1. कृषीपीडिया

करा शेवग्याची लागवड आणि मिळवा चांगले उत्पन्न

KJ Maharashtra
KJ Maharashtra
drumstic tree

drumstic tree

कमी पावसाच्या प्रदेशात आणि बागायती क्षेत्र कमी असलेल्या कोरडवाहू क्षेत्रात शेवगा हे पीक उत्तम येते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे क्षेत्र कोरडवाहू असून अशा परिस्थितीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. शेवगा पिकासाठी पाण्याची गरज ही इतर पिकांच्या तुलनेत कमी असते.

हवामानाचा विचार केला तर कोणत्याही हवामानात शेवगा येऊ शकतो. परंतु जून-जुलै हा काळ  शेवगा पिकासाठी अनुकूल आहे. कारण या वेळेत हवेतील आर्द्रता वाढते. जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील कमी असते, त्यामुळे अशा काळात शेवगा रोपांची लागवड केल्यास रोपे उगवण्याचा अनुकूल वेळ असते. जमिनीचा विचार केला तर अत्यंत हलक्या किंवा भारी जमिनीतही शेवगा लागवड करता येते. पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या प्रदेशात उतारावर जमिनीमध्ये सुद्धा शेवगा लागवड करता येते.

शेवग्याच्या जाती:

 कोईमतूर 1, कोईमतूर 2, पिकेएम एक, पिकेएम दोन या या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केले आहेत. या जातीची झाडे पाच ते सहा मीटर उंच वाढतात तसेच 16 ते 22 फांद्या असतात. पी के एम 2 ही जात लागवडीपासून सहा-सात महिन्यात शेंगा देणारे आहे. या वाणाच्या शेंगा खायला रुचकर आणि स्वादिष्ट आहेत. शेंगा पाच ते 60 सेंटिमीटर लांब व गर्द हिरव्या रंगाचे असल्यामुळे बाजारामध्ये चांगला भाव मिळतो.

शेवग्याची लागवड पद्धत:

 शेवग्याची लागवड करण्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी 60 सेंटिमीटर लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत, चांगल्या प्रतीचे माती, आंध्रा 15 15 15 अडीशे ग्राम पाणी दहा टक्के लिंडेन पावडर टाकून खड्डा भरावा. लागवड करतेवेळी झाडांच्या दोन ओळींमधील अंतर तीन मीटर आणि दोन झाडांमधील अंतर 3 मीटर ठेवावे. शेवग्याच्या झाडांना व्यवस्थित आकार देणे फार महत्त्वाचे असते. त्यांची वाढ फार झपाट्याने होते.

हेही वाचा :लेमन ग्रासची शेती करा कमवा भरपूर नफा

 

शेवग्याची छाटणी:

लागवड केल्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिन्यानंतर व झाडांची उंची तीन ते चार फूट झाल्यानंतर झाडाच्या वरच्या बाजूने अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा.. त्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहून शेंगा देणाऱ्या फांद्या तीन ते चार फूट खाली आल्याने शेंगा तोडण्यास सोपे होते. लागवड केल्यापासून सहा ते सात महिन्यांमध्ये शेवगा चे उत्पन्न चालू होते. उत्पन्न चालू झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत शेंगाचे उत्पादन मिळत राहते. एक पीक घेतल्यानंतर पुन्हा झाडाची छाटणी करून त्याला योग्य आकार द्यावा. त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा तीन ते चार फूट ठेवून बाजूच्या फांद्या एक ते दोन फूट ठेवाव्यात.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters