वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये कारले हे महत्त्वाचे व कमी कालावधीत येणारी पिके आहे.कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न व नफा मिळवून देणारे म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. कारले मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे भारतीय तसेच विदेशी बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असते.
कारल्या मध्ये जीवनसत्व अ आणि क, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स तसेच लोह, फॉस्फरस सारखे घटकातील प्रमाणात आहेत. कारल्याची लागवड ही आपल्याकडे पावसाळी म्हणजे जून महिन्यात व उन्हाळी जानेवारी महिन्यात करतात. तसेच आपल्याकडे कारले लागवडीच्या दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे ताटी पद्धत आणि दुसरी म्हणजे मंडप पद्धत या पद्धतीद्वारे कारल्याच्या वेलीला आधार दिला जातो. या लेखात आपण मंडप पद्धतीविषयी माहिती घेऊ.
कारल्याच्या वेलेला आधार देण्यासाठी उपयुक्त आहे मंडप पद्धत
1-मंडप पद्धतीमध्ये कारल्याची लागवड अडीच बाय 1 मीटर अंतरावर करतात.त्यासाठी अडीच मीटर अंतरावर रीजरणे सरी पाडावी. त्यानंतर जमिनीचा उतार कसा असेल त्यानुसार पाणी देण्याच्या दृष्टीने दर पाच ते सहा मीटर अंतरावर आडवे पाट पाडा व शेत चांगल्या पद्धतीने बांधून घ्यावे.
मंडपाचे उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूंनी एक सरी सोडून म्हणजे पाच मीटर अंतरावरदहा फूट रुंदीचे आणि चार इंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूस झुकतील अशा पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत.
3- डांब किंवा लाकडाचे दांडीला जी बाजू जमिनीत गाडनार त्या बाजूला डांबर लावावे जेणेकरून त्या कुजणार नाहीत. प्रत्येक खांबास बाहेरच्या बाजूने दहा गज जाडीच्या तारेने तान द्यावेत. त्यासाठी एक ते दीड फूट लांबीच्या निमुळत्या दगडास दुहेरी तार बांधून तो दगड दोन फूट जमिनीत पक्का गाडावा.
4- नंतर डांब बाहेरील बाजूसओढून 6.5फोटो उंचीवर तानाच्या तारेने पक्का करावा तार खाली घसरू नये म्हणून तारेवर यू आकाराचा खिळा ठोकून तार पक्की करावी. अशारितीने ताण दिल्यानंतर दहा गेजचीदुहेरी तार पीळ देऊन 6.5 फोटो उंचीवर यु आकाराचा खिळा ठोकून त्यात ओवूनपूलावर च्या साह्याने व्यवस्थितताणून घ्यावी.
तसेच चारी बाजूने समोरासमोरील लाकडी डांब एकमेकांना दहा गेजच्या तारेने जोडून घ्यावेत आणि पुलार च्या साह्यानेतान आकाराचा चौरस तयार होईल. त्यानंतर वेलाच्या प्रत्यक्ष सरिवर आठ फूट अंतरावर बांबूने वेलाच्या तारेस आधार द्यावा म्हणजे मंडपास झोळ येणार नाही आणि मंडप वाऱ्याने हलणार नाही.
6- मंडप उभारणीचे काम वेल साधारण एक ते दीड फूट उंचीचे होण्याआधी पूर्ण करणे फार गरजेचे आहे.मंडप तयार झाल्यानंतर साडेसहा ते सात फूट लांबीची सुतळी घेऊन तिचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावे व दुसरे टोक वेलीवरील तारेस बांधावे. वेल त्या सुतळी पीळ देऊन तारेवर चढवावा.
7-वेलींना आधार आणि वळण देणे गरजेचे व फायदेशीर असते. जमिनीत बिया टाकल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसात उगवण होते. चांगले वाढ असलेली रोपे ठेवून बाकीचे रोपे काढून टाकावीत.
8-
वेलीच्या जवळ एक फुटाच्या लहान काटक्या रोवून घ्यावेत. क्या काट्यांना सुतळी बांधावी व वेलीच्या अगदी बरोबर वरून आडव्या जाणाऱ्या तारेला दोन पदरी सुतळी बांधावे. नंतर बेल जसा वाटेल तसा तसा त्या तणावाच्या साहाय्याने दोरीवर चढत जातो.
9- वेली दोरीचा हेलकाव्याने खाली पडणार नाहीत तसेच शेंडे मोडणार नाही याची काळजी घ्यावी. वेलीच्या पोटी जशा वाढतील तशा मांडवाच्या तारेवर आडव्या पसरवून घ्याव्यात.
Share your comments