1. कृषीपीडिया

आहे का नाशपातीची लागवड करण्याचा विचार? मग तुमच्यासाठीच खास आहे ही माहिती

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pear cultivation

pear cultivation

प्नाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपातीचा माल तयार होतो.

नाशपाती विषयी थोडक्यात

नाशपाती हंगामी फळांच्या यादीत येते आणि हे फळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत.  यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

या व्यतिरिक्त, लोह देखील यात भरपूर आहे, हे फळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. नाशपातीच्या सेवनाने खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते. हेच कारण आहे की लोक नाशपाती खायला पसंती दाखवाताहेत आणि त्याला बाजारात मागणी देखील आहे.

 नाशपातीच्या लागवडीसाठी रेताड चिकणमाती असलेली जमीन आणि दळच्या जमीनी खुपच फायदेशीर ठरतात. एकूणच, नाशपातीच्या लागवडीसाठी अशा जमिनीची गरज असते ज्यातून पाणी सहज बाहेर जाऊ शकते. नाशपातीची लागवड ही चिकणमाती आणि अधिक पाणीवाल्या जमिनीतही करता येते.

कोणकोणत्या आहेत नाशपातीच्या जाती

नाशपाती खाल्ल्याने कुपोषण बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते. नाशपातीच्या बऱ्याच चांगल्या जाती आहेत ज्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देऊ शकतात. नाशपतीच्या जाती जशा कि, पत्थर नाग, पंजाब नख, पंजाब गोल्ड, पंजाब अमृत, पंजाब ब्यूटी आणि बागुगोसा.

 पत्थरनाग: पत्थरनाग ही एक कडक फळे असलेली नाशपाती प्रजाती आहे जिचे झाड हे पसरनारे असते. याची फळे साधारण आकाराने गोल आणि हिरवी असतात. साधारणपणे जून महिन्यात नाशपाती पिकण्यास सुरवात होते, परंतु ह्या जातींचे नाशपाती जुलैच्या अखेरीस पिकतात आणि प्रति झाड दीडशे किलोपेक्षा जास्त फळे देतात.

 पंजाब नख: पंजाब नख ही नाशपातीची जात देखील एक कठीण फळ असणारी आणि पसरणारी आहे. याची फळे अंडाकृती, हलकी पिवळी आणि रसाळ असतात. पंजाब नख जातीवर ठिपके बनलेले असतात.

 पंजाब गोल्ड: पंजाब गोल्ड सामान्यता मऊ फळ येणारी नाशपातीची जात आहे. ह्याला स्पर्श केल्यास किंचित मऊ असल्याचे जाणवेल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ते काढणीसाठी तयार होते. पंजाब गोल्डच्या नाशपातीपासून विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.

 पंजाब नेक्टर : पंजाब अमृत देखील एक मऊ फळ येणारी प्रजाती आहे. या जातीची फळे सामान्यपेक्षा मोठी आकाराची असतात. या जातीची फळे बाहेरून हिरवी असतात. आतून ह्या फळांचा पांढरा गीर असतो. फळ पिकल्यानंतर रसाळ होतात खाण्यास चविष्ट असतात.

पंजाब ब्युटी : ही नाशपातीची वाण देखील सामान्य आणि मऊ आहे.  ह्याच्या फळांचा आकार थोडा मोठा असला तरी,  रंग पिवळा आणि हिरवा राहतो. ह्या फळाचा गीर पांढरा असतो. ह्या जातींचे फळ खूप रसाळ आणि गोड असते.

 बागुगोसा: बागुगोसा ही एक सामान्य नाशपातीचा प्रकार आहे, जो ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात पिकतो. ज्यांना बाजार लांबचा असतो, त्यांच्यासाठी ही जात सर्वोत्तम आहे.

नाशपातीच्या बागेत आंतरपीक म्हणुन भाजीपाला लागवड करता येते

 जोपर्यंत नाशपातीला फळ लागत नाही, तोपर्यंत उडीद, मूग आणि तोर यासारखी पिके आंतरपीक म्हणुन घेता येतात. तर रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि इतर भाज्यांची लागवड करता येते.

 नाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपाती तयार होतात.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters