार महत्व दिले जाते. सकारात्मक वातावरणासाठी तुळशीच्या झाडासोबत तुम्ही अशी कोणती झाडे लावू शकता ज्या झाडांना वास्तूमध्ये महत्व आहे? अशा झाडांची आपण माहिती घेणार आहोत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शमीचे झाड

शमीचे झाड

तुळशीचे (basil) रोप अंगणात लावण्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच तुळशीच्या झाडाला वास्तूनुसार महत्व दिले जाते. सकारात्मक वातावरणासाठी तुळशीच्या झाडासोबत (basil trees) तुम्ही अशी कोणती झाडे लावू शकता ज्या झाडांना वास्तूमध्ये महत्व आहे? अशा झाडांची आपण माहिती घेणार आहोत. तुळशीशिवायही तुम्ही या 3 झाडांची लागण करू शकता, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहण्यास मदत होईल.

1) शमीचे झाड
घरामध्ये शमीचं रोप लावणं घरातील सदस्यांसाठी वास्तूनुसार खूप शुभ मानले जाते. शमीच्या रोपाची (shami plant) पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. शमीचे रोप तुळशीसोबत लावल्यास व्यक्तीला अनेक पटींनी फळ मिळते. शमी वनस्पती शनिवार आणि शनिदेवाशी संबंधित आहे.

2) केळ्याचं झाड
असे म्हंटले जाते, घरामध्ये केळीचं झाड (banana tree) लावल्याने नकारात्मकता दूर होते. घरामध्ये केळीचे रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. घरात तुळशीचं रोप लावलं तर घरात सुख-समृद्धी राहतं आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात, असेही बोलले जाते.

'थोडा गृहपाठ करून मुख्यमंत्र्यांना भेटायला जायला हवे होते' पीककर्जावरून राजू शेट्टी यांनी लगावला टोला

3) धोत्र्याचं झाडं
वास्तूनुसार धोत्र्याच्या झाडाजवळ (dhotriya tree) शिवाचं निवासस्थान असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत रविवारी आणि मंगळवारी काळ्या धोत्र्याचं रोप लावल्यास उत्तम ठरेल. शिवाला धोत्रा अर्पण केला जातो. रविवारी किंवा मंगळवारी झाड लावणं खूप चांगलं असतं. असे म्हंटले जाते की, हे रोप घरात लावल्याने तुम्हाला भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो.

महत्वाच्या बातम्या:
Waterfall : महाराष्ट्रातील 'हा' उलटा धबधबा पाहिला आहे का? पहा निर्सगाचा चमत्कार..
शेतकरी मित्रांनो; जनावरांना सर्पदंश झालाय? तर करा त्वरित 'हे' उपाय, अन्यथा...

English Summary: Planting Trees: Plant these 3 trees along with Tulsi in the yard; There will be many benefits Published on: 15 July 2022, 06:14 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters