राज्यात अनेक भागात पाऊस पडल्याने गोगलगायीं व पैसा किडीचे प्रमाण वाढत आहे. सध्या पैसा किडी म्हणजेच वाणी किडीचा प्रादुर्भाव (Insect infestation) मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळत आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
सोयाबीन, कापूस, मका, उडीद, तूर आदि पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या किडींचे व्यवस्थापन (Pest management) कसे करायचे याची सविस्तर माहिती घेऊया. पैसा किडा म्हणजेच मिलीपेड्स हे निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात.
साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. परंतु जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात.
हे ही वाचा
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलेंडर आजपासून स्वस्त; जाणून घ्या किमती
व्यवस्थापन कसे करावी ?
1) शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरिल गवत, दगड, जमिनीवर ठेवलेल्या वस्तू काढाव्यात.
2) ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपेड्सचा प्रादुर्भाव वाढतो.
3) शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले पदार्थ गोळा करुन नष्ट करा.
4) ज्याठिकाणी शेतक-यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
5) पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील.
6) चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण (Natural pest control) होते.
हे ही वाचा
E-Crop App: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; ई-पीक पाहणीसाठी नवे 'अॅप' उपलब्ध
रासायनिक नियंत्रण
१) किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करा.
२)कार्बोसल्फान (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरा.
महत्वाच्या बातम्या
भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना घरबसल्या भरता येणार शेतीसंबंधीचे कर
Animal Husbandry: पशुपालकांनो तुमची जनावरे आजारी नाहीत ना? तर 'या' सोप्या मार्गाने ओळखून करा उपचार
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
Share your comments