हरीत क्रांतिला सन१९६२ साली सूरुवात झाली. तत्पूर्वी अन्नधान्याचा तुटवडा होता. त्यानंतर अन्नधान्य भरपूर जरी पिकत असले तरी, शेतकर्यांच्या नशिबी फक्त अनं फक्त दारिद्र्यच आले. सोबतच जमीन नापीक झाली. मानवाचे व इतर जिवांचे आरोग्य धोक्यात आले. एवढेच नव्हे तर मानवी आयुष्यमान सतत घटत चालले आहे.हरीत क्रांतिपर्व काळात सर्वसाधारण ११० वर्षे म्हातारे जगायचे. नंतर १००-८०-६० असे आयुष्यामान घटत आहे. पुढिल काळात ४० वर येईल की काय असे वाटते.
शेतकरी हरीत क्रांतिपूर्वी जरी सुखी नसला तरी, संपन्न मात्र जरुर होता.Although the peasants were not happy before the Green Revolution, they were definitely prosperous. आज १० एकर शेती असलेला शेतकरी करोडपती असला तरी,
भारतीय शेतकरी अधोगती च्या मार्गाने चालला कसा ते वाचा आणि विचार बदला
त्याची परिस्थिती शाळेच्या चपराश्याइतपत राहिलेली नाही. मग प्रश्न हा उरतो, हरित क्रांतीने जिवणात काय साध्य झाले? फक्त शेतकरी सोडून इतर वर्गाला मातीमोल भावाने शेतमाल मिळाला. फरक फक्त एवढाच उरला, अगोदर शेतमालाला किंमत होती, आता बरेचसे अन्न नालीने सोडल्या जाते.शेतकर्यांच्या
मालाला रास्त भाव मिळाला आसता तर हे प्रकार घडलेच नसते.प्रश्न असा उरतो, मग शेतकरी जिवाचा आटापिटा करून रात्रंदिवस राबून एवढे पिकवितो तरी कुणासाठी? यातून विषेश काही साध्य झाले असे दिसून येत नाही.शेतकर्यांचे हीत साधणार्या काही संघटना जरी असल्या तरी, प्रत्येक संघटनांचे एकसंध विचार आहे, असे दिसून येत नाही. यातच शेतकरी विखुरलेला दिसतो. बराच शेतकरी वर्ग संघटनांपासून दुरावलेला दिसतो. यात शेतकर्यांचा पूर्णपणे दोष असावा असे
नाही. कारण आतापर्यंत लोकशाहीतुन जे राज्यकर्ते आले त्यांनी शेतकर्यांची मध्यावस्था करून ठेवली.संघटन फक्त दोनच अवस्थेत होते, एकतर तो वर्ग खूप श्रीमंत असेल किंवा खूप गरीब असेल. शेतकरी ह्या दोन्ही वर्गात मोडू नये अशी शासन दरबारी पूर्वीपासून व्यवस्था करण्यात आली. हा सगळा खेळ शेतकर्यांचे जिवावर चाललाय याचे कुणालाही भान नाही. सगळे राजकीय पक्ष शेतकर्यांचे भरवशावर आपापली पोळी शेकण्यात मशगूल असतात. ह्यातच शेतकरी राजा हतबल झाला असे दिसून येते.
लेखक:- श्री. राजू रामभाऊ ढगे.
रा. अल्लिपूर , जि. वर्धा.
मो. नं. :-9545950707
Share your comments