भारतीय शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात मुबलक पाण्याची व्यवस्था असते असे शेतकरी उन्हाळ्यात देखील शेती करत असतात. उन्हाळ्यात भारतात बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करत असतात.महाराष्ट्रात कांद्याची शेती ही सर्वाधिक बघायला मिळते. उन्हाळी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात कांदा लागवड केली जाते. मात्र उन्हाळी हंगामात लावल्या गेलेल्या कांदा पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात कांदा पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या राज्यात सर्वत्र उन्हाळी कांदा लावला जातो. मात्र पश्चिम महाराष्ट्रात याची लागवड अधिक असते. कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होणारे कांदा हे एक नगदी पीक आहे. हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगले फायदेशीर ठरते. जानेवारी ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केलेले कांद्याचे पीक एप्रिलच्या अखेरीस काढणीसाठी तयार होत असते. एप्रिल महिन्यात कांद्याची पाने पूर्णपणे सुकतात आणि चांगला सुकलेला कांदा जास्त काळ साठवला जातो.
उन्हाळी कांदा पिकासाठी पाणी व्यवस्थापन
कांदा पिकासाठी जमिनीचा प्रकार, पिकाची अवस्था आणि हंगाम या गोष्टी बघून पाणी व्यवस्थापन करावे लागते. उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीनंतर लगेचचं हलके पाणी द्यावे लागते आणि दर 2-3 दिवसांनी हलके पाणी या पिकाला द्यावे लागते जेणेकरून माती ओलसर राहते आणि कांदा पीक चांगले वाढते आणि उत्पादन देखील चांगले येते.
कांदा पिकासाठी 10-12 वेळा पाणी देण पुरेसे असते. कांदा चांगला पोसण्याच्या वेळी पाण्याची कमतरता भासायला नको. मात्र जास्त पाणी दिल्याने कांद्याला जांभळा डाग रोग होण्याची शक्यता असते, तर शेत जास्त काळ कोरडे राहिल्यास कांदा फुटण्याची समस्या उद्भवू शकते. मात्र कांदा काढणीच्या 15 दिवस आधी पाणी देणे बंद करावे.
तण नियंत्रण
कांद्याचे पीक तणमुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी निंदनी खुरपणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. याशिवाय कांदा लावणीनंतर 2-3 दिवसांनी स्टॅम्प 30 ईसी सारख्या तणनाशकाची तीन लिटर प्रति हेक्टर हे प्रमाण घेऊन फवारणी करावी. उभ्या पिकामध्ये, अरुंद पानांचे अधिक अमृत गवत असेल तर क्वेझालोफॉप इथाइल 5 ईसी 400 मिली/हेक्टर दराने फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. कांद्याची काढणी 50% झाडांची पाने पिवळी पडून कोमेजली का मग करावी. कांदा लवकर किंवा उशिरा काढणी केल्यास कांदाच्या साठवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. उन्हाळी हंगामातील कांद्याचे उत्पादन सरासरी 250-300 क्विंटल/हेक्टर होत असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात.
कांदा पिकावर येणारे रोग आणि नियंत्रण
थ्रिप्स
हे कीटक पानांचा रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर चांदीसारखे चमकदार पट्टे किंवा तपकिरी डाग तयार होतात. हे अगदी लहान पिवळे किंवा पांढरे रंगाचे कीटक असतात जे प्रामुख्याने पानांच्या तळाशी किंवा पानांच्या मध्यभागी फिरतात. त्याच्या नियंत्रणासाठी, निंबोळी तेलावर आधारित कीटकनाशके किंवा इमिडाक्लोप्री कीटकनाशक 17.8 SL फवारणी करा. औषधाचा डोस 125 ml./हेक्टर एवढा असावा. 500-600 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
माइट
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर ठिपके तयार होतात व कांदे छोटे राहतात पोसले जातं नाहीत. याच्या नियंत्रणासाठी 0.05: डायमेथोएट औषध फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.
जांभळा डाग/पर्पल ब्लॉच
पर्पल स्पॉट हा एक बुरशीजन्य रोग आहे, या रोगाचा प्रादुर्भाव दोन स्थितीत जास्त होतो, पहिली अतिवृष्टीमुळे, दुसरी झाडे जवळ लावल्याने, पानांवर जांभळे ठिपके तयार होतात. त्यामुळे झाडांच्या वाढीवर आणि विकासावर विपरीत परिणाम होतो. लक्षणे दिसल्यास 10 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब (2.5ग्रॅम/लिटर पाणी) फवारणी करावी. या बुरशीनाशकांमध्ये सॅनोविट, ट्रायटोन किंवा ऑर्डिनरी गम सारखी चिकटद्रव्ये जोडणे आवश्यक आहे जेणेकरून प्रभावी नियंत्रणासाठी द्रावण पानांना चिकटू शकेल.
Share your comments