सेंद्रिय याचा अर्थ आहे, "सह इंद्रिय" म्हणजेच इंद्रियांचा वापर करून केलेली शेती हि सेंद्रिय शेती होय. इंद्रिय सजीवांना असतात, सजीव हि दोन प्रकारची असतात एक म्हणजे प्राणी व दुसरे म्हणजे वनस्पती या सर्व प्रकारच्या सजीवांना अवयव असतात. म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न म्हणून उपयोग करणे. त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात त्यांना
म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय. त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, गोमूत्र, गांडूळखत, व्हर्मिवॉश, दशपर्णी अर्क इत्यादी सजीवांच्या अवशेषांचाच हा भाग आहे. या पद्धतीने ज्या वेळी शेतीत उत्पादन वाढीसाठी उपयोग केला जाईल त्या वेळी मोठ्या प्रमाणात वातावरणात, जमिनीवर व उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील. कारण रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या सध्याच्या अति वापराने जमिनीवर, उत्पादनावर, वातावरणावर तर वाईट परिणाम होतच आहेत. सोबतच जी व्यक्ती यांची फवारणी करतात.
किंवा ते हाताळतात त्यांनाही याचे खूप मोठे धोके असतात. व्यवस्थित काळजी घेवून या सर्व बाबी केल्या नाहीत तर फवारणी व हाताळणी करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागताना दिसून येते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक वापरणे सर्वच दृष्टीने अपायकारक आहे व त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून येतात. हे सर्व दुष्परिणाम टाळायचे असतील तर वेळीच अभ्यासक दृष्टीकोनातून सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी आधुनिक शेतीक्रांतीला सुरुवात होणे आवश्यक आहे. ज्यामध्ये रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांना थारा नसेल व शेतीमध्ये कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत.
इंद्रिय सजीवांना असतात, सजीव हि दोन प्रकारची असतात एक म्हणजे प्राणी व दुसरे म्हणजे वनस्पती या सर्व प्रकारच्या सजीवांना अवयव असतात. म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न म्हणून उपयोग करणे. त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात त्यांना चांगल्या अवस्थेत आणण्यासाठी या अवशेषांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय.
Share your comments