पपई, केळी, भाजीपाला आणि इतर पिकावर व्हायरस येऊ नये किंवा कमी यावा यासाठी पिकांची प्रतिकार क्षमता वाढवली तर ,व्हायरसवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता येते.त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे.पीकांची प्रतिकार क्षमता/ताकद वाढवण्या साठी सर्वप्रथम जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.एकदा का जमिन ताकदवर, जिवंत व कसदार झाली की पिकांची प्रतिकारशक्ती वाढून उत्पादन खर्च कमी होवून एकंदरीत उत्पादन-उत्पन्न यांत नक्कीच वाढ होते.त्यासाठी शेतकऱ्यांनी अतिशय नियोजन पूर्वक शेती केली पाहिजे .
पीक मग ते कोणतेही असो तो सुद्धा एक जीव आहे, माणसाला जसे सर्व प्रकारची प्रथिने आणि वेगवेगळ्या जीवन सत्वांची आवश्यकता असते,त्याप्रमाणेच पिकानाही ,वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.1)वायू : कार्बन,हायड्रोजन, ऑक्सिजन 2)मुख्य अन्नद्रव्ये नत्र ,स्फुरद,पालाश ,3)दुय्यम अन्न द्रव्ये कॅल्सियम, मॅग्नेशियम, सल्फर ,4)आणि 7 प्रकारची सूक्ष्म अन्न द्रव्ये,असे एकूण 16 घटक पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असतात, त्यासाठी सर्व प्रकारच्या खतांची संतुलित मात्रा, वेळेवर देणे आवश्यक असते .पपई,केळी पिकात आपण 2/3 महिने कालावधीची अंतर पीकही घेतो त्यासाठी खते वेळेवर देणे अत्यन्त गरजेचे आहे.आणि खते दिल्यावर त्यांचा पाण्याशी संपर्क झाल्यावर लागण्याचा कालावधी विचारात घेऊन योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य तीच खते दिली पाहिजे,त्यामुळे पिकांची प्रतिकार क्षमता वाढुन निश्चितच रोग कमी पडतात. त्यासाठी खतांचा बेसल डोस देणे अत्यन्त गरजेचे आहे.नत्र हे युरिया ,अमोनियम सल्फेट आणि आणि कॅलसियम नायट्रेट या स्वरूपात द्यावे, फक्त युरिया देऊ नये.सेंद्रिय खते दिल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते,आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळेच झाडाची जमिनीतून अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढते,त्यामुळे पीक प्रतिकार क्षम होते.रोग कमी पडतात.कॅल्सियम नायट्रेट कोणत्याही फॉस्फेटिक खता सोबत देऊ नये ते स्वतंत्र द्यावे.
मित्रानो आपण म्हणतो वेळेलाच केळे लागते, खतांची योग्य वेळ साधली तर पिकाची प्रतिकार क्षमता वाढून ,रोगांचे प्रमाण आपण कमी करू शकतो, पण बऱ्याच वेळा आपण खते वेळेवर देत नाहीत , खते दिल्यावर ती मातीने झाकून टाकली पाहिजे, आपण खते देत नाही ती फेकतो,खते उघड्यावर पडल्यामुळे युरिया सारख्या घटकाचे बाष्पीभवन होऊन हवेत उडून जातो,अतिपाण्यामुळे युरिया स्फुरद ,पालाश सल्फर जमिनीत खोल झिरपून जाते ,या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम झाल्यामुळे पीक कुपोषित होते ,आणि अशा पिकावर रोगांचे प्रमाणही वाढते. (या वर्षी कांदा या पिकावर पहिल्यांदाच पिळकटी पडणे, माना लांब होऊन पीळ पडणे,पात मोडणे, हा रोग पाहायला मिळाला खरे तर हा प्रकार सततच्या पावसामुळे आपण दिलेली खते वाहून गेली किंवा जमिनीत झिरपून गेली, त्यामुळे पांढरी मुळी विकसित झाली नाही, आणि पोलिटीकम नावाची बुरशी जमिनीच्या वरच्या थरात पसरून कांदा पातीवर आली त्यामुळे घडला आहे, तात्पर्य असे की न्यूट्रिएशनच्या कमतरतेमुळे हा रोग आला असे माझे मत आहे. शेतकऱ्यांनी न्यूट्रिएशन कडे लक्ष न देता जास्त प्रमाणात बुरशीनाशकेच फवारली, त्यामुळे पिळकुट्या रोगावर शेवटपर्यंत नियंत्रण मिळालेच नाही,परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली.) बरेच शेतकरी युरियाचा अतिरिक्त वापर करतात ते चुकीचे आहे, त्यामुळे आपण आपल्या पिकावर रोग पडण्यासाठीची तयारी करून देतो, पहिल्या पासून पिकावर जहाल अशा कीटक नाशकांची फवारणी करून मित्र कीटक मारून टाकतो,त्यामुळे पिकांवर रोग जास्त पडतात.त्यासाठीच लागवडी पासून जहाल अशा किटकनाशके फवारू नये,सेंद्रिय किंवा जैविक कीटकनाशके वापरून, मित्र किळ संख्या वाढू द्यावी.नैसर्गिरित्या रसशोषक किडींचे नियंत्रण होऊ द्यावे.
केळी ,पपई , भाजीपाला आणि इतर पिकावर पडणारे विषाणूजन्य रोग /व्हायरस म्हणजे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव असतात. पिकावरिल व्हायरस एखाद्या छिद्रातून किंवा पिकाला झालेल्या जखमेतून पिकाच्याआत प्रवेश करतात.
त्याच प्रमाने रस शोषक किडी आणि सूत्रकृमी मुळे, मुळावर पिकाला झालेल्या जखमेतून विषाणू पिकात प्रवेश करतात त्यासाठी रसशोषक किडीचा आणि सूत्र कृमींचा पहिल्यापासून बंदोबस्त केला तर व्हायरस आटोक्यात आणता येतो. भाजीपाला, वेलवर्गीय पिके, केळी, पपई, मिरची, वांगे, टोम्याटो, भेंडी, टरभुज, खरबूज,फळझाडे या पिकावर व्हायरस येऊ नये व पिकाची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी ट्रायकोईन, सायडेरो आणि अलरायझा यांचा वर्षातून 2 वेळा वापर करावा.(पपई आणि केळी या पिकांना तर याची खूपच आवश्यकता आहे) पिकांची प्रतिकार क्षमता वाढविण्या साठी आपली जमीन सजीव /जीवन्त असली पाहिजे, जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब आणि जिवाणूं असले पाहिजे, जमिनीचा कार्बन नत्र रेशिवो वाढवून,पीक प्रतिकारक्षम झाले तर व्हायरस चा अटॅक कमी प्रमाणात येतो. त्यासाठी रासायनिक सेंद्रिय आणि जैविक खतांचा योग्य वापर केला पाहिजे. (रासायनिक आणि जैविक खते देताना दोघात कमीत कमी 7 दिवसाचे अंतर असावे.) व्हायरसच्या नियंत्रणासाठी पपई ,केळी भाजीपाला ह्या पिकावर लागवडीपासून, व्हायरस100, डिकोडर, ओसीप, आल्व्हीस, सिलिकॉन,लीमोन नॅनोमोल,कॉपर सल्फेट, नूलाईफ, गायीचे दूध,ताक,गोमूत्र,हळद या सारख्या स्वस्त औषधांचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने फवारणी साठी वापर करावा, (बाजारात व्हायरस साठी 2400 पासून 4000 रुपये लिटर पर्यंत ऑरगॅनिक र्औषधी उपलब्ध आहेत इतक्या महाग औषधी वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही). पपई लागवडी नंतर वर सांगितलेल्या औषधांचा तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात 4 वेळा फवारणी केली तर, त्यामुळे व्हायरसचे प्रमाण 90/95% कमी होते.जखमेवर उपचार करण्या पेक्षा व्हायरसच्या लक्षणांवर उपचार करावा, म्हणजे क्युरेटिव्ह फवारणी करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह फवारणी केली तर, पपई ,केळी,वेलवर्गीय फळे, टोमॅटो,वांगे, मिरची आणि भाजीपाला पिकावर येणारा व्हायरस आपण निश्चित कमी करू शकतो.
Share your comments