भारतातील शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Farming) करत असतात. या भाजीपाला वर्गीय पिकांपैकी प्रमुख असलेल्या बटाट्याची देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड (Potato Farming) बघायला मिळते.
बटाट्याची लागवड (Potato Cultivation) आत्तापर्यंत तुम्ही शेतजमिनीतच बघितली असेल. मात्र आता अशी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता चक्क हवेत बटाटा लागवड करता येणार आहे.
हवेत बटाटा उत्पादित करण्याच्या या टेक्निकला एरोपोनिक फार्मिंग (Aeroponic Farming) म्हणून ओळखले जाते. तज्ज्ञांच्या मते, या तंत्रामुळे शेतकऱ्यांचा बटाटा लागवडीचा (Potato Farming Cost) खर्च तर कमी होईलच, शिवाय वेळेचीही बचत होईल.
एवढेच नाही तर या आधुनिक टेक्निकमुळे शेतकरी बांधवांचा नफा (Farmers Income) देखील 10 पटीने वाढेल. मित्रांनो एरोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी बांधव आता हवेत बटाट्याची लागवड करू शकणार आहेत. या तंत्रज्ञानाचा शोध हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात असलेल्या बटाटा तंत्रज्ञान केंद्राने लावला आहे.
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार
या नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. शिवाय कमी खर्चात जास्तीत जास्त बटाट्याचे उत्पादन घेता येईल आणि यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तंत्रात मुळे हवेत लटकवून त्यांचे पोषण केले जाते. या नवीन तंत्रज्ञानामुळे बटाट्याला मातीची गरज नसते.
Vanilla Cultivation: वॅनिला शेती सुरु करा आणि कमवा लाखों; खुप महाग विकले जातात याचे फळ आणि फुल; वाचा
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एरोपॅनिक तंत्रात, धुकेच्या स्वरूपात पोषक तत्वांची मुळांमध्ये फवारणी केली जाते. वनस्पतीचा वरचा भाग खुल्या हवेत आणि प्रकाशात राहतो. सोबतच या तंत्रज्ञानामुळे पिकामध्ये मातीजन्य रोग होण्याची शक्यताही कमी असते, त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
Pm Kisan Yojana: प्रतीक्षा संपली; 'या' दिवशी आता फिक्स जमा होणार 2 हजार
निश्चितच या नवीन तंत्रज्ञानामुळे भारतीय शेतीमध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादनात मोठी भरीव वाढ होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. शिवाय यामुळे उच्च दर्जाचा शेतमाल उत्पादित होणार असून शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनात दहा पटीने अधिक वाढ होणार असल्याचा दावा केला जातो.
85 हजाराची 'ही' भन्नाट स्कूटर खरेदी करा मात्र 25 हजारात; जाणुन घ्या कुठं मिळतेय ही ऑफर
Share your comments