अकोला: रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या अन्नामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून, आता विषमुक्त अन्न उत्पादन अत्यंत गरजेचे झाले आहे. यावर सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय असल्याने भारतासह जगाने लक्ष केंद्रित केले असून, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेला भारतातील २२ राज्याच्या शास्त्रज्ञांसह जगातील १५ देशाच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन मंथन केले.
जमिनीचे आरोग्य, सिंचनाचे व्यवस्थापन, विषमुक्त अन्न निर्मितीसह सेंद्रिय मालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढती मागणी आणि परकीय गंगाजळीसह अनेकानेक
फायदे व सेंद्रिय शेती पद्धतीचा एकात्मिक, कालसुसंगत तंत्रज्ञान वापरासह प्रचार-प्रसार करण्यासाठी सेंद्रिय शेती फॉर्म टू फॅशन आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप रविवारी झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून ही सात दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.
कार्यशाळेत १५ देशांसह भारतातील २२ राज्यातील २९०९ प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. या यांनी मानले.
माध्मातून शेतकरी, संशोधक, कायदेतज्ज्ञ संबंधित अधिकारी, व्यापारी, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर मिळणार आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सेंद्रिय शेती संशोधन संस्था स्वित्झर्लंडच्या प्रमुख शास्त्रज्ञ आणि ग्रुप लीडर डॉ. मोनिका मेस्मर यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग रिसर्च, मोदीपुरम, मेरठ (उत्तर प्रदेश) चे संचालक डॉ. ए.एस पेनवर यांची विशेष उपस्थिती होती. प्रशिक्षण वर्गाचा समारोप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाले यांच्या अध्यक्षतेत पार पडला.
याप्रसंगी विविध देशातील तसेच देशांतर्गत राज्यांमधील प्रशिक्षणार्थीनी आपले मते मांडली. संचालन डॉ. नितीन कोडे यांनी तर आभार डॉ. सुरेश चौधरी
सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय असल्याने भारतासह जगाने लक्ष केंद्रित केले असून, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेला भारतातील २२ राज्याच्या शास्त्रज्ञांसह जगातील १५ देशाच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन मंथन केले.
Share your comments