आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित पाठवा- गोपाल उगले
शेगाव नगर परिषद तीन वर्षा अगोदर तत्कालीन शासन कर्तेनी शेगाव शहरांत वेगवेगळ्या परिसरात सात महापुरुषांचे पुतळे उभारणीचा ठराव सर्वांनू मते मंजूर करून.पुढील कारवाही करिता ठराव मुख्यधीकाऱ्या कडे सुपूर्त केला होता. मुख्यअधिकारी मार्फत जिल्हाअधीकाऱ्यांन कडे हा प्रस्थाव पाठविण्यात आला होता. महापुरुषांच्या पुतळा उभारणीचा प्रस्ताव पाठविणे योग्यच. महापुरुषांनचे पुतळा उभारल्याने येणाऱ्या पिढीला महापुरुषांच्या पेरणादाई इतिहासाचा परिचय होत असतो. परंतु शेगाव शहरांतही प्रभाग क्र.4 या परिसरात भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी
लढणाऱ्या महापुरुष आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक सुमारे तीस ते पचत्तीस वर्षा पासून डोलाने उभे आहे. स्थानिक नगर परिषदेने शेगाव शहरातील महापुरुषांचे पुतळे उभारणीचा प्रस्थाव जिल्हाअधिकाऱ्यांन कडे पाठवित आस्थाना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवें यांच्या स्मारकाचा विसर पडला. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचे आराध्य दैवत प्रभाग क्र. 4 या परिसरात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. नगर परिषदे कडून आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळा उभारणीचा प्रस्थावं न पाठवल्याने मातंग समाजाच्या मोठया प्रमाणात भावना दुखावल्या गेल्या आहेत.
नगर परिषद कडून असे पहिल्यांदा घळले नसून.याही आगोदर शेगाव शरतील महापुरुषांच्या स्मारकांच्या सौंदर्यीकरण यादीतून
डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वेगळण्यात आले होते. त्या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे सलग तीन दिवस आमरण उपोषण करून डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरनाला प्रशासकीय मान्यता मिळून दिली. आता ही तीच परिस्थिती उद्भवली आहे. शेगाव शहरातील महापुरुषांच्या पुतळा उभारणी मध्ये नगर परिसदेने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळा उभारणीचा
प्रस्थावं जिल्हाअधीकाऱ्यांकडे पाठवला नसल्याने मातंग समाजामध्ये नगर परिषदे बद्दल नाराजीचा सुरु निघत असल्याने स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी नगर परिषदेला निवेदन देताना म्हटले आहे की शेगाव शहरांत महापुरुषांचे पुतळे बसने आवश्यक असून या मध्यमातून. महापुरुषांचा प्रेरणादाई ज्वलंत इतिहासाचा उलघळा होंत असतो. परंतु शेगाव शहरातील एखाद्या महापुरुषांचा पुतळा उभारणीसाठी जाणीव पूर्वक हालचाली केल्या जात नाही तेव्हा वेदना होतात. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळा उभारणीचा प्रस्थाव नगर परिषदे कडून लावकरत लवकर पाठविण्यात यावा अन्यथा कायदा हातात घेऊन आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा बसवू असा ईशारा स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला आहे.
Share your comments