1. कृषीपीडिया

रब्बी हंगामात या पद्धतीने करा सूर्यफूल लागवड, होईल बक्कळ पैसा

भारत देश हरितक्रांती घडून आल्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रब्बी हंगामात या पद्धतीने करा सूर्यफूल लागवड, होईल बक्कळ पैसा

रब्बी हंगामात या पद्धतीने करा सूर्यफूल लागवड, होईल बक्कळ पैसा

भारत देश हरितक्रांती घडून आल्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला॰हरितक्रांतीच्या काळात प्रामुख्याने संकरीत वाण, सुधारित जाती,रसायनिक खते, कीटकनाशके तसेच सुधारित तंत्रज्ञानइत्यादि गोष्टीवर भर देऊन हरितक्रांतीचा परिणाम साधण्यात आला. या काळात पावसावर अवलंबून असणार्‍या कडधान्य व तेलबिया उत्पादनामध्ये म्हणावी तशी प्रगति दिसून आली नाही.तेलबियाच्या बाबतीत आपण आजही लागणार्‍या गरजेच्या जवळपास निम्या हिश्यापेक्षा अधिक म्हणजे ५५ % तेल आयात करत आहोत.

बदलते राहणीमन, वाढते उत्पन्न, तेलाची उपलब्धता, खाण्याच्या सवईतील बदल यामुळे दिवसेंदिवस खाद्यतेलाच्या वापरातही वाढ होत आहे.Due to the change in eating habits, the consumption of edible oil is also increasing day by day. सन २०१५ साली १२६ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात

बाप, दिवाळी व कांद्याची एक गोणी, वाचाच!

वर्षांला दरडोई १७.४ किलो खाद्यतेल वापरले जात होते. तर २०२५ साली वाढत्या लोकसंख्येनुसार आपली तेलाची गरज ३३६ लाख टन इतकी होईल व दरडोई तेलाचा वापर २५.६ किलो होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे देशातर्गत उत्पादन कमी असल्यामुळे आयतीवर भर द्यावा लागत आहे.

तेलाचे उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय तेलबिया मिशन हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा आहे. शेतकर्‍याच्या शेतावर राबविलेल्या आद्यारेखीय प्रात्येक्षिकावरूनअसे दिसून आले की सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा १८ ते ४५ टक्के अधिक उत्पादन मिळते म्हणून आहे त्या क्षेत्रात अधिक उत्पादन व अधिक फायदा मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे

अत्यंत महत्वाचे आहे॰ सध्या सूर्यफुलाला रु.६०००/- प्रती क्विंटल पेक्षा अधिक चांगला बाजार भाव मिळत आहे आणि केंद्र सरकारने देखील सूर्यफुलासाठी रु.६०१५/ क्विंटल हमीभव जाहीर केला आहे.भारत रशिया आणि युक्रेनमधून ७०% सूर्यफूल तेल आयात करतो. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. “सूर्यफूल तेलाची प्रतिलिटर किंमत सहामहिन्यांपूर्वी १४०-१५० रुपयांच्या दरम्यान होती परंतु सध्या मात्र

ती २००-२४० च्या दरम्यान आहे,” दोन्ही देशांमधील तणावामुळे पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालाआहे.भारतीय उत्पादकांकडून पुरेसा पुरवठा होत नाही.सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे सूर्यफूल पिकाचे उत्पादन वाढवने गरजेच आहे. या संधीचा फायदा घेयुन मोठ्या प्रमाणात सूर्यफूल या पिकाची लागवड करून तेलबियामध्ये स्वावलंबन आणणे तसेच आरोग्यदायी अशा सूर्यफूल तेलाची उपलब्धता व वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी या पिकाची लागवड करावी.

English Summary: Plant sunflower in this way during Rabi season, you will make a lot of money Published on: 02 November 2022, 08:39 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters