सध्या शेतकरी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पीक न घेता आधुनिक शेतीकडे ओळले आहेत. बाजारात जास्त मागणी कोणत्या गोष्टीला आहे ते लक्षात घेऊन शेतात उत्पादन घेत आहेत. शेतकरी शेतात फळे तसेच भाजीपाला चे चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ लागले आहेत. फळबागा म्हणले तर त्यामध्ये अननसाची लागवड करणे शेतकरी पसंद करत आहेत जे की यामधून चांगल्या प्रकारे नफा सुद्धा भेटत आहे. अननसाची पूर्ण बारा महिने लागवड करता येते तसेच बाजारात सुद्धा बारा महिनेही अननसाला मागणी असते.
अननसाच्या लागवडीसाठी हवामान.
अननस लागवडीसाठी दमट हवामान लागते तसेच पाऊस सुद्धा जास्त लागतो. अननसामध्ये जास्त उष्णता सहन करण्याची शक्ती नसते. २२ - ३२ अंश तापमान यासाठी योग्य आहे.
अननस लागवडीसाठी योग्य जमीन किंवा माती...
अननसाच्या लागवडीसाठी वालुकामय चिकनमाती चांगली असते. पाणी साचलेल्या जमिनीत अननसाची लागवड करू नये. आम्लयुक्त मातीचा
PH ५ - ६ च्या दरम्यान असावा.
अननस लागवडीसाठी योग्य वेळ.
अननसाची वर्षातून दोन वेळा लागवड करता येते. जसे की पहिला टप्पा जानेवारी ते मार्च आणि दुसरा टप्पा मे ते जुलै च्या दरम्यान असतो. तर दुसऱ्या बाजूस ज्या भागात मध्यम उबदार हवामान असते त्या भागात बारा महिने अननसाची लागवड करता येते.
अननस शेतीसाठी सुधारित वाण.
अननसाच्या क्वीन, मॉरिशियस, जायंट क्यू, रेड स्पॅनिश या प्रमुख जाती आहेत. राणी ही जात लवकर परिपक्व होते. जायंट क्यू या जातीला परिपक्व होण्यासाठी उशीर लागतो. मॉरिशियस ही विदेशी जात आहे तर लाल स्पॅनिश या जातीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
अननस लागवडीसाठी याप्रमाणे शेत तयार करावे.
उन्हाळ्यात सर्व प्रथम उलट्या नांगराने मातीची खोल नांगरणी करावी आणि काही दिवस मोकळे सोडावे. कुजलेले शेणखत जमिनीत मिसळा आणि त्याव रोटाव्हेटर चालवून भुसभुशीत करा.
अननस वनस्पती लागवड पद्धत.
बहुतांश भागात अननसाची लागवड डिसेंम्बर ते मार्च महिन्यात केली जाते. ज्यावेळी अतिवृष्टी होत असते त्यावेळी लागवड करू नये. शेत तयार झाल्यानंतर ९० सेमी अंतरावर १५ ते ३० सेमी वर खोल खड्डा खोला. अननसाची लागवड करण्यापूर्वी 0.2% डायथेन एम 45 चे द्रावण वापरा.
अननस लागवडीसाठी खताचा डोस.
शेत नांगरणी करताना शेणखत, गांडूळ खत तसेच कंपोस्ट खत किंवा कोणतेही सेंद्रिय खत जमिनीत मिसळा. तसेच रासायनिक खत म्हणून ६८० किलो अमोनियम सल्फेट, ३४० किलो स्फुरद आणि ६८० किलो पोटॅश वर्षातून दोन वेळा वनस्पतींना द्यावे.
अननस शेतीमध्ये सिंचन व्यवस्था.
अननसाचे रोप जर पावसाळ्यात लावले तर त्यास सिंचनाची गरज भासणार नाही. झाड उगवल्यानंतर १० - १५ दिवसांनी सिंचन सोय करावी.
अननस मध्ये रोग व्यवस्थापन.
अननसाच्या झाडांमध्ये कमी प्रमाणात रोगाचे प्रमाण आढळते मात्र काही रोग असे आहेत की ते वनस्पतीला हानी पोहचवू शकतात. अननसाचे रोप वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना वापराव्यात.
अननसातील काळे डाग.
रुट रॉग रोग यामुळे अननसाच्या पानांवर गडद तपकिरी ठिपके पडतात. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी कडूलिंबाच्या तेलाची फवारणी करावी.
अननसाच्या लागवडीतील खर्च आणि कमाई.
एक हेक्टर शेतात आपण १६-१७ हजार पिके लावू शकतो हे की यामधून ३-४ टन उत्पादन निघते. एका फळाचे वजन २ किलो च्या आसपास असते ज्याची बाजारामध्ये किमंत १५० - २०० रुपये असते.
Share your comments