भारत देश हरितक्रांती घडून आल्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला॰हरितक्रांतीच्या काळात प्रामुख्याने संकरीत वाण, सुधारित जाती,रसायनिक खते, कीटकनाशके तसेच सुधारित तंत्रज्ञानइत्यादि गोष्टीवर भर देऊन हरितक्रांतीचा परिणाम साधण्यात आला. या काळात पावसावर अवलंबून असणार्या कडधान्य व तेलबिया उत्पादनामध्ये म्हणावी तशी प्रगति दिसून आली
नाही.तेलबियाच्या बाबतीत आपण आजही लागणार्या गरजेच्या जवळपास निम्या हिश्यापेक्षा अधिक म्हणजे ५५ % तेल आयात करत आहोत.Almost more than half share i.e. 55% is importing oil.सूर्यफूल पिकाची प्रमुख
अशी करा हरबरा बियाणे (वाण ) निवड आणि बीज प्रक्रिया
वैशिष्टे सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसल्यामुळे वर्षातील खरीप,रबी आणि उन्हाळा अशा तीनही हंगामात घेता येते.हे पीक हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत घेता
येते. सूर्यफुलची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकते,म्हणून दुष्काळी भागातहीचांगलेयेते. कमी कलावधीत (८५ ते ९० दिवस) तयार होते. तेलाचे प्रमाण अधिक(३५ ते ४० टक्के) असल्यामुळे थोड्या क्षेत्रात कमी कलावधीत या पिकापासून जास्त तेल मिळू शकते.हवामान: सूर्यफूल हे पीक अवर्षण प्रवण भागात जेथे ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी
जिरायत पीक म्हणून घेतले जाते. या पिकच्या वाढीसाठी २० ते २९ अंश सें.ग्रे.तापमान लागते . सूर्यफूल जरी वर्षातील सर्व हंगामात येत असले तरी फुलोर्याच्या अवस्थेत ४० अंश सें.ग्रे.पेक्षा जास्त तापमान,मोठाअगर झिमझिम पाऊस याचा दाणे भरण्यावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे फुलोर्याच्या कालावधीत हे पीक पावसात सापडणार नाही अशा रितीने पेरणी करावी.
Share your comments