शेती करत असताना शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करत असतात. सेंद्रिय शेतीमध्ये पैशांची बचत होत असते. कारण त्यात आपण आपल्या जवळ उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून शेती करत असतो. या शेती मधील एक सोपा आणि कमी खर्चातील पर्याय म्हणजे, इको पेस्ट ट्रॅप हे कीटकनाशक ऐवजी उपयोगी ठरते. तर यामध्ये आपण इको पेस्ट ट्रॅप, चिकट सापळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.
शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप' हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे.
इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. वेगवेगळ्या हानिकारक कीटक यांच्या पासून बचाव तर होतोच परंतु जंगली प्राणी जे रात्री आपले पिकाची नासधूस करत असतात तेसुद्धा या लाईट मुळे शेतामध्ये येत नाही.
पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात. तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.
या सापळ्यात ठराविक प्रकाश तिव्रतेचा व स्वयंचलीत लाईट लावलेला असून तो अंधार पडल्यावर प्रकाशमान होऊन रात्री संचार करणारे विविध प्रकारचे गळ्याचे पतंग जसे की गुलाबी बोंडआळी पतंग, अमेरिकन बोंडआळी पतंग, टिपक्याची बोंडआळी पतंग , फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग उडणारे कीटक हे प्रकाशामुळे आकर्षित होऊन सापल्याला चिटकतात.
इको-पेस्ट ट्रॅप' सापल्यातील दिवा स्वयंचलित असल्याने संध्याकाळी स्वयंप्रकाशित होतो व सकाळी सूर्योदयानंतर बंद होतो.
हा सापळा फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही कीड नियंत्रणाचे प्रभावी काम करतो. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी कमी खर्चाची उपायोजना आहे.
वापर करण्याची पद्धत -
एकरी पाच ते दहा लावून द्यावे लागतात. आपण पुन्हा वापरात आणू शकतो. हे 2 AA पेन्सिल वर चालतात. हे सेल 20 ते 25 दिवस चालतात. सर्व पिकांमध्येये लावण्यास उपयुक्त आहे
Share your comments