27जून ते 30जूनच्या दरम्यान 3एकर क्षेत्रामध्ये 5/2अंतरावर रोपे लावण केली. सोबत खोडकिडीच्या नियंत्रण साठी एकरीं 2किलो फरटेरा वापरले. लावण होईल तसे लगेच मागोमाग पाणी दिले.कुदळीने सरळ चर मारून एक एकर रोप लावण केले.
परंतु रोप लावून पाणी दिल्या नंतर माती उघडी पडून कांड्या उघड्या पडू लागल्या.त्यामुळे त्याच्यावरती माती टाकून कांड्या झाकून घ्यावी लागली. त्यामुळे राहिलेल्या 2एकर क्षेत्रात सरळ चर न मारता , मार्किंग केलेल्या ठिकाणी खड्डे काढून रोप लावले. त्यामुळे कांडी उघडी पडायची बंद झाले.
लावण करायच्या गडबडीत माझे पानाच्या कटिंग कडे दुर्लक्ष झाले. मजुरानी काही रोपांचे पाने वरून कट केले व साईडचेही पाने काही ठिकाणी कट केले काही ठिकाणी कट नाहीत. त्यामुळे लावण करून 2/3दिवसांनी तेवढीच रोपे सोकल्या सारखे दिसत होते.ज्या रोपाची पाने खालून कट केले होते ती रोपे एकदम तजेलदार व टवटवीत दिसत होती.
English Summary: Planting and planning nursery bedsPublished on: 11 August 2022, 06:04 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments