हळदीची लागवड एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. लागवडीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया अवश्य करावी. हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित ९ जातींची निवड महत्त्वाची ठरते. पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीच्या सरी वरंबा आणि रुंद वरंबा अशा दोन पद्धती पडतात.
पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तसेच लागवडीसाठी भौगोलिक स्थितीनुसार योग्य जातीची निवड महत्त्वाची ठरते. लागवडीपूर्व जमिनीची योग्यप्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत आवश्यक आहे. पिकांस उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व स्वच्छ सूर्यप्रकाशात पिकाची वाढ उत्तम होते.
जास्त तापमान असलेल्या ठिकाणी किमान तापमानाची तीव्रता कमी झाल्यावरच लागवड करावी. मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी. नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत हळदीचे उत्पादन भरपूर मिळते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीची खोली साधारणपणे २० ते २५ सेंमी असावी.
पुण्यात 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त, अन्न व सुरक्षा विभागाची मोठी कारवाई..
जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. लागवड एप्रिल-मे महिन्यात होत असल्याने सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण मुळांना जमिनीत स्थिरता प्राप्त होण्याचा हा काळ असतो.
या कालावधीत आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी जास्त ठेवावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. लागवड एप्रिल-मे महिन्यात होत असल्याने सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.
केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान, या सरकारचा मोठा निर्णय
मुळांना जमिनीत स्थिरता प्राप्त होण्याचा हा काळ असतो. या कालावधीत आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी जास्त ठेवावा. सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केल्यास उत्पादनवाढीस फायदा होतो. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे.
राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, राजेंद्र पवार यांचा पुढाकार
कृषी जागरणकडून करिअर सक्षमीकरणासाठी 'विंग्स टू करिअर' उपक्रम सुरू
Share your comments