घसरण्यात झाली आहे. गेल्या दहा दिवसांत कांदा दरात ९०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे.११ डिसेंबर रोजा २६०० रुपये प्रति क्विंटलने विक्री होत असलेला कांदा आता १७०० रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. दररोज बाजार समितीत होत असलेल्या दर घसरणीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक चिंतेत सापडला आहे.
स्थानिक पातळीवर भाव घसरल्याने उत्पादक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसाने पिकांना आधीच फटका बसला.
त्यात कांद्याचेही मोठे नुकसान झाले. आता दरात घसरण होऊ लागल्याने उत्पादक अस्वस्थ झाले आहेत. अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झालेले असताना दुसरीकडे बाजारभावातील घसरणीने बळीराजा चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणारा लाल कांद्याची टिकण्याची क्षमता 25 ते 30 दिवस असल्याने कांदा काढल्याबरोबर लागलीच त्याला विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा जोर असतो. सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर लाल कांदा बाजारात येऊ लागतो.
तोपर्यंत उन्हाळ कांदा संपुष्टात आल्यास नव्या कांद्याची मुबलक आवक होईपर्यंत दर उंचावतात, असा नेहमीचा अनुभव आहे. ही आवक सुरू झाली की, परिस्थितीनुसार दरात चढ-उतार होतात. सध्या तीच स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
एकट्या लासलगाव बाजार समितीत सध्या प्रतिदिन १८ ते २० हजार क्विंट्ल आवक होत आहे. त्यात दक्षिणेतील राज्यातून कांदा येण्यास सुरुवात झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी घटली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला कमीतकमी ७०१ सरासरी १७०१ जास्तीत जास्त २२५१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.
Share your comments