1. कृषीपीडिया

आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली असावी?

आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाहीं.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली असावी?

आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली असावी?

पिकामध्यें थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं म्हणजे पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत काहीना काही रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.

बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित.

आयसियु मध्ये ऍडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देऊन जगवावी लागतात.पेपर मल्चिंग केल्याशिवाय टोमॅटोसारखेआणि मिरचीसारखे पिक येतच नाहीं.

भाजीपाला,कडधान्य, डाळिंब,द्राक्ष,ऊस,कापूस,केळी, सारख्या पिकांमध्ये उत्पादनात सातत्य टिकवणे व नवनविन रोगांचा सामना करण्यात शेतकऱ्यांची दमछाक दिवसेंदिवस होतच चालली आहे. कारण आपल्या पुढील प्रमाणे काही गोष्टी चुकत आहेत.

आपण एकमुखाने उत्तर द्याल,जमिनीचा कस कमी झाला आहे.अगदी बरोबर उत्तर आहे.पण आपण कधी विचार केलाय का? की जर शेतकरी प्रत्येक पिकाला सर्व खते, मायक्रोन्युट्रिएन्ट, औषधो व पोषके आवश्यक प्रमाणात टाकतोय तरीही जमिनीचा कस कमीच का होत आहे ? हा कस म्हणजे काय?

कस म्हणजे काळी कसदार या शब्दातील कस होय.

जमिनिला हा काळा रंग त्यात असलेल्या सेंद्रिय कर्बामुळे येतो व सेंद्रिय कर्ब म्हणजेच ह्युमस किंवा ओरगॅनिक कार्बन होय.संशोधनात असे आढळुन आलेले आहे की सजिवांचे (मानव, वनस्पति, प्राणी सर्वच ) संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्यांची गरज असते. ७५ पैकी १६ (१८) मुलद्रव्यांची सामान्यपणे गरज असते.मायक्रोन्युट्रिएन्ट ( कॅापर ,झिंक, बोरान,फेरस, मँगेनिज, मॅालीब्डेनम व क्लोरिन / निकेल / कोबाल्ट)

  दुय्यम मूलद्रव्ये-( कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर )

मुख्य मुलद्रव्ये-(नायट्रोजन, फॅास्फोरस, पोटॅश ). 

नैसर्गिक घटक -( कार्बन , ओक्सिजन व हायड्रोजन )

 ज्या प्रमाणे साधे निर्जीव सिमेंट काँक्रीट करायचे म्हटले तरी वाळु,खडी प्रमाण घ्यावे लागते त्याप्रमाणे जिवंत वनस्पतिची सुदृढ़ वाढ करण्यासाठी या १६ मुलद्रव्यांचे पोषण ठराविक प्रमाणच लागत असते. 

म्हनजे आजचा शेतकरी आपला ८५ % खर्च या ६ % पोषणासाठी करतो आहे. आपल्या पुर्वजांनी शेकडो वर्ष शेती करुनहि जमिनिचा कस टिकवुन ठेवला. 

कारण त्यांचे १००% पोषण हे सेंद्रिय घटकांवर अवलंबुन होते त्याद्वारे भरपूर ह्युमस उपलब्ध व्हायचा व नैसर्गिक घटकांचेच ( कार्बन ) मोठ्या प्रमाणात पुनर्भरण केले जायचे.आजचा शेतकरी हेच ९४ % चे पोषण निसर्गावर सोडुन देउन नशिबाला दोष देतो आहे. हा जमिनितील सेंद्रिय कार्बन सुपिक मातितील जिवाणुंच्या उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.हेच 

जिवाणु पिकाच्या अपटेक सिस्टमचे प्रमुख शिलेदार आहेत.आपल्या पुर्वजांना हे रहस्य माहित होते.

ते जमिनिचा कस ( सेंद्रिय कर्ब ) टिकवुन ठेवत आले व हजारों वर्ष समृद्ध व शाश्वत शेती करत आले.त्यांच्याकडे जमिनिचा कस टिकविण्याचा मार्ग होता तो म्हणजे देशी जनावरांचे वर्षभर साठवलेले कंपोष्ट खत पुर्ण कुजलेले व कसदार चारा खाउन तयार झालेले.आजच्या संकरीत जनावरांच्या शेणात ह्युमस खुप कमी आहे कारण ते जास्तीत जास्त कस शोषुन घेण्यासाठी तयार केलेले आहे त्यामुळे त्यांच्या शेणात चोथाच जास्त असतो जो जमिनित गेल्यावर कुजण्याऐवजी सडतोच जास्त, 

त्यामुळे उपयुक्त बॅक्टेरिया उत्पन्न होण्याऐवजी हानिकारक बुरशांची मोठ्या प्रमाणात वाढ होते .त्यामुळे आता आपल्याला देशी गाई सोबत घेऊन शेती करावी लागणार तेव्हाच शेती ही आपल्याला साथ देणार. आणि जमिनीची उत्पादकता वाढणार.

 

गोपाल उगले 

कृषी महाविद्यालय अकोला

9503537577

English Summary: Our soil fertility why does decrease Published on: 30 December 2021, 03:27 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters