बरेच तरुण शेतकरी असे प्रश्न विचारतात, की फळ, कैरी, कांदा साईझ वाढ करणारे औषध सांगा ? फुगवनी साठी असे कुठलेही औषध नाही. कोणतेही झाड़/पीक प्रकाश संश्लेषण क्रियेमधुन फळ पोषण करत असते , दूसरा उपाय नाही, त्यामुळे पांनांचे आरोग्य जपा. त्यांना पोषण द्या, पान मोठे फळ मोठे, पान लांब फळ लांब, पान चमकदार फळ चमकदार आणि मूळ जोमदार तर पान व पीक जोमदार. पिकाची प्रतिकार क्षमता वाढवा,उत्पन्नात वाढ होईल.
दररोज पाउस पडत असला ढगाळ वातावरण असले तर अशावेळेस प्रकाश संश्लेषनाची क्रिया कशी होइल? आणि प्रकाश संश्लेषण झाले नाही तर झाड़/पीक, खते, जिवाणु, बुराशिनाशके यांना खानार काय?
मित्रांनो झाड/पीक हे स्वतः अन्न बनविते, तेव्हाच त्याला मिळते, त्यामुळे विश्रांती काळात भरपूर साठा करणे, हे याचे उत्तर आहे. विश्रांतीच्या काळात कोळपणी, वखरती करून शेणखता सोबत निंबोळी खत, मासळी खत, गांडुळ खत शेणखत,करंज पेंड, हरळीची खते, पाझर तलावातील गाळ, लेंडी खत ,वापरा, आणी पाणी द्या, झाड आतुन सशक्त बनवा ,पांढरी मुळी उत्तम ठेवा, प्रत्येक वेळेस पाणी हे वापसा कंडिशन लाच द्या. आणि वरील सेंद्रिय खते देता येत नसतील तर, रासायनिक खतांची मात्रा 30 ते 40% कमी करून, चांगल्या कंपनीचे सेंद्रिय कर्ब किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे, ते वर्षातून एकवेळ खरीप हंगामात पिकांना द्या, रब्बीत द्यायची गरज नाही.
अनेक शेतकरी सांगतात ,आम्ही दानेदार खते टाकली, ड्रिपमधुन ही खते दिली, मायक्रोन्युट्रिएन्ट दिले, अजुन काय हवे?/काय देऊ? पण मित्रानो हा कच्चा माल झाला, याला शिजवनार कोण चिलेशन व अपटेक कोण करणार, हे पिकाला लागण्यासाठी, जमिनित जीवाणू आणि सेंद्रिय कर्ब दोन्ही घटक असले पाहिजे.
सेंद्रिय कर्ब जो 40/50 वर्षांपुर्वी 3/4% होता तो आज दहा पटिने कमी होउन 0.3 ते 0.4 एवढा कमी झालेला आहे.म्हनूनच दहा पटिने घटलेला सेंद्रिय कर्ब दहा पटिने वाढलेल्या खर्चाचे मुख्य कारण आहे. ज्याची भरपाई पूर्वी शेणखतातुन व्हायची , पण आज शेणखत मिळने दुरापास्त झाले आहे जितके शेणखत उपलब्ध असेल तितक्या शेणखता सोबत निंबोळी खत, मासळी खत, गांडुळ खतां सारखे सेंद्रीय खते, कोंबडी खत, आणि वर सांगितलेली खते वापरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा, तसेच जैविक खतांचा वापर करा उत्पन्न आपोआप वाढेल.
सेंद्रिय खतासोबत ऍझोटोबॅक्टर, पी एस बी, रायझोबियम, वेस्ट डी कंपोझर ई एम द्रावण हि जैविक खते वापरा त्यामुळे झाड़/पीक ऍक्टिव्ह राहते, व ते प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरू शकते. त्याच बरोबर हाइड्रोजन, फेरस चे अपटेक् वाढवते जे प्रकाश संश्लेषण क्रियेतिल अत्यन्त महत्वाचे मुलद्रव्य आहे, फेरस साठी हाइड्रोजन मॉलिक्यूल ची गरज असते ,नैसर्गिक हाइड्रोजन वेस्ट डिकंपोझर ईम या जैविक खतातून उपलब्ध होते. तसेच आणिबाणिच्या काळात झाडाला हवे असलेले घटक सम प्रमानातं पुरवन्याचे काम ही जैविक खते करतात.
सेंद्रिय कार्बन हा सर्व मुलद्रव्यांचा बाप आहे,त्यासोबत जैविक खते द्या उत्पन्नात वाढ होईल. वेस्ट डिकंपोझर आणि ई एम द्रावण एकूण 38 प्रकारचे कार्य करते असे शास्रज्ञ म्हणतात,म्हणून शेतीत त्यांचा वापर अनिवार्य झाला आहे.
वेस्ट डी कंपोझर आणि ई एम द्रावण फायदा
१) जमिनीतील परिणामकारक जिवाणु हजारो पटीने वाढतात.
२) झाडाची फुले निघण्याची क्षमता वाढते.
३) जमिनीती स्थिर अन्नद्रवाचे विघटन होते.
४) जास्त पाण्यामुळे जाम झालेल्या मुळया मोकळया होतात.
५) जमिनीतील गाडुळ संख्या वाढते.
६) जमिनीचा सामु सुधरतो
७) झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
८) पिकाच्या उत्पादन व प्रती मध्ये भरघोस वाढहोते.
९) रासायनिक खत मात्रेच्या वापरात बचत होते,रासायनिक खते 30 ते 40% कमी लागतात.
शिंदे सर
भागवती सीड्स चोपडा
भ्रमणध्वनी : 9822308252
Share your comments